Fact Check: हे चित्र भारताचे नाही, बांगलादेश चे आहे
आम्हाला आमच्या तपासात कळले कि व्हायरल चित्र भारताचे नसून बांगलादेश चे आहे.
- By: Pallavi Mishra
- Published: Nov 17, 2021 at 03:46 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सध्या सोशल मीडिया वर एक चित्र व्हायरल होत आहे, ज्यात एका रस्त्यावर बरेच लोक बसून नमाज वाचताना दिसतात. चित्र बघून असे वाटते कि हे लोक मेन रॉड वर ट्रॅफिक अडवून नमाज वाचत आहेत, चित्रासोबत लिहले होते कि हे चित्र भारताचे आहे. आमच्या तपासात हे चित्र बांगलादेश चे असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
हा फोटो शेअर करत अजय मिश्रा नावाच्या फेसबुक यूजरने लिहिले की, “यह मधुर सेक्युलर दृश्य केवल आपको भारत मे दिखाई देता है। बाकी 56 मुश्लिम देशों में ऐसा करे तो जेल में डाल दिया जाता है, यह केवल टेस्टिंग है कब्जा करने की….हिन्दुओं की धैर्य को….ताकत को…. ताकि कितना दबाया जा सकता है????”
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
आमचा तपास सुरू करण्यासाठी, आम्ही सगळ्यात आधी या चित्राचा स्क्रीनशॉट घेतला आणि गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये त्याला शोधले.
आम्हाला हा फोटो 16 एप्रिल 2021 रोजी फोटो एजन्सी alamy अपलोड केलेला आढळला. चित्रासोबत लिहले होते, “अनुवादित: रमजानच्या पवित्र महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी मुस्लिम कोणत्याही सामाजिक अंतराशिवाय रस्त्यावर जुम्माची नमाज अदा करतात, बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी 16 एप्रिल रोजी ढाका, बांगलादेश येथे कोविड-19 साठी कडक लॉकडाऊन लागू केले. कोरोनाव्हायरसच्या प्रसाराशी लढा. क्रेडिट: झाबेद हसनैन चौधरी/ज़ूमा वायर/अलामी लाइव्ह न्यूज”
Faisal Caesar नावाच्या ट्विटर हँडलने 12 फेब्रुवारीला केलेल्या ट्विटमध्येही आम्हाला या चित्राशी मिळते जुळते एक छायाचित्र सापडले. पोस्टसोबत लिहले होते, “The scene from the outside of Sobhanbag Mosque during the Jumma Prayers today. #JummahMubarak”
आम्ही ह्या विषयी सरळ फोटो काढणाऱ्या फोटोजर्नलिस्ट ज़ाबेद हसनैन चौधरी ह्यांना फोन द्वारे संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले, “हे चित्र मी ढाका मध्ये रमज़ान च्या वेळी काढले होते.”
अजय मिश्रा नावाच्या फेसबुक यूजरने ही पोस्ट शेअर केली होती. फेसबुकवर युजरचे 4,955 मित्र आहेत. प्रोफाइलनुसार, वापरकर्ता मूळचा मोतिहारी, बिहारचा असून सध्या ते दिल्लीत राहतात.
निष्कर्ष: आम्हाला आमच्या तपासात कळले कि व्हायरल चित्र भारताचे नसून बांगलादेश चे आहे.
- Claim Review : यह मधुर सेक्युलर दृश्य केवल आपको भारत मे दिखाई देता है
- Claimed By : अजय मिश्रा
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.