Fact Check: ’30 जीबी फ्री डाटा आजादी ऑफर’ चा मेसेज फेक आहे, फिशिंग लिंक्स होत आहे व्हायरल
सेवा पुरवठादारांकडून 30 GB मोफत डेटा देणारा सोशल मीडियावरील संदेश खोटा आहे. कंपन्यांनी अशी कोणतीही योजना आणलेली नाही. मेसेजसोबत फिशिंग लिंक्स व्हायरल होत आहेत. यावर क्लिक केल्यास युजरचा डेटा चोरीला जाऊ शकतो.
- By Vishvas News
- Updated: August 17, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): 15 ऑगस्टपासून सोशल मीडियावर 30 जीबी फ्री डेटा ऑफरचा मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये असे लिहिले आहे की, सर्व्हिस प्रोव्हायडर यूजर्सना 30 जीबी फ्री डेटा देत आहेत. यामध्ये कंपन्यांच्या नावांसह लिंक देण्यात आल्या आहेत.
विश्वास न्यूजने केलेल्या तपासणीत असे आढळून आले की सेवा पुरवठादारांनी अशी कोणतीही योजना दिली नाही. यासोबतच फिशिंग लिंकही व्हायरल होत आहेत. यापूर्वीही असे अनेक मेसेज व्हायरल झाले होते, ज्याचा तपास विश्वास न्यूजने केला आहे.
काय होत आहे व्हायरल?
आम्हाला व्हाट्सअँप ला हा मेसेज मिळाला, ज्यात लिहले होते,
30 GB Free Data Azaadi Offer
To Activate 30 GB Free Internet Azaadi Offer for all Networks click here

तपास:
व्हायरल मेसेजची चौकशी करण्यासाठी आम्ही प्रथम त्यामध्ये दिलेल्या लिंक्स काळजीपूर्वक पाहिल्या. हे सर्व आम्हाला संशयास्पद वाटले. Airtel च्या नावाने दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर उघडणाऱ्या पेजची URL https://fill2.us/Claim-Now#1660716257213 आहे. ही एअरटेलच्या अधिकृत वेबसाइटची लिंक नाही. खाली लिहिले आहे की जर तुम्हाला 30 GB फ्री डेटा हवा असेल तर खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. तसेच मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करण्यास सांगितले आहे.

एअरटेल व्यतिरिक्त, इतर लिंकवर क्लिक केल्यावर देखील समान URL मिळाले. विशेष म्हणजे मेसेज करणाऱ्या युजर्सची नावे आणि खाली दिलेल्या कमेंट्स सारख्याच आहेत. Jazz, Zong, Telenor आणि इतर नेटवर्कसह दिलेल्या लिंक्स 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या स्वातंत्र्याचे अभिनंदन करत आहेत, परंतु त्यांच्याकडे देखील समान टिप्पणी करणारे वापरकर्ते आहेत.

Airtel, Jio, Vodafone Idea, BSNL, Jazz, Zong आणि Telenor च्या अधिकृत वेबसाइटवर अशा ऑफर्सबद्दल कोणतीही माहिती नाही. गुगलवर कीवर्डसह शोध घेतल्यानंतरही आम्हाला कोणत्याही विश्वसनीय वेबसाइटवर अशी कोणतीही बातमी आढळली नाही.
याबाबत आम्ही सायबर तज्ज्ञ अनुज अग्रवाल यांच्याशी बोललो. ते म्हणतात, ‘या सर्व फिशिंग लिंक्स आहेत. यावर क्लिक केल्यास युजरचा डेटा चोरीला जाऊ शकतो. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडलवर अशा योजना तपासा.
निष्कर्ष: सेवा पुरवठादारांकडून 30 GB मोफत डेटा देणारा सोशल मीडियावरील संदेश खोटा आहे. कंपन्यांनी अशी कोणतीही योजना आणलेली नाही. मेसेजसोबत फिशिंग लिंक्स व्हायरल होत आहेत. यावर क्लिक केल्यास युजरचा डेटा चोरीला जाऊ शकतो.
- Claim Review : 30 जीबी फ्री डेटा ऑफर
- Claimed By : Whatsapp User
- Fact Check : False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
-
Whatsapp 9205270923
-
Email-Id contact@vishvasnews.com