X
X

Fact Check: श्री रामचंद्रांचे धनुष्य समुद्रात सापडल्याच्या दाव्याने व्हायरल झाला एक एआय व्हिडिओ 

विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात व्हायरल दावा चुकीचा असल्याचा आढळला आहे. भगवान रामचंद्रांचे धनुष्य मिळाल्याच्या दाव्यासह व्हायरल होत असलेला व्हिडिओ वास्तविक नाही. 

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). समुद्रातून धनुष्य बाहेर येण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करून, असा दावा केला जात आहे की, भगवान श्री रामचंद्रांचे धनुष्य समुद्रात सापडले आहे.

विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात व्हायरल दावा चुकीचा असल्याचा आढळला आहे. भगवान रामचंद्रांचे धनुष्य मिळाल्याच्या दाव्यासह व्हायरल होत असलेला व्हिडिओ वास्तविक नाही. 

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक वापरकर्ता ‘सचिन जयस्वाल’ने 1 जून 2025 रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “रामायण काळाचा पुरावा समुद्रातून सापडला, श्री रामचंद्रांचे धनुष्य.”

पोस्टची संग्रहित लिंक येथे पाहा.

तपास  

व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर संबंधित कीवर्डच्या मदतीने शोध घेतला. आम्हाला दाव्याशी संबंधित कोणताही बातमी मिळली नाही. 

आम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला आणि आम्हाला आढळले की, धनुष्याची सुरक्षा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या शरीराची रचना खूपच विचित्र आहे. अशा परिस्थितीत, आम्हाला एआयच्या मदतीने व्हिडिओ बनवल्याचा संशय आला. 

तपास पुढे नेऊन आम्ही एआय डिटेक्शन टूल Cantilux च्या मदतीने व्हिडिओ तपासला. या टूलने हा व्हिडिओ 80 टक्क्यांपर्यंत एआयद्वारे बनवला गेल्याची शक्यता व्यक्त केली.

आम्ही video.attestiv टूलच्या मदतीने देखील व्हिडिओ तपासला. या टूलने हा व्हिडिओ 80 टक्क्यांपर्यंत हाताळ्याचा आणि एआयद्वारे बनवला गेल्याची शक्यता व्यक्त केली. 

अधिक माहितीसाठी आम्ही एआय तज्ज्ञ Azahar Machawe यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की, धनुष्य आणि पाण्याच्या लाटाची रचना विचित्र आहे. जेव्हा धनुष्य वरच्या दिशेने येते तेव्हा, तो ओला होत नाही. व्हिडिओच्या दुसर्‍या भागात, हे पाहिले जाऊ शकते की पोलीस कर्मचाऱ्यांच्या शरीराची रचना खूपच विचित्र आहे. हे पाहता, हे समजू शकते की, व्हिडिओ एआयच्या मदतीने बनविला गेला आहे. 

शेवटी, आम्ही चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे खाते स्कॅन केले. आम्हाला आढळले की, वापरकर्ता एक विचारसरणीशी संबंधित पोस्ट शेअर करतो.

निष्कर्ष: विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात आढळले की, भगवान श्री रामचंद्रांचे धनुष्य समुद्रात सापडल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ एआयद्वारे तयार करण्यात आला आहे.  

  • Claim Review :  समुद्रात सापडले भगवान श्री रामचंद्रांचे धनुष्य. 
  • Claimed By : FB User Sachin Jaiswal 
  • Fact Check : False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later