X

Fact Check: इंदोर च्या रंगपंचमी चा व्हिडिओ कोल्हापूर काँग्रेस उमेदवाराचा विजयाचा जल्लोष सांगून व्हायरल

विश्वास न्यूजच्या तपासात कोल्हापूर मधील निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवाराच्या रॅली च्या नावावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्य प्रदेश मधील इंदोर च्या रंगपंचमी चा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: April 25, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म्स वर २६ सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ह्यात मोठ्या संख्येत लोक दिसतात आणि ते रंग उडवताना देखील दिसतात. सोशल मीडिया वर लोकं हा व्हिडिओ कोल्हापूर चा असल्याचे सांगत आहे. काही यूजर्स हा देखील दावा करत आहेत कि हा व्हिडिओ कोल्हापूर विधानसभा निवडणूक मध्ये विजयी झालेल्या काँग्रेस उमेदवार ची रॅली आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारा असल्याचे समजले. व्हिडिओ मध्य प्रदेश च्या इंदोर चा आहे. इंदोर मध्ये रंगपंचमीला मोठ्या संख्येत लोक येतात आणि रस्त्यांवर रंगपंचमी खेळतात. ह्या व्हिडिओचा कोल्हापूर निवडणुकांसोबत काही संबंध नाही.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर मोहस‍िन खान पठान ने 17 एप्रिल रोजी मराठी मध्ये दावा केला: ‘कोल्हापूर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या विजयी उमेदवाराची भव्य मिरवणूक.. जय महाविकास आघाडी।’

फॅक्ट चेकच्या उद्देशाने हि पोस्ट लिहली गेली आहे. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे क्लिक करून बघा. दुसरे यूजर्स देखील हीच पोस्ट मिळत्या जुळत्या दाव्यासह शेअर करत आहे.

तपास:

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला आणि व्हायरल व्हिडिओ InVID टूल मध्ये अपलोड केला. त्यातून आम्हाला बरेच किफ्रेम्स मिळाले. ह्या किफ्रेम्स ला आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोधले. व्हायरल व्हिडिओ आम्हाला न्यूज पुराण नावाच्या वेबसाईट वर मिळाला. 22 मार्च रोजी पब्लिश बातमीत ह्या बातमीत सांगितले गेले कि इंदोर च्या राजवाडा मध्ये रंगपंचमी झाली त्याचा हा व्हिडिओ आहे. पूर्ण बातमी इथे वाचा.

तपासात आम्हाला खरा व्हिडिओ देखील मिळाला. हा व्हिडिओ तुम्ही खाली बघू शकता . ह्याला न्यूज पुराण ट्विटर हॅन्डल वर 22 मार्च 2022 रोजी अपलोड करण्यात आला होता.

संबंधित किवर्डच्या आधारावर आम्ही गूगल ओपन सर्च द्वारे शोध घेतला. तपासावेळी आम्हाला टीवी 9 च्या वेबसाईट वर एक बातमी मिळाली. 16 एप्रिल 2022 रोजी प्रकाशित झालेल्या ह्या बातमीत म्हंटले होते कि महाराष्ट्राच्या कोल्हापुर निवडणुकांमध्ये कांग्रेस उम्‍मीदवार जयश्री जाधव ने भाजपा उम्‍मीदवार सत्‍यजीत कदम ह्यांना हरवले. हि पूर्ण बातमी इथे बघा.

विश्वास न्यूज च्या तपासात आम्ही नईदुनिया डिजिटल, इंदौर चे प्रभारी अरविंद दुबे ह्यांना संपर्क केला. आम्ही त्यांच्या सोबत व्हायरल दावा शेअर केला. त्यांनी सांगितले कि काँग्रेस नेत्यांच्या नावावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंदोर मधील रंगपंचमी चा आहे.

तपासाच्या शेवटच्या टप्य्यात आम्ही फेसबुक पेज मोहस‍िन खान पठान ह्यांची सोशल स्कॅनिंग केली. तपासात आम्हाला कळले कि यूजर महाराष्ट्रातील नांदेड चे रहिवासी आहे. ह्यांच्या पेज ला 13 शे पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात कोल्हापूर मधील निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवाराच्या रॅली च्या नावावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्य प्रदेश मधील इंदोर च्या रंगपंचमी चा आहे.

  • Claim Review : कोल्हापूर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या विजयी उमेदवाराची भव्य मिरवणूक.. जय महाविकास आघाडी।
  • Claimed By : फेसबुक पेज मोहस‍िन खान पठान
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later