X

Fact Check: पूर्व पन्तप्रधान मनमोहन सिंह यांच्या नावाने बनलेल्या जुन्या खोट्या अकाउंट वरचे ट्विट खरे समजून होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह ह्यांच्या नावाने व्हायरल होत असलेला ट्विट फेक असल्याचे समजले. ते सोशल मीडिया वर नाहीत.

  • By Vishvas News
  • Updated: August 23, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर परत एकदा पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नावाने बनलेल्या एका फेक ट्विटर अकाउंट वरून फेक ट्विट व्हायरल होत आहे. ह्याला व्हायरल करून दावा करण्यात येत आहे कि सध्याच्या पीएम वर कटाक्ष ठेऊन हे ट्विट करण्यात आले आहे कि जो माणूस एयरपोर्ट, बीएसएनएल आणि रेल्वे स्टेशन नाही चालवू शकला तो देश काय चालवणार.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, त्यात कळले कि मनमोहन सिंह यांच्या नावाने बनलेल्या एका फेक अकाउंट वरच्या ट्विट ला लोकं आता व्हायरल करत आहेत. पूर्व प्रधानमंत्री सोशल मीडिया वर नाही. या आधी देखील त्यांच्या नावाने फेक ट्विट व्हायरल होत होते. ज्याचा विश्वास न्यूज ने तपास देखील केला आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर मानसी सोनी ने 17 ऑगस्ट ला पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांची एक फेक ट्विट पोस्ट करून लिहले: जो पत्‍नी नही चला सका वो देश के चलाएगा।
ह्या ट्विट चा कन्टेन्ट इथे जसा च्या तास दिलेला आहे. हि फेसबुक पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल पोस्ट ची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही आधी @Dr_manmohan_1 नावाचा ट्विटर हॅन्डल सर्च करण्यास सुरु केले. आम्हाला ह्या नावाचा एक ट्विटर हॅन्डल सापडला (https://twitter.com/Dr_manmohan_1). जून 2021 मध्ये बनवला गेला होता आणि त्याचे बेचाळीस हजार फॉलोवर्स आहेत. हा एक पेरोडी अकाउंट आहे. तो तुम्ही इथे बघू शकता. आम्हाला कळले कि यूजर्स ह्या अकाउंट वरून केलेल्या ट्विट ला खरे समजून शेअर करत आहेत. असे बरेच ट्विट आम्हाला मिळाले, ज्याची भाषा नीट नव्हती.

व्हायरल पोस्ट ला घेऊन विश्वास न्यूज ने काँग्रेस चे राष्‍ट्रीय सचिव (मीडिया) प्रणव झा यांना संपर्क केला. त्यांच्या सोबत आम्ही व्हायरल पोस्ट शेअर केली. त्यांनी सांगितले कि पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे सोशल मीडिया वर अकाउंट नाही.
तपासाच्या अंतिम टप्प्यात विश्वास न्यूज ने फेसबुक यूजर मानसी सोनी ची प्रोफाईल तपासली, त्यात कळले कि ह्या यूजर ला 4.9 हजार पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात. यूजर अहमदाबाद ची रहिवासी आहे. हा अकाउंट सप्टेंबर 2017 मध्ये बनवण्यात आला. त्या एका विशिष्ट राजनेतिक दलासोबत संबंधित आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह ह्यांच्या नावाने व्हायरल होत असलेला ट्विट फेक असल्याचे समजले. ते सोशल मीडिया वर नाहीत.

  • Claim Review : मनमोहन सिंह यांचे ट्विट
  • Claimed By : फेसबुक यूजर मानसी सोनी
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later