X

Fact Check: रशिया-युक्रेन युद्धाच्या नावाखाली इराकचा जुना व्हिडिओ व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ चा रुस-युक्रेन सोबत काही संबंध नाही. व्हिडिओ 2004 चा इराक चा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: March 15, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): रुस-युक्रेन युद्धादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, सैनिक एका इमारतीमध्ये चालताना दिसत आहेत, ह्या इमारतीला आग लागल्याचे देखील दिसत आहे. हा व्हिडिओ रशिया-युक्रेन युद्धाचा असल्याचा दावा केला जात आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल होत असलेला व्हिडिओ रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित नाही. हा व्हिडिओ 2004 चा इराकमधील आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Murtaza naqvi’ ने वायरल वीडियो (आर्काइव लिंक) शेअर करत दावा केला: ”#share #Russian army and ukrine army fighting fresh….” जिसका हिंदी अनुवाद होता है “रूसी सेना और यूक्रेन की सेना के बीच ताजा लड़ाई…”

तपास:
व्हायरल होणारा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर, शेवटी लिहिले आहे “Task Force Viper & The 36th Commando Bn Killed 4 enemy, captured 25 enemy and secured the Shrine intact” आणि वायपर टास्क फोर्स ही यूएस फोर्सची एक तुकडी आहे.

व्हायरल व्हिडिओ चे किफ्रेम्स आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च सोबत शोधल्यावर आम्हाला मोठे वर्जन “FUNKER530 – Veteran Community & Combat Footage” नावाच्या वेरिडाईड युट्युब चॅनेल वर 29 ऑगस्ट, 2020 रोजी सापडले. व्हिडिओ सोबत डिस्क्रिप्शन दिले होते: Historical US Special Forces Raid On Golden Mosque

अजून एक व्हिडिओ आम्हाला Combat Footage नावाच्या युट्युब चॅनेल वर मिळाला, तो मार्च 25, 2021 रोजी अपलोड केलेला होता. व्हिडिओ सोबत डिस्क्रिप्शन दिले होते: US and Iraqi Special Forces Raid On Golden Mosque | October 1st, 2004. | Samarra, Iraq. व्हिडिओ सोबत डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये दिले होते: During the Battle for Samarra, also know as Operation Baton Rouge. US Special Forces and the 36th Iraqi Commando Battalion were in this assault. 25 Iraqi insurgents were captured and 4 were killed in this raid

इथे आम्हाला क्लू मिळाला कि हि घटना 2004 ची असू शकते. किवर्डस सोबत शोधल्यावर आम्हाला theguardian.com च्या वॉर लॉग मध्ये आम्हाला ह्या ऑपरेशन बद्दल अजून माहिती मिळाली . त्या प्रमाणे हि घटना 2004 ची आहे.

आम्हाला ह्या बद्दल एक बातमी latimes.com वर देखील मिळाली.

खाली दिलेल्या कोलाज मध्ये दिसत असलेली इमारत आणि इराक च्या गोल्डन मॉस्क मध्ये साम्य दिसते.

विश्वास न्यूज ने अधिक माहिती साठी युक्रेन च्या फॅक्ट चेकिंग टीम सोबत संपर्क केला आहे. तिथून माहिती मिळताच हि बातमी अपडेट करण्यात येईल.

व्हायरल पोस्ट ला Murtaza naqvi ने फेसबुक वर शेअर केले होते. यूजर चे 7,728 फॉलोवर्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ चा रुस-युक्रेन सोबत काही संबंध नाही. व्हिडिओ 2004 चा इराक चा आहे.

  • Claim Review : Russian army and ukrine army fighting fresh....
  • Claimed By : Murtaza naqvi
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later