Fact Check: ब्रिटन ची राणी एलिझाबेथ चे हे चित्र एडिटेड आहे
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल चित्र एडिटेड आहे. खऱ्या चित्रात राणी एलिझाबेथ ह्या इंग्रजी अभिनेते साइमन रसेल बील ह्यांना नाईट ची उपाधी देत आहेत.
- By Vishvas News
- Updated: May 6, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका चित्रात महाराणी एलिझाबेथ एका मांजरीला नाइटहुड उपाधी देताना दिसतात. पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि राणी ने रूबेन नावाच्या मांजरीला नाईट ची उपाधी दिली. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल चित्र एडिटेड आहे. खऱ्या चित्रात त्या इंग्रजी अभिनेता साइमन रसेल बील ह्यांना नाइट ची उपाधी देत आहेत.
काय होत आहे व्हायरल?
व्हायरल चित्रात राणी एलिझाबेथ एका मांजरीला नाइटहुड उपाधी देताना दिसतात. पोस्ट मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिहले आहे: “#RubenTheCat “I am very proud to finally announce that I have become the first cat to be awarded honours by Her Majesty Queen Elizabeth II. Love, Sir Ruben J. Cat, KBE”
विश्वास न्यूज ला आपल्या फॅक्ट चेकिंग व्हाट्सअँप बोट वर देखील हा दावा फॅक्ट चेक करता मिळाला (+91 95992 99372).
व्हायरल पोस्ट ची आर्काइव्ह लिंक इथे बघा.
तपास:
आपल्या तपासाची सुरुवात आम्ही गूगल रिव्हर्स इमेज पासून केली. आम्हाला हे चित्र paimages.co.uk वर दिसले. पण इथे कुठलीच मांजर नव्हती पण एक व्यक्ती होता. सोबत डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते, Sir Simon Russell Beale is made a Knight Bachelor of the British Empire by Queen Elizabeth II at Buckingham Palace. PRESS ASSOCIATION Photo. Picture date: Thursday October 10, 2019. Photo credit should read: Yui Mok/PA Wire”

आम्हाला डिस्क्रिप्शन सोबत हे चित्र alamy.com च्या वेबसाईट वर दिखील सापडले.
आम्हाला हे चित्र belfasttelegraph.co.uk च्या एका बातमीत डिस्क्रिप्शन सह सापडले.
आम्ही अधिक माहिती साठी ब्रिटिश रॉयल फॅमिली च्या मीडिया ऑफिस ला मेल द्वारे संपर्क केला आहे. उत्तर येताच हि स्टोरी अपडेट करण्यात येईल.
ह्या पोस्ट ला फेसबुक वर Chandrima Chatterjee ह्यांनी शेअर केले होते. यूजर कोलकाता चे रहिवासी आहेत आणि त्यांचे 170 फॉलोवर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल चित्र एडिटेड आहे. खऱ्या चित्रात राणी एलिझाबेथ ह्या इंग्रजी अभिनेते साइमन रसेल बील ह्यांना नाईट ची उपाधी देत आहेत.
- Claim Review : #RubenTheCat “I am very proud to finally announce that I have become the first cat to be awarded honours by Her Majesty Queen Elizabeth II. Love, Sir Ruben J. Cat, KBE”
- Claimed By : Chandrima Chatterjee
- Fact Check : False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
-
Whatsapp 9205270923
-
Email-Id contact@vishvasnews.com