X
X

Fact Check: नाना पाटेकरांच्या फोटोशी छेडछाड केली गेली आहे, व्हायरल झालेला फोटो बनावट आहे

विश्वास न्यूजने व्हायरल झालेल्या फोटोची तपासणी केली. तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. खऱ्या फोटोत हनी सिंगऐवजी बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर दिसून आले. खऱ्या फोटोशी छेडछाड करून व्हायरल झालेला फोटो तयार करण्यात आला आहे.

नवी दिल्ली (Vishvas News). बॉलिवूड सिंगर आणि रॅपर, हनी सिंग आणि बादशाहचा एक कथित फोटो व्हायरल होत आहे. या कथित फोटोमध्ये हनी सिंग, बादशहाला मिठी मारताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनेक वापरकर्ते हा फोटो खरा म्हणून शेअर करत आहेत.

विश्वास न्यूजने व्हायरल झालेल्या फोटोची तपासणी केली. तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. खऱ्या फोटोत हनी सिंगऐवजी बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर दिसून आले. खऱ्या फोटोशी छेडछाड करून व्हायरल झालेला फोटो तयार करण्यात आला आहे.

काय होत आहे व्हायरल

फेसबुक वापरकर्ता, प्रकाश सिंगने 10 डिसेंबर रोजी एक फोटो पोस्ट करत लिहिले की, “व्वा, काय सीन आहे.”

व्हायरल पोस्टचा मजकूर जसा आहे तसा इथे लिहिला आहे. त्याला खरा मानून अनेक वापरकर्ते त्याला व्हायरल करत आहेत. पोस्टची संग्रहित लिंक येथे पाहता येईल.

तपास

व्हायरल फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने सर्वप्रथम गुगल लेन्स टूलचा वापर केला. त्याच्या माध्यमातून शोध घेतल्यानंतर आम्हाला झी न्यूजच्या मराठी वेबसाईटवर एक बातमी सापडली. या बातमीत बादशाह आणि नाना पाटेकर, इंडियन आयडॉलमध्ये दिसत आहेत. 2 डिसेंबर 2024 च्या या बातमीमध्ये सांगण्यात आले आहे की, दोघे, सोनी टीव्हीच्या लोकप्रिय शोमध्ये एकत्र दिसून आले होते.

शोधाच्या दरम्यान आम्हाला बादशहाच्या एक्स हँडलवर नाना पाटेकर आणि बादशाहचा खरा फोटो सापडला. 30 नोव्हेंबर 2024 रोजी पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये, नाना पाटेकर बादशहाला मिठी मारताना दिसत आहेत. आतापर्यंतच्या तपासात, नाना पाटेकर यांच्या चेहऱ्याऐवजी हनी सिंगचा चेहरा लावून व्हायरल फोटो तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

https://twitter.com/Its_Badshah/status/1862742958891491405

अधिक माहितीसाठी विश्वास न्यूजने मुंबईतील ज्येष्ठ एंटरटेनमेंट जर्नलिस्‍ट पराग चाफेकर यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट करण्यात आलेला आहे.

तपासाच्या शेवटी, बनावट फोटो शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे सोशल मिडिया स्कॅनिंग करण्यात आले. प्रकाश सिंग नावाच्या या फेसबुक पेजचे 23 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हा वापरकर्ता दिल्लीत राहतो. हे पेज 5 जून 2018 रोजी तयार करण्यात आले होते.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या चौकशीत हनी सिंग आणि बादशाहचा व्हायरल झालेला फोटो खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. खऱ्या फोटोत बादशहासोबत नाना पाटेकर दिसत आहेत.

  • Claim Review : हनी सिंग आणि बादशाहचा फोटो
  • Claimed By : FB User Prakash Singh
  • Fact Check : False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later