X

Fact Check: आईएफएस स्नेहा दुबे ने नाही केले पत्रकारांना घेऊन हे ट्विट, व्हायरल पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल ट्विट खोटे असल्याचे कळले. स्नेहा दुबे ने व्हायरल ट्विट नाही केले, ते एका पेरोडी अकाउंट वरून करण्यात आले आहे.

  • By Vishvas News
  • Updated: September 30, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): संयुक्त राष्ट्र (यूएनजीए) मध्ये भारताला रेप्रेझेन्ट करताना स्पीच देणाऱ्या आइएफएस स्नेहा दुबे ह्यांच्या नावावर सध्या एक ट्विट व्हायरल होत आहे. ह्या स्क्रीनशॉट मधील ट्विटर हॅन्डल वर त्यांचे नाव वापरले गेले आहे, तसेच त्यांचे एक चित्र देखील लागले आहे. आणि ट्विट मधील चित्रात पत्रकार अंजना ओम कश्यप ह्यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीचे व्हिडिओ वापरण्यात आले आहे. ह्या ट्विट चा स्क्रीनशॉट असे सांगून व्हायरल करण्यात येत आहे कि स्नेहा दुबे ह्यांनी पत्रकारांवर ट्विट केले. जेव्हा विश्वास न्यूज ने ह्या ट्विट चा तपास केला तेव्हा कळले कि हा ट्विट खोटा आहे, ह्याला स्नेहा दुबे ह्यांनी ट्विट केले नाही, त्यांच्या नावाच्या एका पेरोडी अकाउंट ने हा ट्विट केला आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर ‘अनीता सकसेना’ ह्यांनी ह्या ट्विट चा स्क्रीनशॉट शेअर केला ज्यात व्हिडिओ होता आणि सोबत लिहले: ‘देश के पत्रकारों को विदेश में भारत का मान रखना सीखना होगा। हर जगह अपना माइक लेकर नहीं जाया जा सकता है।’ ट्विट ची तारीख, 25 सप्टेंबर 2021 अशी होती.
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
आमच्या तपासाची सुरुवात आम्ही व्हायरल स्क्रीनशॉट मध्ये असलेल्या यूजरचे हॅन्डल @SnehaDubey_ ट्विटर वर शोधले. सर्च मध्ये आम्हाला ह्या नावाचे एक हॅन्डल मिळाले, पण ह्यावर ना स्नेहा दुबे चे चित्र होते आणि ना Sneha Dubey IFS लिहले होते. ह्या अकाउंट प्रमाणे हा एक पेरोडी अकाउंट होता,जो सप्टेंबर 2021 मध्ये बनवण्यात आला होता.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही स्नेहा दुबे ने पत्रकारांबद्दल कुठले ट्विट केले का हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. सर्च मध्ये आम्हाला ऑफिशियली त्यांच्याकडून कुठलेच ट्विट केलेले दिसले नाही.

व्हायरल ट्विट संबंधी माहिती साठी विश्वास न्यूज ने आपले सहयोगी दैनिक जागरण च्या नेशनल ब्यूरो मध्ये मिनिस्ट्री कव्हर करणारे असिस्टेंट एडिटर संजय मिश्रा ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि स्नेहा दुबे ने असा कुठलाच ट्विट केला नाही. त्या ज्या पोसिशन वर आहे, त्याला लक्षात घेता, त्या असा ट्विट करू शकत नाही, हे गव्हर्मेंट प्रोटोकॉल मध्ये बसत नाही. म्हणून त्यांनी असा ट्विट करणे शक्य नाही.

व्हायरल ट्विट च्या स्क्रीनशॉट मध्ये एक व्हिडिओ आहे. बातम्यांप्रमाणे, रिपोर्टर अंजना ओम कश्यप स्नेहा दुबे ह्यांचा बाईट घ्यायला गेले असताना चा आहे. ह्या बाबतीतल्या बातम्या इथे वाचा.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही फेसबुक यूजर अनीता सकसेना ह्यांचे सोशल स्कँनिंग केले. त्यात कळले त्या दिल्ली च्या रहिवासी आहे आणि त्यांना अकरा हजार लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल ट्विट खोटे असल्याचे कळले. स्नेहा दुबे ने व्हायरल ट्विट नाही केले, ते एका पेरोडी अकाउंट वरून करण्यात आले आहे.

  • Claim Review : Viral tweet by Sneha Dubey
  • Claimed By : Anita Saxena
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later