
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्युज ला विविध सोशल मीडिया वेबसाईट्स आणि व्हाट्सअँप वर एक दावा मराठीत व्हायरल होताना दिसला. दाव्यात सांगण्यात येत आहे कि जगन्नाथ पुरी मंदिर मध्ये एक शालिग्राम बाहेर काढण्यात आला आहे. असे सांगण्यात येत आहे कि हा शालिग्राम पृथ्वी वर महामारी आल्यानंतर बाहेर काढण्यात येतो, आणि १९२० साली या आधी तो बाहेर काढला गेला होता. हे दृश्य दुर्लभ आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा व्हायरल दावा खोटा ठरला.
काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला व्हायरल दावा फेसबुकवर छायाचित्र आणि व्हिडिओ स्वरूपात सापडला.
फेसबुक पेज, ‘माझे पान’ यांनी एक शालिग्राम चे छायाचित्र शेअर केले आणि लिहले, “जगन्नाथ पुरी येथील शालीग्राम आहे, पृथ्वीवर महामारी आल्यास बाहेर दर्शनासाठी काढला जातो.
1920 साली काढला होता. आता 2020 चालुवर्षी काढला आहे.“
हि व्हायरल पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तसेच आम्हाला हा दावा व्हिडिओ स्वरूपात देखील सापडला.
‘MAA Vighneshwari – Kotavad’ या फेसबुक पेज वर देखील हा दावा शेअर करण्यात आला आहे.
हि पोस्ट आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने या दाव्याचा तपास एका सध्या कीवर्ड सर्च ने केली. आम्ही विविध कीवर्ड वापरल्यानंतर, आम्हाला न्यू इंडियन एक्सप्रेस वेबसाईटवर एक बातमी सापडली. न्युज चं टायटल होतं, “Puri temple deity comes out to ward off disease” (पुरी मंदिर ची देवता सगळ्या आजारांना दूर करायला बाहेर आली). या संपूर्ण बातमीत आम्हाला कुठेच शालिग्राम चा उल्लेख नव्हता. हि बातमी ३० मार्च २०२० रोजी प्रकाशित करण्यात आली होती. हि संपूर्ण बातमी इथे वाचा.
याच पोस्ट मध्ये अजून एक दावा केला आहे, तो म्हणजे, या आधी हा शालिग्राम १९२० मध्ये बाहेर काढण्यात आला होता. पण १९२० मध्ये महामारी नव्हती. सेंटर फॉर डिसिस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन प्रमाणे, “१९१८ मध्ये एच १ एन १ फ्लू महामारी, ज्याला स्पॅनिश फ्लू देखील म्हणण्यात येते त्यांने ५० मिलियन लोकांचा जीव घेतला होता. ज्यात ६७५,००० लोकं हे अमेरिकेचे होते. १५ ते ३४ या वयोगटातील लोकांचा यात मृत्यू झाला होता.”
हि पूर्ण रिपोर्ट इथे वाचा.
शेवटी आम्ही ओडिशाच्या जगन्नाथ पुरी मंदिरातील पुजारींना संपर्क केला. विश्वबासु बिनायकदास महापात्रा यांनी विश्वास न्यूज सोबत बोलताना सांगोतले, “जगन्नाथ पुरी चे शालिग्राम सांगून, छायाचित्र आणि व्हिडिओ खूप दिवस झाले व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. महामारी च्या वेळी जगन्नाथ पुरी मंदिरात शालिग्राम बाहेर काढला जात नाही, भगवान नृसिंघ बाहेर काढले जातात.”
शेवटी आम्ही, ज्या फेसबुक पेज ने हा दावा शेअर केला त्या पेज चे सोशल बॅकग्राऊंड चेक केले. व्हायरल छायाचित्र पेज वर ५ जुलै रोजी अपलोड करण्यात आले होते, ह्या छायाचित्राला आता पर्यंत, ४६०० लाईक्स आहे आणि या पेज ला १,०५६,८४७ लोकं फोल्लो करतात.
निष्कर्ष: जगन्नाथ पुरी मंदिरात महामारी च्या काळात शालिग्राम बाहेर काढण्यात आला नाही, सोशल मीडिया वरचे व्हायरल दावे खोटे आहे.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.