X
X

Fact Check: माझ्या मृत्युच्या अफवांवर प्रतिक्रिया द्यायची नाही हा धर्मेंद्र यांचा व्हिडिओ, दिशाभूल करणारा आहे व्हायरल पोस्ट  

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र देओल यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र देओल यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या अनेक वाहिन्यांनी त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी दाखवली होती. यासंबंधी एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांचा व्हिडिओ शेअर करताना असा दावा केला जात आहे की, त्यांनी मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये दाखवल्या जात असलेल्या त्यांच्या मृत्यूच्या खोट्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे.

विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात आढळले की, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. खरे तर, धर्मेंद्र यांचा व्हायरल व्हिडिओ सुमारे तीन महिने जुना आहे आणि आता तो दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे. तथापि, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या मृत्यूच्या खोट्या बातमीचा तीव्र निषेध केला होता.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक वापरकर्ता ‘Pintu Shukla’ याने 12 नोव्हेंबर  2025 रोजी हा व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘सर्वात वेगवान होण्याच्या मागे लागून खोटेपणा पसरवणाऱ्या गो## मीडिया ला धर्मेंद्र यांचा संदेश Dharmendra Deol’

पोस्टची संग्रहित लिंक येथे पाहा.

तपास 

व्हायरल दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी, आम्ही गुगलवर संबंधित कीवर्ड वापरून शोध घेतला. आम्हाला दाव्याचे समर्थन करणारी कोणतीही विश्वासार्ह बातमी आढळली नाही. तथापि, आम्हाला अशा अनेक बातम्या आढळल्या, ज्यात त्यांच्या कुटुंबाने खोट्या बातम्या आणि प्रायव्हसी भंग केल्याबद्दल मीडियावर टीका केली आहे. 

13 नोव्हेंबर 2025 रोजी दैनिक जागरणच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, “धर्मेंद्र यांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्या कुटुंबाने मिडियाकडे वारंवार प्रायव्हसीची आणि या कठीण काळात त्यांना एकटे सोडण्याची विनंती केली होती. तथापि, कदाचित कोणीही हे गांभीर्याने घेतले नाही आणि आता सनी देओल या प्रकरणावर संतापले आहे. अभिनेत्याच्या घराबाहेर उपस्थित असलेल्या पापाराझींनावर सनी पाजी क्रोधीत झाले आणि त्यांना फटकारले.” 

आम्ही आमचा तपास पुढे नेत, या व्हिडिओ विषयी शोध घ्यायला सुरुवात केली. आम्हाला 11 ऑगस्ट 2025 रोजी धर्मेंद्र यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हायरल व्हिडिओ सापडला. व्हिडिओमध्ये ते सर्वांना संदेश देत असल्याचे दिसत आहेत.

13 नोव्हेंबर 2025 रोजी नवभारत टाईम्स वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ‘प्रसिद्ध बॉलीवूड स्टार धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते घरी परतले आहेत. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबाने घरीच उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 89 वर्षीय अभिनेत्याला 12 दिवसांपूर्वी श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, कुटुंबाने आरोग्य अपडेट जारी केले आहे आणि लोकांना अफवांवर लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे. त्यांनी चाहत्यांना अभिनेत्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन देखील केले आहे. याआधी, गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांची सतत गर्दी सुरू होती. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान ते गोविंदा आणि कुटुंबातील सदस्य नियमितपणे धर्मेंद्र यांची स्थिती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात जाताना दिसले आहेत.’

अधिक माहितीसाठी, आम्ही दैनिक जागरणच्या वरिष्ठ पत्रकार, स्मिता श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला, ज्या मुंबईत बॉलिवूड कव्हर करतात. त्यांनी आम्हाला सांगितले की, हा दावा दिशाभूल करणारा आहे.

शेवटी, आम्ही दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे फेसबुक अकाउंट स्कॅन केले. आम्हाला आढळले की, वापरकर्त्याचे नऊ हजार तीनशेहून अधिक फॉलोअर्स आहेत. हा वापरकर्ता एका विशिष्ट विचारसरणीशी संबंधित पोस्ट शेअर करतो आणि त्याच्या प्रोफाइलमध्ये तो, स्वतःचे दिल्लीचा रहिवासी म्हणून वर्णन करतो.

निष्कर्ष: विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात आढळले की, धर्मेंद्र देओल त्यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्यांवर प्रतिक्रिया देत असल्याचा दावा खोटा आहे. व्हायरल व्हिडिओ सुमारे तीन महिने जुना आहे आणि आता तो दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

  • Claim Review : धर्मेंद्र यांनी त्यांच्या मृत्यूच्या खोट्या बातमीवर प्रतिक्रिया दिली.
  • Claimed By : FB User Pintu Shukla
  • Fact Check : False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later