X

Fact Check: 2018 मध्ये फ्रांस मध्ये झालेल्या एका कार्यक्रमाचा व्हिडिओ आता हॉलंड च्या गणेश उत्सवाचा सांगून होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि हा व्हिडिओ फ्रांस मध्ये झालेल्या एका इव्हेंट चा आहे, हॉलंड चा नाही.

  • By Vishvas News
  • Updated: September 24, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट मध्ये एक व्हिडिओ दिसतो, ज्यात संत्रे आणि लिंबूंनी गणेश ची प्रतिमा बनवण्यात आली आहे. पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ हॉलंड मध्ये झालेल्या गणेश उत्सवाचा आहे. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात समजले कि हा व्हिडिओ खरंतर फ्रांस चा, 2018 च्या एका इव्हेंट चा आहे, हॉलंड चा नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहले आहे: Holland is said to be the capital of orange in the world. The locals use the best part of their harvest to celebrate the festival of Vinayaka Chaturthi. Please see the unique ceremony they perform.

अनुवाद: हॉलंड ला जगाचे संत्र्याची राजधानी म्हंटल्या जाते, विनायक चतुर्थी च्या निमित्ताने, स्थानीय लोकांनी आपल्या उत्पन्नाचा सगळ्यात चांगला भाग वापरला आहे. हा कार्यक्रम इथे बघा.

तेलगू चॅनेल, साक्षी टीव्ही ने देखील 4 सप्टेंबर, 2021 रोजी आपल्या युट्युब हॅन्डल वर खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ बघा.
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट मध्ये केलेल्या दाव्याच्या तपासाची सुरुवात ह्या व्हिडिओ चे स्क्रीनशॉट घेऊन त्यांना गूगल रिव्हर्स इमेज मध्ये शोधण्यापासून केली. आम्हाला संत्र्यांनी बनलेले हे गणेशजी France Magazine च्या वेरिफाइड हॅन्डल वर 2018 साली केलेल्या एका ट्विट मध्ये मिळाले. ह्या ट्विट सोबत त्या हॅन्डल वर लिहले होते: “A Hindu god made from oranges and lemons… only at the #FeteduCitron in Menton! See what other sculptures they have made > http://bit.ly/FeteduCitron #travel

किवर्डस सोबत शोधल्यावर समजले कि मेंटन नावाची फ्रांस मध्ये एक जागा आहे.

ह्या इव्हेंट चे काही चित्र आम्हाला www.efe.com/ च्या एका बातमीत मिळाले, बातमी प्रमाणे, संत्रे आणि लिंबूंनी बनवलेल्या मृत्यांना अंतिम रूप देण्यात येत आहे, कारण शुक्रवारी दक्षिण फ्रेंच रिव्हेरा शहर मेंटन मध्ये “फेटे डू सिट्रोन” (“लेमन फेस्टिवल”) च्या 85 व्या संस्करणाच्या अंतिम तयारीत आहे. बॉलीवूड थिम वाल्या या कार्यक्रमात लोकांचे स्वागत परेड ने केले जाईल ज्याच्यात झाकी, नृत्य आणि संगीताचा समावेश असेल तसेच होळी पार्टी देखील आसनार आहे.

आम्हाला हे चित्र dreamstime.com वर देखील मिळाले, ज्या सोबत डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते: “Menton Lemon Festival 2018, Bollywood Theme art made of lemons and oranges, famous celebration on Cote d`Azur, France, Europe, Fete du citro.”

आम्ही ह्या विषयी मेंटन चे मेयर जीन-क्लाउड गुइबल ह्यांच्या ऑफीस मध्ये फोन द्वारे संपर्क केला. तिथे आमचे बोलणे, इसाबेल एंड्रू ह्यांच्यासोबत झाले. जे जीन-क्लाउड गुइबल ह्यांचे असिस्टंट आहे. आणि ट्रॅव्हल एक्स्पर्ट आहे. त्यांनी आम्हाला संहिताले, “दर वर्षी आम्ही फेटे डू सिट्रोन म्हणजे लेमन फेस्टिवल चे आयोजन करतो. जिथे दर वर्षी वेगवेगळी थिम असते. 2018 मध्ये झालेल्या फेस्टिवल ची थिम बॉलीवूड होती, जिथे वेगवेगळ्या वस्तूंचा निर्माण, लिंबू आणि संत्र्यांनी केला होता. हा फोटोहि त्यातलाच एक भाग आहे.”

हि पोस्ट Ramgee नावाच्या यूजर ने शेअर केली आहे. आम्ही यूजर ला स्कॅन केले त्यात कळले कि ते चेन्नई चे रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि हा व्हिडिओ फ्रांस मध्ये झालेल्या एका इव्हेंट चा आहे, हॉलंड चा नाही.

  • Claim Review : Holland is said to be the capital of orange in the world. The locals use the best part of their harvest to celebrate the festival of Vinayaka Chaturthi. Please see the unique ceremony they perform.
  • Claimed By : Ramgee
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later