Fact Check: गर्दीत फिरणाऱ्या सिंहाचा हा व्हिडिओ एडिटेड आहे, खोटा दावा व्हायरल
ताजमहालमध्ये सिंहाच्या हल्ल्याचा व्हायरल होणारा व्हिडिओ संपादित आहे. वापरकर्ते त्यास खरा समजून शेअर करत आहेत.
- By: Jyoti Kumari
- Published: May 24, 2025 at 03:16 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ताजमहालमध्ये लोकांमध्ये एक सिंह फिरताना दिसून येत आहे. काही वापरकर्ते हा व्हिडिओ खरा असल्याचे समजून शेअर करत आहेत. असा दावा केला जात आहे की, सिंहाने ताजमहालमध्ये हल्ला केला आहे.
विश्वास न्यूजच्या तपासात, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. ताजमहालमध्ये सिंह फिरतानाचा हा व्हिडिओ खरा नसून तो एडिट केलेला आहे. तो खरा असल्याचा खोटा दावा करून, त्याला शेअर केले जात आहे.
काय आहे व्हायरल पोस्ट मध्ये?
फेसबुक वापरकर्ता Uday Veer ने, 19 मे 2025 रोजी हा व्हिडिओ (संग्रहित लिंक) पोस्ट केला आहे. त्यावर लिहिले आहे, “आग्रा ताजमहालमध्ये सिंहाचा हल्ला”
सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ खरा समजून शेअर केला आहे. पोस्टची संग्रहित लिंक येथे पाहा.

तपास
व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही संबंधित कीवर्ड वापरून शोध घेतला. आम्हाला या दाव्याशी संबंधित कोणतही विश्वसनीय मीडिया रिपोर्ट सापडला नाही. जर अशी दुर्घटना घडली असती, तर ती नक्कीच माध्यमांमध्ये प्रकाशित झाली असती.
यानंतर, आम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. यामध्ये सिंह लोकांमध्ये फिरत आहे आणि तिथे उपस्थित असलेले लोक बेफिकीर उभे असल्याचे दिसून येत आहे. जर सिंह खरा असता, तर लोक भीतीने पळत असते. तथापि, व्हिडिओमध्ये काही लोक शांतपणे उभे आहेत आणि काही लोक फोटो क्लिक करत आहेत. यामुळे आम्हाला हा व्हिडिओ डिजिटल पद्धतीने तयार केलेला असल्याचे वाटले.
आम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेतला आणि गुगल लेन्स आणि यांडेक्स रिव्हर्स इमेजने त्याचा शोध घेतला, पण आम्हाला कोणताही परिणाम मिळाला नाही. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देखील अनेकांनी या व्हिडिओला बनावट म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा इमारतीचा व्हिडिओ, आम्हाला WildFilmsIndia च्या अधिकृत युट्युब चॅनलवर सापडला. 14 मे 2019 रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये तो ताजमहालचा असल्याचे म्हटले आहे.
याबद्दल, आम्ही व्हिडिओ तज्ञ अरुण कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ पाठवला. त्यांचे म्हणणे आहे की, हा व्हिडिओ बनावट आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, सूर्यप्रकाशात तर सिंहाची सावली दिसतच आहे, परंतु सावलीत ही सिंहाची सावली दिसत आहे. यावरून हे स्पष्ट होते की, हा व्हिडिओ खरा नाही. व्हिडिओमध्ये सिंह उघड्यावर फिरत आहे आणि लोकांकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नाहीये.
आग्रा येथील दैनिक जागरणचे उपमुख्य उपसंपादक, प्रतीक कुमार यांच्यासोबत आम्ही व्हिडिओ शेअर केला. त्यांनी त्यास बनावट म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी, ताजमहालबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, “पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये ताजमहाल पेटला आहे.” विश्वास न्यूजने तपास केला आणि हा दावा खोटा असल्याचे आढळले. व्हायरल होणारा व्हिडिओ एआय (AI) निर्मित होता. फॅक्ट चेक अहवाल येथे वाचा.
विश्वास न्यूजने वेळोवेळी अशा अनेक एडिट केलेल्या व्हिडिओंची चौकशी केली आहे. त्यांना येथे क्लिक करून वाचता येईल.
शेवटी आम्ही व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे प्रोफाइल स्कॅन केले. 7 हजारांहून अधिक लोक त्या वापरकर्त्याला फॉलो करतात हे उघड झाले.
निष्कर्ष: ताजमहालमध्ये सिंहाच्या हल्ल्याचा व्हायरल होणारा व्हिडिओ संपादित आहे. वापरकर्ते त्यास खरा समजून शेअर करत आहेत.
- Claim Review : आग्रा ताजमहालमध्ये सिंहाचा हल्ला
- Claimed By : फेसबुक यूजर -Uday Veer
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.











