X

Fact Check: ‘महिला दिनाच्या’ अवसर वर Amazon च्या नावावर व्हायरल होत असलेला मेसेज खोटा

विश्वास न्यूज च्या तपासात समोर आले कि ऍमेझॉन च्या नावावर व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे. ह्याचा ऍमेझॉन सोबत काई संबंध नाही. अनवेरिफाइड आणि क्लिकबेट लिंक वर क्लीक करणे धोकादायक ठरू शकते.

  • By Vishvas News
  • Updated: March 7, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): व्हाट्सअँप वर एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. हा मेसेज ऍमेझॉन ह्या वेबसाईट च्या नावाने व्हायरल होत आहे. ह्या मेसेज मध्ये दावा करण्यात येत माह्ये कि महिला दिनाच्या निमित्ताने ऍमेझॉन हि कंपनी महिलांना मोफत भेटवस्तू देत आहे. ह्या सोबत एक लिंक देखील शेअर करण्यात येत आहे. विश्वास न्यूज ला आपल्या तपासाच्या वेळी व्हाट्सअँप वर देखील हा दावा मिळाला. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?

व्हाट्सअँप वर एक मेसेज व्हायरल होत आहे. एका यूजर ने देखील आमच्या व्हाट्सअँप चॅट बोट वर हा मेसेज फॅक्ट चेक साठी पाठवला. ह्या मेसेज वर लिहले होते: ‘AMAZON International Women’s Day giveaway’
पोस्ट सोबत लिंक वर क्लीक करण्यास सांगण्यात आले आहे.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी पोस्ट सोबत शेअर करण्यात आलेल्या लिंक वर क्लीक केले. आम्हाला कळले कि लिंक फक्त मोबाईल वरच ओपन होते, लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर नाही. क्लीक केल्यावर अधिकृत ऍमेझॉन ची लिंक उघडत नाही.

आम्ही रेलेवंट किवर्डस सोबत (Amazon Women’s Day Giveaway) च्या मदतीने इंटरनेट वर शोधले. आम्हाला असा कुठलाच giveaway सापडला नाही. ऍमेझॉन ने जर का असा कुठला giveaway घेतला असता तर नक्कीच काही अधिकृत मीडिया ऑर्गनायझेशन ने हे कव्हर केले असते.

आम्ही ह्या संबंधी सरळ ऍमेझॉन सोबत संपर्क केला. आम्ही ऍमेझॉन कस्टमर केअर नंबर वर काव्या नावाच्या एग्जीक्यूटिव सोबत बोललो आणि त्याबद्दल विचारले. त्यांनी सांगितले कि, “ऍमेझॉन नि अश्या कुठल्याच giveaway चे आयोजन केले नाही, अश्या कुठल्याच लिंक वर क्लीक करू नये.”

आम्ही ह्या विषयी अधिक माहिती साठी साइबर सुरक्षा विशेषज्ञ तसेच राजस्थान सरकार चे पब्लिक ग्रीवांस कमेटी चे पूर्व आईटी सलाहकार आयुष भारद्वाज ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले, “ह्याला क्लीक-बेट असे म्हणतात, ज्याद्वारे लोकांना लॉटरी वगरे ची लालूच देऊन वेबसाईट वर जास्ती वेळेकरता एंगेज करण्यात येते. असे केल्यास त्यांना ऍड दाखवण्यात येते. ती ऍड देखील वेबसाईट च्या विविध पेज वर दाखवण्यात येते आणि सर्वे च्या नावावर लोकांना विविध वेबसाईट वर फिरवण्यात येते. हे पे पर व्यू वर आधारित असते. ह्याचा अर्थ सायबर अपराधी पर व्यू पैसे कमावतात.”
आयुष भारद्वाज ने जनतेला अश्या लिंक्स वर क्लीक करण्यास मनाई केली आहे.
त्यांनी म्हंटले, “बरेच वेळा ह्या वेबसाईट आंतरराष्ट्रीय अपराधी बनवतात. त्यांचा उद्देश यूजर च्या मोबाईल मध्ये मालवेअर टाकणे असते. त्यानंतर जेव्हा यूजर लॉगिन करून स्वतःचे क्रेडेन्शिअल टाकतो तेव्हा त्यांचे पासवर्ड किंवा नेटबँकिंग आयडी चोरण्यात येते. हे सॉफ्टवेअर अपराध्यांना अगदी कमी वेळात हि संपूर्ण माहिती टेक्स्ट फॉर्म मध्ये पाठवतात.”

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात समोर आले कि ऍमेझॉन च्या नावावर व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे. ह्याचा ऍमेझॉन सोबत काई संबंध नाही. अनवेरिफाइड आणि क्लिकबेट लिंक वर क्लीक करणे धोकादायक ठरू शकते.

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later