X

Fact Check: विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्याचा उत्तर प्रदेश सरकारचा दावा खोटा; एडिटेड ब्रेकिंग प्लेट व्हायरल

विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. हे व्हायरल चित्र एडिटिंग सॉफ्टवेअरद्वारे संपादित करून तयार करण्यात आले आहे.

  • By Vishvas News
  • Updated: November 20, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): एका हिंदी वृत्तवाहिनीच्या ब्रेकिंग प्लेटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेशचे योगी सरकार बजेटच्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार नाही, असा दावा केला जात आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा निघाला. व्हायरल होत असलेली ब्रेकिंग प्लेट बनावट आणि एडिटेड आहे, जी चुकीच्या दाव्याने सोशल मीडियावर पसरवली जात आहे.

काय होत आहे व्हायरल?
व्हायरल ब्रेकिंग न्यूज प्लेट शेअर करत, ट्विटर युजर अनिल परमार ने लिहिले, ‘छात्र विरोधी योगी जी लोगों को धर्म के नाम पर उलझाते हुए प्रदेश को अनपढ़ बनाने का साजिस तो नहीं रच रहे!’

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
या पोस्टच्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने गुगलवर अनेक कीवर्ड सर्च केले, पण आम्हाला व्हायरल दाव्याशी संबंधित कोणताही मीडिया रिपोर्ट सापडला नाही. त्यानंतर आम्ही उत्तर प्रदेश सरकारचे सोशल मीडिया अकाउंट स्कॅन करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, आम्हाला उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हायरल दाव्याशी संबंधित अनेक ट्विट आढळले. ट्विटमध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे, उत्तर प्रदेश सरकार सातत्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करत आहे. ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, योगी सरकार वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये शिष्यवृत्ती देत ​​आहे.

आम्ही कीवर्डसह गूगल वर व्हायरल पोस्टमध्ये केलेला दावा शोधला. पण व्हायरल दाव्याला पुष्टी देणारी कोणतीही अधिकृत बातमी कुठल्याच वेबसाइटवर आम्हाला अशी सापडली नाही. व्हायरल पोस्टमध्ये एबीपी न्यूजची ब्रेकिंग प्लेट असल्याने, आम्ही एबीपी न्यूजचे यूट्यूब चॅनेल आणि त्यांची वेबसाइट देखील पाहिली, पण अशी कोणतीही बातमी आम्हाला कुठेही मिळाली नाही.

आम्ही एबीपी न्यूजच्या न्यूज रूममढील पत्रकारासोबत व्हायरल होत असलेली ब्रेकिंग प्लेट शेअर केली. ते म्हणालेत, ‘ त्या प्लेट मध्ये वापरलेला फॉण्टचं हे सांगण्यास पुरेसे आहे कि हि प्लेट एडिट केली आहे.”

ह्या आधी देखील ABP News च्या नावाने व्हायरल झालेल्या व्हायरल ट्विट चा विश्वास न्यूज ने तपास केला होता.

व्हायरल पोस्ट खोट्या दाव्यासह शेअर केलेल्या ट्विटर प्रोफाइल ला 185 लोकं फॉलो करतात. हा प्रोफाइल ऑक्टोबर मध्ये बनवण्यात आला.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. हे व्हायरल चित्र एडिटिंग सॉफ्टवेअरद्वारे संपादित करून तयार करण्यात आले आहे.

  • Claim Review : छात्र विरोधी योगी जी लोगों को धर्म के नाम पर उलझाते हुए प्रदेश को अनपढ़ बनाने का साजिस तो नहीं रच रहे!’
  • Claimed By : Anil Parmar
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later