X

Fact Check: ओवैसि नहि, पिएम मोदी यांचे स्वागत करत आहेत अमित शाह

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी ठरली. पीएम नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांचे चित्र एडिट करून तिथे ओवैसी ह्यांचे चित्र एडिट करण्यात आले आहे.

  • By Vishvas News
  • Updated: September 18, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): उत्तर प्रदेश च्या विधानसभा निवडणुकांमध्ये एआईएमआईएम सक्रिय झाला आहे, अश्यातच असदुद्दीन ओवैसी ला घेऊन बऱ्याच प्रकारच्या फेक न्यूज देखील व्हायरल होत आहे. एक चित्र आता व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात असदुद्दीन ओवैसी हे केंद्रीय मंत्री अमित शाह दिसत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट सोबत केलेला दावा खोटा असल्याचे कळले. खऱ्या चित्रात अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसतात. असदुद्दीन ओवैसी आणि अमित शाह ह्यांचे चित्र मॉर्फ केलेले असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर अजय शर्मा ने असदुद्दीन ओवैसी आणि अमित शाह ह्यांचे एक एडिटेड चित्र शेअर केले आणि सोबत लिहले: राहुल गांधी जी से मिलते हुए ओवैसी, राहुल गाँधी जी ने सिर झुका कर स्वागत किया !!!
ह्या चित्राला खरे समजून बाकी लोकं देखील ह्याला शेअर करत आहे. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल चित्राच्या तपासाची सुरुवात गूगल रिव्हर्स इमेज द्वारे केली. ह्या टूल च्या माध्यमाने आम्हाला खरे चित्र बिजनेस टुडे च्या वेबसाईट वर मिळाले. 20 ऑक्टोबर 2014 रोजी एका बातमीत ह्या चित्राचा वापर करण्यात आला होता. ओरिजिनल चित्रात ओवैसी च्या जागी पीएम मोदी आहेत. कॅप्शन मध्ये सांगितले गेले होते कि 19 ऑक्टोबर 2014 मध्ये पीएम मोदी ह्यांचे स्वागत करताना अमित शाह. खरे चित्र इथे बघा. बातमीत सांगितले गेले होते कि 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक जिंकल्यावर दिसून येते कि मोदी यांची जादू कायम आहे.

तपासाच्या दरम्यान आम्हाला ओरिजिनल चित्र गेटी इमेजस वर देखील दिसले. हे चित्र सज्‍जाद हुसैन नावाच्या फोटो जर्नलिस्‍ट ने काढले होते. ह्यात सांगितले होते कि 19 ऑक्टोबर 2014 मध्ये भाजप च्या संसदीय बोर्ड च्या मीटिंग मध्ये पीएम नरेंद्र मोदी ह्यांचे स्वागत करण्यास अध्यक्ष अमित शाह पोहोचले.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात, विश्वास न्यूज ने फोटो जर्नलिस्‍ट सज्‍जाद हुसैन ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल चित्र एडिट केले आहे. खऱ्या चित्रात नरेंद्र मोदी आहेत. हे चित्र जुन्या भाजप ऑफिस चे आहे.

शेवटी आम्ही व्हायरल पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. आम्हाला कळले कि फेसबुक यूजर अजय शर्मा एका राजनेतिक काळासोबत जुडलेले आहे. त्यांना सोशल मीडिया वर 74 हजार पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी ठरली. पीएम नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांचे चित्र एडिट करून तिथे ओवैसी ह्यांचे चित्र एडिट करण्यात आले आहे.

  • Claim Review : अमित शाह सोबत ओवैसि
  • Claimed By : फेसबुक यूजर अजय शर्मा
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later