X

Fact Check: पीएम मोदी ह्यांचा उन्नाव रॅली च्या व्हिडिओ सोबत खोड तोड करून व्हिडिओ केला जात आहे व्हायरल

विश्वास न्यूज ने पीएम मोदी ह्यांच्या व्हायरल व्हिडिओ चा तपास केला, त्यात कळले कि व्हिडिओ सोबत करण्यात आलेला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ एडिटेड आहे. खऱ्या व्हिडिओ मध्ये गर्दी स्पष्ट दिसते.

  • By Vishvas News
  • Updated: February 24, 2022

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): युपी सहित अजून पाच राज्यात विधानसभा निवडणूक होत आहेत. अश्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात पीएम मोदी हे अभिवादन स्वरूप हाथ दाखवताना दिसतात. इंटरनेट वर हा व्हिडिओ शेअर करत लोकं दावा करत आहे कि मोदी रिकाम्या मैदानावर लोकांना हाथ दाखवत आहेत.

विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ चा तपास केला, त्यात कळले कि व्हायरल व्हिडिओ 20 फेब्रुवारी चा आहे, त्या दिवशी त्यांनी भाजप साठी रॅली करून वोट मागितले होते. ह्यासंबंधीतला एक व्हिडिओ लोकं एडिट करून सोशल मीडिया वर व्हायरल करत आहेत. खऱ्या व्हिडिओ मध्ये गर्दी स्पष्ट दिसते. पण व्हायरल व्हिडिओ मधून लोकांना काढण्यात आले आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Tanvir alam Idrisi नि व्हायरल व्हिडिओ शेअर केले आणि लिहले: “मोदी जी किसको देखकर हाथ हिला रहे हद है नौटंकी बाजी की भी उन्नाव यूपी।”
यूजर द्वारे केलेल्या कंटेंट ला जसेच्या तसे प्रस्तुत केले आहे. पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे‘ बघा. अजून एक फेसबुक यूजर Abdul Jabbar ने देखील अशी पोस्ट शेअर केली आहे.

तपास:
व्हायरल व्हिडिओ च्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही किवर्ड सर्च पासून सुरुवात केली, आम्हाला त्यात कळले कि पीएम मोदी ह्यांचा ओरिजिनल व्हिडिओ न्यूज एजेन्सी ANIच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर खरा व्हिडिओ बघायला मिळतो. 20 फेब्रुवारी 2022 रोजी 28 सेकेंड चा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला त्यात गर्दी स्पष्ट दिसते. कॅप्शन मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे उन्नाव मध्ये पीएम नरेंद्र मोदी ह्यांचे स्वागत करण्यासाठी हेलिपॅड आणि आजूबाजूच्या गावंच्यावर गर्दी दिसून आली. ह्याद्वारे स्पष्ट झाले आहे कि ओरिजिनल व्हिडिओ ला एडिट करून हा शेअर करण्यात आला आहे.

तपासाच्या वेळी आम्हाला भाजप च्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर देखील उन्नाव मधील रॅली चे अन्य व्हिडिओ देखील मिळाले. व्हिडिओ मध्ये गर्दी स्पष्ट दिसते.

अधिक माहिती साठी आम्ही जनसभा कव्हर करणाऱ्या दैनिक जागरण च्या उन्नाव च्या चीफ रिपोर्टर अंकित मिश्रा ह्यांना संपर्क केला. आम्ही व्हायरल व्हिडिओ त्यांना व्हाट्सअँप द्वारे पाठवला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल दावा खोटा आहे. पीएम मोदी जेव्हा हेलिपॅड ने उन्नाव मध्ये उतरले तिथे बरीच गर्दी होती. लोक आपापल्या गच्चीवर त्यांना पाहायला जमले होते. लोकांनी पीएम मोदी ह्यांचे स्वागत करण्यास नारे देखील लावले.

विश्वास न्यूज ने शेवटच्या टप्प्यात त्या प्रोफाइल चा तपास केला ज्याने व्हायरल पोस्ट शेअर केली. तपासात आम्हाला कळले कि Tanvir alam Idrisi एका विचारधारेसोबत प्रभावित आहे. यूजर ला सात हजार लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ने पीएम मोदी ह्यांच्या व्हायरल व्हिडिओ चा तपास केला, त्यात कळले कि व्हिडिओ सोबत करण्यात आलेला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ एडिटेड आहे. खऱ्या व्हिडिओ मध्ये गर्दी स्पष्ट दिसते.

  • Claim Review : मोदी जी किसको देखकर हाथ हिला रहे हद है नौटंकी बाजी की भी उन्नाव यूपी
  • Claimed By : Tanvir alam Idrisi
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later