X

Fact Check: २०१८ चा सर्वे आता होत आहे व्हायरल, पोस्ट खोटी आहे

  • By Vishvas News
  • Updated: November 11, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): मध्य प्रदेशच्या उपचुनाव च्या निकालाच्या मध्ये सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्ट मध्ये एबीपी न्यूज च्या नावाने एक कथित न्यूज शेअर केली जात आहे. यात एका पोल च्या माध्यमातून लिहले गेले आहे कि बीजेपी च्या हातातून मध्य प्रदेश गेले.

विश्वास न्यूज ने याचा तपास केला. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी ठरली. एबीपी न्यूज च्या एका जुन्या पोल चे छायाचित्र आता काही लॉग खोट्या डाव्यांसह दाव्यांसह व्हायरल करत आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर आमिर खान यांने ३ नोव्हेंबर रोजी एक पोस्ट अपलोड केले होते, त्यात लिहले होते, “मंगलवार के दिन चुनाव की तारीखों का ऐलान मंगलवार के दिन ही वोटिंग और मंगलवार के दिन ही काउंटिंग होगी। इसमें मंगलवार के दिन अंतिम बीजेपी की हार हो गई हो गई और कमलनाथ अपनी सरकार कांग्रेस के पक्ष में बनाएंगे जय-जय कमलनाथ जय जय कांग्रेस पार्टी।

अर्थात: मंगळवारी निवडणुकांची तारीख जाहीर हुन, मंगळवारी निवडणूक आणि मंगळवारीच मतमोजणी होणार आहे. यात शेवटी मंगळवारीच भाजप चे पराभव होईल आणि काँग्रेस आपली सरकार बनवील, जय जय कमलनाथ, जय जय काँग्रेस पार्टी.
व्हायरल पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात, इंटरनेट सर्च पासून केली. बरेच वेगळे वेगळे कीवर्डस वापरून त्यांना गूगल आणि यूट्यूब वर सर्च केले. शेवटी आम्हाला या बातमीचा खरा पोस्ट मिळालाच. एबीपी न्यूज च्या यूट्यूब चॅनेल वर ७ डिसेंबर २०१८ रोजी अपलोड केलेल्या एका व्हिडिओ मध्ये आम्हाला सत्य काय ते कळले.

खरे तर २०१८ साली मध्य प्रदेश च्या विधान सभा निवडणुकांच्या वेळी एबीपी न्यूज ने एक एग्झिट पोल केला होता. त्या एग्झिट पोलचे छायाचित्र आता व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्ये २.५० मिनीटांनी व्हायरल झालेले छायाचित्र या व्हिडिओ मध्ये दिसते, जे आता व्हायरल होत आहे.

या शिवाय आम्हाला गूगलवर अशी कुठलीच बातमी मिळाली नाही ज्यात अश्या कुठल्या सर्वे बद्दल सांगितले गेले आहे.

तपासानंतर आम्ही एबीपी न्यूज च्या सिनियर एडिटर ला संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हि पोस्ट खोटी आहे. २०१८ च्या विधान सभा निवडणुकांचा सर्वे आता व्हायरल केला जात आहे.

विश्वास न्यूज ने खोटा पोस्ट करणाऱ्या यूजर चे अकाउंट ला स्कॅन केले. प्रोफाइल वर शेअर केलेल्या माहिती प्रमाणे, यूजर मध्य प्रदेश च्या शिवपुरी चे रहिवासी आहे. फेसबुक यूजर आमिर खान एका विशिष्ट पार्टी ने प्रभावित आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी ठरली. एबीपी न्यूज चा जुना सर्वे आता मध्य प्रदेश च्या आताच्या उपचुनाव ला जोडून व्हायरल केला जात आहे.

  • Claim Review : मंगळवारी निवडणुकांची तारीख जाहीर हुन, मंगळवारी निवडणूक आणि मंगळवारीच मतमोजणी होणार आहे. यात शेवटी मंगळवारीच भाजप चे पराभव होईल आणि काँग्रेस आपली सरकार बनवील, जय जय कमलनाथ, जय जय काँग्रेस पार्टी.
  • Claimed By : Amir Khan
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later