X

Fact Check: व्हायरल होत असलेले छायाचित्र गुजरात चे नाही, महाराष्ट्र चे आहे

  • By Vishvas News
  • Updated: April 28, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात जमिनीवर दोन रांगेत काही रुग्ण झोपलेले दिसतात, जेव्हाकी एक रुग्ण पलंगावर दिसतोआणि त्याला सलाईन चढवली जात आहे. दावा केला जात आहे कि छायाचित्र गुजरात च्या तापी जिल्ह्याचे आहे जिथे कोरोनाव्हायरस रुग्णांचा उपचार तंबू मध्ये करण्यात येत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे.
तपासात कळले कि व्हायरल छायाचित्र गुजरात चे नाही महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील एका गावाचे आहे. इथे एका प्रायव्हेट क्लिनिक मध्ये उपचार घेत असलेल्या लोकांचा टेन्ट लावून सलाईन देण्यात येत आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Arshi Raza ने हि पोस्ट शेअर करून लिहले: स्वास्थ्य सेवा का गुजरात मॉडल! देश इसी धोके मे बर्बाद हो रहा है यह सब नटवर लाल के बाप है संघि,, तस्वीर तापी जिले की, जहां कोरोना मरीज़ों का इलाज तंबुओं में हो रहा है। दिन रात चिताए जल रही है
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल छायाचित्राचा तपास सगळ्यात आधी गूगल रिव्हर्स इमेज सर्च ने केली. आम्हाला एका यूजर चा ट्विट मिळाला, ज्यात त्याने पोस्ट मध्ये केलेला दावा चुकीचा असल्याचे सांगितले आणि नवापुर एक्सप्रेस नावाच्या एका चॅनेल चे न्यूज बुलेटिन चे स्क्रीनशॉट शेअर करून लिहले कि हे छायाचित्र महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याचे आहे.

यूजर ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉट मध्ये दिलेल्या नंबर वर जेव्हा आम्ही संपर्क केला तेव्हा आमचे बोलणे नवापुर एक्सप्रेस चे एडिटर सुधीर निकम यांच्यासोबत झाले, त्यांनी सांगितले कि त्यांच्या टीम चे रिपोर्टर, निलेश पाटील ने हि न्यूज कव्हर केली होती. यानंतर आम्ही निलेश यांना संपर्क केला, त्यांनी आम्हाला सांगितले कि हि घटना नंदुरबार जिल्ह्यातील शिवपूर गावातील आहे, जिथे लोकं टाइफाइड चा उपचार करण्यासाठी डॉ. नीलेश वलवी यांच्या क्लिनिक मध्ये पोहोचले होते. जेव्हा हि गोष्ट तिथल्या जिल्ह्याच्या कलेक्टर समोर हि घटना आली. तेव्हा त्यांनी लगेच या रुगांना हॉस्पिटल ला शिफ्ट करून टेन्ट रिकामा करवला.

रिपोर्टर निलेश यांनी आमच्यासोबत दैनिक भास्कर मध्ये छपलेले रिपोर्ट चे छायाचित्र देखील शेअर केले.

अधिक माहिती साठी आम्ही नंदुरबार चे डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर डॉ. किरण मोगे यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हि घटना १९ एप्रिल ची असावी, जेव्हा नंदुरबार च्या शिवपूर गाव चे आहे जेव्हा लोकांचे टेन्ट मध्ये उपचार घेण्याची गोष्ट समोर आली होती. डॉ मोगे यांनी तिथे असलेल्या लोकांचा टायफाइड चा उपचार करत होते. जेव्हाकी, तेव्हा यातील कोणाचाच कोरोना टेस्ट करवल्या गेला नव्हता. नंदुरबार पासून तापी जास्ती दूर नाही आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रमाणे काही रुग्ण तापी मधून देखील आले होते. पण हि घटना महाराष्ट्रातील आहे.

जेव्हाकी, देशातील अन्य राज्यासारखे गुजरात मध्ये देखील हॉस्पिटल मध्ये बेड आणि ऑक्सिजन ची कमी देखील आहे, कोरोना मुले लोकं बेहाल झाले आहेत. महाराष्ट्रामधील स्तिथी देखील यात वेगळी नाही.

आता आम्ही फेसबुक पोस्ट शेअर करणारे यूजर Arshi Raza यांची प्रोफाइल स्कॅन केली. प्रोफाइल ला स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि यूजर उत्तर प्रदेश च्या लखनऊ चे रहिवासी आहे.

निष्कर्ष: आम्हाला हे कळले कि व्हायरल छायाचित्र गुजरात चे नाही, पण महाराष्ट्राचे आहे आणि मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे, छायाचित्रांमध्ये दिसत असलेले लोकं टाइफाइड चा उपचार करत असलेले लोकं आपला उपचार करण्यास पोहोचला होते.

  • Claim Review : गुजरात चे छायाचित्र
  • Claimed By : Arshi Raza
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later