X
X

Fact Check: सनी देओलचा भर रस्त्यावर लडखडत चालतानाचा  तो व्हिडीओ हा चित्रपटाच्या शुटिंगचा भाग; व्हायरल व्हडिओ दिशाभूल करणारा.

विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल पोस्ट भ्रामक आहे हे सिद्ध झाले आहे.सनी देओलच्या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडिओ भ्रामक दावा करून व्हायरल केला जात आहे.

नवी दिल्ली(विश्वास न्यूज) बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले.त्यानंतर त्यांचा मुलगा  सनी देओल यांचा एक व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. यात ते लडखडत चालत  एका ऑटोवाल्याशी बोलत असल्याचे दिसून येते. व्हिडीओमध्ये ऑटोचालक त्यांना मदत करताना दिसतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल करताना दावा केला जात आहे की सनी देओल यांची अवस्था फारच वाईट झाली आहे.अनेक युजर्स हा दावा खरा मानून व्हिडीओ शेअर करत आहेत.

विश्वास न्यूजने यापूर्वीही या व्हिडीओची खरी माहिती आपल्या वाचकांसमोर आणली होती आणि दावा खोटा ठरवला होता.प्रत्यक्षात हा व्हिडीओ एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे.शूटिंगचा व्हिडीओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे.

काय होतंय व्हायरल

इन्स्टाग्राम यूजर Shalim Khan नी 2 डिसेंबर 2025 रोजी एक व्हिडिओ पोस्ट केला त्यात असे लिहले,“ सनी देओलची झाली वाईट अवस्था.”

पोस्टच्या कंटेंटला इथे जसेच्या तसे लिहले गेले आहे.या व्हिडीओला फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ऍपवर देखील व्हायरल केले गेले. आकाईव व्हर्जन इथे पहा.

तपास

विश्वास न्यूजने या आधी ही या व्हिडीओची सत्यता समोर आणली आहे. तपासासाठी आम्ही सगळ्यात आधी सनी देओल यांच्या सोशल मीडिया हॅंडेल्सना स्कॅन केले.आम्हाला त्यांच्या एक्स हॅंडल वर 6 डिसेंबर 2023 मध्ये अपलोड केलेला एक व्हिडीओ मिळाला.या व्हिडीओमध्ये आणि सनी देओलच्या व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांनी एकच प्रकारचे कपडे घातलेले दिसून येते.या व्हिडीओला पाहून हे स्पष्ट समजते की हा शूटिंगचा एक भाग आहे.

तपासाच्या दरम्यान किवर्डच्या मदतीने गुगल ओपन सर्च केल्यावर आम्हाला एनडिटीव्हीच्या वेबसाईटवर एक बातमी मिळाली. यात सनी देओलच्या व्हायरल  व्हिडीओचा स्क्रीनशॉट आणि फुटेजचा वापर करून फिल्मच्या शूटिंग विषयी सांगितले गेले. या बातमीत आम्हाला सनी देओलच्या एक्स हँडलवर असलेल्या व्हिडीओची लिंक ही मिळाली.या बातमीला इथे विस्तीर्णपूर्वक वाचू शकता.

विश्वास न्यूजनी मागच्या तपासणीच्या वेळी चित्रपटाचे निर्माते विशाल राणा यांच्याशी संपर्क केला होता. त्यांनी ही व्हायरल व्हिडीओबद्दल सांगितले होते की हा व्हिडिओ शुटिंगचा असून हा व्हिडिओ रात्रीच्या वेळचा आहे. चित्रपटाचे नाव कदाचित ‛ सफर’ असेल.

मागचा तपास विस्तृतपणे इथे वाचू शकता.

शेवटी आम्ही व्हायरल व्हिडीओ शेअर करणाऱ्या Shalim Khan नावाच्या इन्स्टाग्राम हँडलची सोशल स्कॅनिंग केली याच युजरने सनी देओलचा व्हिडीओ स्वतःच्या अकाऊंटवर पोस्ट केला होता. हे अकाऊंट 25 नोहेंबरला बनवले गेले आहे. 

  • Claim Review:  सनी देओलची वाईट अवस्था
  • Claimed By: IG User Shalim Khan
  • Fact check:  भ्रामक

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल पोस्ट भ्रामक आहे हे सिद्ध झाले आहे.सनी देओलच्या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडिओ भ्रामक दावा करून व्हायरल केला जात आहे.

  • Claim Review : सनी देओलची वाईट अवस्था
  • Claimed By : IG User Shalim Khan
  • Fact Check : Misleading

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later