X

Fact check: नागपूर चा सांगून व्हायरल होणारा व्हिडिओ, दल लेक चा आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल व्हिडिओ नागपूर च्या फुटाळा तलावाचा नसून, दल लेक श्रीनगर चा असल्याचे सिद्ध झाले.

  • By Vishvas News
  • Updated: November 1, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक व्हिडिओ विविध सोशल नेटवर्किंग वेबसाईट वर व्हायरल होताना दिसला. व्हिडिओ मध्ये एका तलावावर लाईट शो सुरु असल्याचे दिसतात. यूजर्स दावा करत आहे कि हा व्हिडिओ फुटाळा तलाव, नागपूर, महाराष्ट्राचा आहे. पण विश्वास न्यूज च्या तपासात सिद्ध झाले कि हा व्हिडिओ, दल लेक, श्रीनगर चा आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, Sunil Domkundwar ने एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यावर तलावावर लाईट शो असल्याचे दिसते.
यूजर ने मराठीत लिहले, ““फुटाळा तलाव (नागपूर) पहिली झलक

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज च्या तपासाच्या पहिल्या टप्प्यात, आम्ही फुटाळा तलाव चे ऑनलाईन व्हिडिओ बघितले. व्हिडिओ मधील तलाव व्हायरल व्हिडिओ मधल्यासारखा दिसत होता. पण तलावाच्या पायथ्याशी असलेल्या फरश्या वेगळ्या होत्या.

विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ चे स्क्रीनग्रेब्स घेऊन इन्व्हिड टूल च्या मदतीने शोधले.

आम्हाला असा व्हिडिओ विविध युट्युब चॅनेल वर सापडला.

पण आम्हाला असाच व्हिडिओ युट्युब चॅनेल Auckland Desi वर 20 सप्टेंबर 2021 रोजी अपलोड केलेला दिसला.

व्हिडिओ मध्ये लिहले होते: ‘Laser show at Dal Lake, Srinagar’.

विश्वास न्यूज ने तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, नागपूर च्या एएनआई कॉररेस्पॉण्डेण्ट सौरभ जोशी ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि फुटाळा तलावाच्या रिडेव्हलोपमेंट बद्दल रिपोर्ट्स आहेत पण, ह्या संबंधित प्रक्रिया अजूनही सुरु आहे. फुटाळा तलावावर अजून काम सुरु व्हायचे आहे. लाईट शो फुटाळा तलावावरचा नाही. हा व्हिडिओ नागपूर चा नाही आहे.

विश्वास न्यूज ने शेवटी ज्या सोशल मीडिया यूजर ने हि पोस्ट शेअर केली, त्याचा बॅकग्राऊंड चेक केला. Sunil Domkundwar हे नागपूर चे रहिवासी आहे. त्यांना 138 लोक फॉलो करतात आणि त्यांचे 2390 मित्र आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल व्हिडिओ नागपूर च्या फुटाळा तलावाचा नसून, दल लेक श्रीनगर चा असल्याचे सिद्ध झाले.

  • Claim Review : *
  • Claimed By : Sunil Domkundwar
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later