Fact Check: न्यू यॉर्क टाईम्सच्या नावाने लिहिलेली पंतप्रधान मोदींबद्दलची खोटी बातमी सोशल मीडियावर पुन्हा झाली व्हायरल
- By: Umam Noor
- Published: Aug 25, 2025 at 07:31 PM
- Updated: Aug 30, 2025 at 07:37 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, न्यू यॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक वादग्रस्त लेख प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये भारताच्या वाढत्या शक्ती आणि जागतिक रणनीतींबद्दल अनेक दावे केले गेले आहेत. व्हायरल पोस्टला मूळ इंग्रजी लेख मानून तिचे हिंदीमध्ये भाषांतर केले जात आहे.
विश्वास न्यूजने केलेल्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे आढळून आले. न्यू यॉर्क टाईम्समध्ये जोसेफ होप नावाचा कोणताही संपादक नाही किंवा असा कोणताही लेख प्रकाशित झालेला नाही.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
व्हायरल पोस्ट शेअर करताना, फेसबुक वापरकर्त्याने लिहिले आहे, “हे नरेंद्र मोदी कोण आहेत? मोदी हे, दैवी अजरामर हिमालयीन शक्तींनी पाठवलेले दूत आहेत, जे संपूर्ण जगाला एक कुटुंब बनवतील, ते परमपूज्य करपात्री महाराजांच्या शापातून जन्मलेले भगवान वीरभद्र आहेत. * “न्यू यॉर्क टाइम्स” चे मुख्य संपादक “जोसेफ होप” यांनी यावर एक खळबळजनक टिप्पणी केली आहे.. मी त्याची संपूर्ण माहिती तुम्हा सर्वांसमोर सादर करत आहे.. कृपया 2 मिनिटे वेळ काढून काळजीपूर्वक वाचा.. “जोसेफ होप” मोदीजींवर भाष्य करताना म्हणतात की, “या व्यक्तीचा” उदय हा, संपूर्ण “जगासाठी” “धोका” आहे.. त्यांनी फक्त “भारलाच” एक महान देश बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.. त्यांचे एकमेव ध्येय ‘भारताला सर्वात शक्तिशाली बनवणे’ आहे.. जर या व्यक्तीला थांबवले नाही, तर भविष्यात एक दिवस “भारत” जगात खूप शक्तिशाली होईल आणि “अमेरिका” हे पाहून आश्चर्यचकित होईल.. ते एका विशिष्ट रणनीतीचा अवलंब करतात आणि तो पुढे काय करणार आहे, हे कोणालाही माहिती होत नाही. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक धोकादायक देशभक्त लपलेला आहे.. ते जगातील सर्व देशांचा वापर फक्त भारताच्या हितासाठी करतात.. अमेरिकेचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशी असलेले संबंध बिघडवून आणि व्हिएतनामसारख्या शत्रू देशांशी संबंध निर्माण करून, मोदींची या तिन्ही देशांचा वापर चीनविरुद्ध करण्याची इच्छा आहे.. व्हिएतनामने दक्षिण चीनच्या दक्षिणेतील समुद्रात तेल काढण्यास सुरुवात केली आहे आणि तो, ते सर्व तेल भारताला पाठवतो. अमेरिकेचे वर्चस्व संपावे म्हणून त्यांनी ‘रिलायंस’ या भारतीय कंपनीला तिथे काम करण्यासाठी पाठवले आहे. आता अमेरिकेचे चीनचा शत्रू व्हिएतनामवर नियंत्रण राहणार आहे, जी भारतासाठी चांगली गोष्ट आहे. “भारतात या” लाँच इंडिया मोहिमेत, चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे, जी भारताला 8 वर्षांतही मिळवता आली नसती.. आता ही व्यक्ती पाकिस्तानला गरिबीमध्ये ढकलत आहे.. अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या पाकिस्तानचा जुना मित्र इराणमध्ये बंदर बांधणे आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर भारतीय लष्करी तळ बांधणे, या बाबींमुळे त्यांनी इराणला असा मार्ग दाखवला आहे की, तो पाकिस्तानला अफगाणिस्तानात अडकवून ठेवून, भारताशी थेट व्यापार करू शकतो.. पाकिस्तानने कलम 2 आणि 3ए रद्द केले होते.. आता पाकव्याप्त काश्मीर देखील भारताच्या ताब्यात येईल.. पाकिस्तानचे चार तुकडे होतील आणि तो फक्त मोदींच्या बोटांवर नाचेल.. पाकिस्तानचा पारंपारिक मित्र सौदी अरेबिया देखील पाकिस्तानला एकाकी पाडण्यात आपली महत्त्वाची भूमिका बजावेल. या व्यक्तीने आशियातील चीन आणि अमेरिकेची भूमिका संपवली आहे आणि सार्क परिषद रद्द करून जगाला आपली शक्ती दाखवून दिली आहे. मोदींनी आशियामध्ये भारताचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यांनी आशियातील दोन महान शक्ती, रशिया आणि जपानसोबत युती केली आहे.. हाँगकाँगमध्ये चीन आपले सामर्थ्य दाखवू शकतो, परंतु मोदी त्याचा “सीपीईसी प्रकल्प” थांबवण्यासाठी चीनव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यास तयार आहेत. मोदींच्या सांगण्यावरून चीन भारतातील आपला 40% हिस्सा सोडण्यास तयार आहे. पण मोदी कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत आणि म्हणूनच ते युद्ध न करता, पाकिस्तानची स्थिती भिकाऱ्यासारखी ठेवू इच्छितात.. याचा परिणाम म्हणून, चीनने पाकिस्तानमध्ये केलेली 62 अब्ज डॉलरची गुंतवणूक वाया जात आहे.. मोदींनी अमेरिकन सरकारमध्ये लाॅबी बनवून भारताला एमटीसीआर गटात समाविष्ट करून घेतले आहे.. मोदी लवकरच न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुपच (एनएसजी) बदलून टाकतील.. मोदींच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला पुढे जाणे कठीण आहे.. या व्यक्तीने भारतीय राजकारणाला एका नवीन पातळीवर नेले आहे. जगाने हे लक्षात घेतले पाहिजे की, प्रत्येक देशाचे अनेक शत्रू देश आहेत, परंतु भारताला आता पाकिस्तान आणि चीनशिवाय दुसरा कोणताही शत्रू नाही. त्यामुळे, पाकिस्तानच्या समस्यांचे निराकरण भारताच्या हातात आहे, हे निश्चित आहे… ही व्यक्ती “सर्जिकल स्ट्राईक” करूनच आपली पकड प्रस्थापित करू शकते.. ही व्यक्ती, कोणत्याही युद्धापेक्षा पाकिस्तानचे जास्त नुकसान करत आहे.. पाकिस्तानविरुद्ध मुस्लिम देशांचा वापर करून मोदींनी स्वतःला जगातील महान नेत्यांपैकी एक असल्याचे सिद्ध केले आहे.. या सर्व गोष्टींमध्ये, या व्यक्तीच्या सचोटीवर लक्ष दिले पाहिजे.. भारताची प्रगती थांबवणे बाकीच्या जगासाठी कठीण होईल.. म्हणूनच मी जगातील सर्व विचारवंतांनी एकत्र येऊन यावर चर्चा करावी आणि काहीतरी उपाय शोधावा या बाजूने आहे.”
पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पाहा.

तपास
आमची चौकशी सुरू करून, आम्ही प्रथम न्यू यॉर्क टाईम्सच्या वेबसाइटवर गेलो आणि ती बातमी शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला येथे व्हायरल पोस्टशी संबंधित कोणताही लेख किंवा माहिती सापडली नाही. तथापि, जेव्हा आम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने शोध घेतला, तेव्हा आम्हाला त्यांच्याशी संबंधित अनेक बातम्या आढळल्या.
आमचा तपास पुढे नेत, आम्ही न्यू यॉर्क टाईम्स वेबसाइटच्या आवर पीपल विभागात जोसेफ होपबद्दल शोध घेतला. या विभागात न्यू यॉर्क टाईम्सशी संबंधित संपादक आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांची माहिती होती, परंतु त्यात जोसेफ होपचे नाव कुठेही दिसले नाही.
पुढील तपासात, आम्ही न्यू यॉर्क टाईम्सचे सोशल मीडिया हँडल देखील स्कॅन केले, परंतु तिथेही आम्हाला व्हायरल पोस्टसारखा कोणताही लेख सापडला नाही.
न्यू यॉर्क टाईम्सचे कथित संपादक जोसेफ होप यांच्या नावाने बनावट पोस्ट व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी नोव्हेंबर 2023 मध्येही अशीच एक पोस्ट व्हायरल झाली होती आणि त्यावेळी आम्ही न्यू यॉर्क टाईम्सशी मेलद्वारे संपर्क साधला होता. न्यू यॉर्क टाईम्सच्या तत्कालीन प्रवक्त्या निकोल टेलर यांनी आमच्या मेलला उत्तर देताना म्हटले होते की, “द न्यू यॉर्क टाईम्समध्ये ‘जॉन होप्स’ किंवा ‘जोसेफ होप’ नावाची कोणतीही व्यक्ती नाही. द न्यू यॉर्क टाईम्समध्ये जोसेफ होप नावाचा कोणताही कर्मचारी नाही.”
याआधीही एका वर्तमानपत्रातील कटिंग अनेक वेळा व्हायरल झाले आहे आणि त्याच खोट्या दाव्यासह शेअर केले गेले आहे. आमचे फॅक्ट चेक येथे वाचा.
आता फेक पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक युजरचे सोशल स्कॅनिंग करण्याची पाळी होती. आम्हाला आढळले की, सुमारे साडेसहा हजार लोक या वापरकर्त्याला फॉलो करतात. त्याच वेळी, या प्रोफाइलवरून एका विशिष्ट विचारसरणीने प्रेरित पोस्ट शेअर केल्या जातात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे आढळले. न्यू यॉर्क टाईम्समध्ये जोसेफ होप नावाचा कोणताही संपादक नाही किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल असा कोणताही वादग्रस्त लेख प्रकाशित झालेला नाही.
- Claim Review : न्यू यॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक वादग्रस्त लेख प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये भारताच्या वाढत्या शक्ती आणि जागतिक रणनीतींबद्दल अनेक दावे केले गेले आहेत.
- Claimed By : FB User- संदीप गुरु
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.











