Fact Check : विराट कोहलीचा हा रडणारा फोटो आहे AI व्युत्पन्न
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. वास्तविक हा फोटो एआय टूल्सने बनवला गेला आहे.
- By: Pallavi Mishra
- Published: Mar 15, 2025 at 02:10 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफाइनल सामन्यात ऑस्ट्रेलियाला 4 विकेटने पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात विराट कोहलीने शानदार 84 धावा केल्या. आता या सामन्याशी संबंधित कोहलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो रडताना दिसून येत आहे. पोस्ट सामायिक करून, असा दावा केला जात आहे की, सामन्यानंतर कोहली अशा प्रकारे रडताना दिसला होता.
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. वास्तविक हा फोटो एआय टूल्सने बनवला गेला आहे.
काय होत आहे व्हायरल?
4 मार्च 2025 रोजी व्हायरल फोटो सामायिक करताना फेसबुक वापरकर्ता Cric lover मथळ्यामध्ये लिहिले आहे, “अनुष्का शर्माने हात जोडून भारतीय चाहत्यांना सांगितले की, आज कठीण काळात विराटने संघासाठी अर्धशतक झळकावले आहे, तो अश्रू ढाळत आहे पण कोणीही त्याचे अभिनंदन करत नाही.”
बर्याच वापरकर्त्यांनी हा फोटो खरा असल्याचा म्हणून सामायिक केला आहे. येथे पोस्टची संग्रहित लिंक पाहा.
तपास
व्हायरल पोस्टचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही काळजीपूर्वक पाहिले. चित्रात विराट कोहलीचा चेहरा वास्तविक दिसत नव्हता. अशा परिस्थितीत आम्हाला फोटोला एआय पासून बनविल्याचा संशय आला.
तपासणी पुढे करून आम्ही एआय च्या मदतीने तयार करण्यात येणाऱ्या मल्टीमिडीयाचा शोध घेणाऱ्या टूल्सच्या मदतीने फोटोचा शोध घेतला. या टूलने हा फोटो 97.6 टक्क्यांपर्यंत एआयद्वारे व्युत्पन्न असल्याची शक्यता दर्शविली.

आम्ही हा फोटो दुसर्या टूलच्या मदतीने देखील शोधला. आम्ही साइट इंजिनच्या मदतीने फोटो शोधला. या टूलने हा फोटो 99 टक्क्यांपर्यंत एआयद्वारे व्युत्पन्न असल्याची शक्यता दर्शविली.

आम्ही व्हायरल पोस्टला एआय तंत्रज्ञानामध्ये काम करत असलेले तज्ञ अझर माचवे शी शेअर केले. त्यांनी फोटो एआयद्वारे व्युत्पन्न केला असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “हा फोटो बनावट आहे. बीसीसीआयचे प्रतीक चुकीचे आहे, पुमाचा लोगो देखील चुकीचा आहे आणि चेहरा देखील बरोबर नाही.”
शेवटी, आम्ही फेसबुक वापरकर्ता Cric lover चे खाते स्कॅन केले ज्याने खोट्या दाव्यासह पोस्ट शेअर केली. आम्हाला आढळले की, वापरकर्त्याला 1.5 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत असे आढळले की, विराट कोहलीचा हा फोटो कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे तयार करण्यात आला आहे आणि लोक त्याला वास्तविक म्हणून शेअर करीत आहेत.
- Claim Review : सामन्यानंतर, कोहली असा रडताना दिसला.
- Claimed By : FB User Cric lover
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.











