Fact Check: कंगनाच्या व्हिडिओशी छेडछाड, राहुल गांधींची करण्यात आली होती थट्टा
हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार, कंगना राणावत यांचा एक व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Sep 26, 2025 at 05:36 PM
नवी दिल्ली (Vishvas News). हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार, कंगना राणावत यांचा एक व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओचा वापर करून, कंगना यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ‘मत चोरी’ झाली असे कबूल केल्याचा दावा केला जात आहे.
या व्हिडिओमध्ये कंगना राणावत म्हणताना ऐकले जाऊ शकते की, “‘मत चोरी’ फक्त येथे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येच होत आहे. पण कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पंजाब किंवा इतर राज्यांमध्ये ती होत नाहीये.” याच्या आधारे, असा दावा केला जात आहे की, कंगना यांनी कबूल केले आहे की, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ‘मत चोरी’ होत आहे.
विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टचा तपास केला. हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. खरे तर, कंगना राणावत यांनी राहुल गांधींविरुद्ध थट्टापूर्ण टिप्पणी करताना हे विधान केले. त्यांचे संपूर्ण विधान ऐकल्यानंतर हे स्पष्ट झाले.
काय होत आहे व्हायरल ?
फेसबुक वापरकर्ता Shabbir Ali याने एक क्लिप अपलोड केली आणि दावा केला की, “कंगना राणावत यांनी देखील कबूल केले की, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मत चोरी होत आहे.”

तपास
कंगना राणावत यांच्या व्हायरल क्लिपची सत्यता पडताळण्यासाठी, विश्वास न्यूजने प्रथम त्यातून अनेक की फ्रेम्स काढल्या. नंतर, गुगल लेन्स टूल वापरून त्यांचा शोध घेतला. आम्हाला पीटीआयच्या एक्स हँडलवर संपूर्ण विधान सापडले. खरे तर, व्हायरल क्लिप एडिट केलेली आहे. संपूर्ण विधान ऐकल्यावर हे स्पष्ट झाले की, कंगना राणावत यानी, काँग्रेस नेते राहुल गांधींची थट्टा करण्यासाठी “मत चोरी” या मुद्द्यावर, हे विधान केले आहे. पीटीआयच्या 18 सप्टेंबर 2025 च्या एक्स पोस्ट ला खाली पाहता येईल.
आमच्या तपासाच्या दरम्यान, आम्हाला आज तकच्या यूट्यूब चॅनलवर कंगना यांचा एक छोटा व्हिडिओ सापडला, ज्यामध्ये त्या, राहुल गांधींवर टीका करताना दिसत आहे.
याशिवाय, कंगना यांच्या विधानाशी संबंधित एक बातमी हिंदुस्थानच्या वेबसाइटवरही आढळली. 18 सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या बातमीत असे लिहिले आहे की, “हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार कंगना राणावत यांनी एका माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मतदान चोरीचे आरोप फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येच केले जात आहेत, परंतु कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पंजाब किंवा इतर अनेक राज्यांमध्ये नाही. मंडीमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या कंगना राणावत म्हणाल्या की, ही एक प्रकारची हास्यास्पद बाब आहे, विनोद आहे, कारण त्यांना विकासात रस नाही. बिहारमधील असो किंवा इतर कोणतीही निवडणूक, त्यांना रस नाही. आपण जाऊन खटला दाखल करू शकता, आपण न्यायालयात जाऊन आपले पुरावे सादर करू शकता, परंतु त्याऐवजी तुम्ही फक्त इकडे तिकडे मीडिया ट्रायल करण्याचा प्रयत्न करत आहात, लोकांची दिशाभूल करत आहात. मतदान चोरीचे आरोप फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येच केले जात आहेत, परंतु कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पंजाब किंवा इतर अनेक राज्यांमध्ये नाही.”
विश्वास न्यूजने चौकशीदरम्यान कंगना राणावत यांची बहीण रंगोलीशी संपर्क साधला आणि व्हायरल क्लिप तिच्यासोबत शेअर केली. त्यांनी ती पूर्णपणे खोटी असल्याचे सांगत, कंगनाचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह प्रसारित करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
तपासात शेवटी बनावट पोस्ट करणाऱ्या वापरकर्त्याचा तपास करण्यात आला. त्याला दोन लाखांपेक्षा पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने केलेल्या तपासात व्हायरल झालेला दावा खोटा असल्याचे आढळले. कंगना राणावतच्या विधानाचा एक अपूर्ण भाग खोट्या दाव्यासह प्रसारित करण्यात आला. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ‘मत चोरी’च्या आरोपांचे कंगनाने खंडन केले आहे. त्या राहुल गांधींच्या टिप्पणीला व्यंग्यात्मक टिप्पणीने उत्तर देत होत्या. आमच्या तपासात असे आढळून आले की, व्हायरल व्हिडिओ संपादित केला आहे आणि तो पूर्ण संदर्भाशिवाय सादर केला आहे.
- Claim Review : कंगना राणावतने बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मतदान चोरीची कबुली दिली
- Claimed By : FB User Shabbir Ali
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.











