
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक लेह मधले भारतीय सेनेच्या जवानांसोबतचे छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे, ज्यात ते दवाखाण्यात भरती असलेल्या जवानांसोबत संभाषण करताना दिसतात. दावा केला जात आहे कि, भारत आणि चीन तणावात जखमी झालेल्या ज्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटले त्यातले एक भरतोय जनता पार्टी चे नेता तेजिंदर पाल सिंह बग्गा आहेत, ज्यांना जखमी जवानांसोबत दवाखाण्यात बसविले गेले आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत दिसत असलेला जवान शीख धर्माचा आहे, पण तो कोणी भाजप नेता नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Vinay Pandey‘ यांनी व्हायरल छायाचित्र शेअर केले (अर्काइव्ह लिंक) आणि त्यात लिहले,”क्या ये बग्गा ही बैठा है घायल फौजी बनकर आप लोग बताये तस्वीरों को देखकर।”
अर्थात: “जखमी फौजी असलेला बग्गा ता नाही, तुम्हीच सांगा छायाचित्र बघून!”
हीच पोस्ट ट्विटरवर देखील शेअर केली गेली आहे, ज्यात हाच दावा करण्यात आला आहे. (अर्काइव्ह लिंक)
हॉक्सी टूल च्या मदतीने, एक अनालिसिस केल्यास समजते कि किती लोकांनी या छायाचित्राला सोशल मीडिया वर शेअर केले.
सोशल मीडियावर विविध ठिकाणी अजून काही यूजर्स नि ह्याच दाव्यासह हि पोस्ट शेअर केले असल्याचे समजते.
तपास:
न्यूज एजेंसी ANI च्या रिपोर्ट प्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन जुलै रोजी लेह चा दौरा केला, यात त्यांनी १५ जून रोजी गलवान घाटी मध्ये शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या यात्रेच्या वेळी जखमी जवानांना देखील भेट दिली आणि त्यांची विचारपूस केली. मोदी यांच्या वेरिफाइड ट्विटर हॅन्डलवर या क्षणाचे छायाचित्र आणि व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात.
गूगल रिवर्स इमेज वापरल्यावर आम्हाला व्हायरल छायाचित्र ‘इकॉनॉमिक टाइम्स‘ च्या वेबसाईट वर सापडले, आणि ४ जुलै रोजी प्रकाशित झालेली बातमी देखील त्यासोबत होती. रिपोर्ट प्रमाणे, हे छायाचित्र लेह चे आहे, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख मध्ये भारत चीन सैन्यात झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या भारतीय सेनेच्या जवानांना दवाखाण्यात जाऊन भेट दिली.
या पोस्ट ला भारतीय जनता पार्टी (बीजेपी) च्या वेरिफाइड ट्विटर हॅन्डलवर देखील शेअर केले गेले आहे.
व्हायरल छायाचित्रात ज्यात असे नमुद केले आहे कि ते तेजिंदर पाल सिंह बग्गा आहेत, त्याची शरीरयष्टी छायाचित्रातल्या जवानासोबत अजिबात मिळतीजुळती नाही.
काही यूजर्स ने त्यांच्या हातात असलेल्या कड्याची तुलना केली आणि निष्कर्ष काढला कि हे बग्गाच आहेत.
विश्वास न्यूज ने या नंतर थेट, तेजिंदर पाल सिंह बग्गा, भाजप प्रवक्ते यांनाच संपर्क केला. बग्गा यांनी म्हंटले, “ज्यांना शीख धर्म बद्दल काहीच नाही माहिती ते लोकच हि तुलना कड्याच्या आधारावर करू शकतात. मी कधीच लह ला गेलो नाही. हे कृत्य काँग्रेस IT सेल वाल्यांच आहे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह च्या यात्रेला विवादात आणायचा प्रयत्न करीत आहे.”
मोदी यांच्या यात्रेवर बरेच प्रश्न सोशल मीडियावर उचलले गेले, आणि त्याबाबतीत भारतीय सेनेनी देखील एक वक्तव्य केले. त्यांनी त्यात म्हंटले, “तीन जुलै रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून बऱ्याच गोष्टी ऐकण्यात आल्या. हि दुर्भघ्याची गोष्ट आहे कि आम्ही ज्याप्रकारे सेनेच्या जवानांची काळजी घेतो त्यावरच प्रश्न उचलले जात आहे. त्यामुळे आम्ही हे स्पष्ट करतो कि ज्या जागेचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला तो जनरल हॉस्पिटल कॉम्प्लेक्स चा क्राइसिस एक्सपैंशन आहे, ज्याची १०० बेड्स ची क्षमता आहे.”
त्याच वक्तव्यात म्हंटल्या प्रमाणे, “गलवान च्या जखमी सैनिकांना या इस्पितळात ठेवण्यात आले होते आणि त्यांना क्वारंटाइन केले गेले होते. सेने प्रमुख जनरल एमएम नरवणे आणि आर्मी कमांडर ने देखील या जागेचा दौरा केला होता आणि जवानांची भेट घेतली होती.”
व्हायरल छायाचित्राला शेअर करणाऱ्या यूजर ने आपल्या प्रोफाइल मध्ये आपण काँग्रेस सोशल मीडिया सेल चा मेंबर असल्याचे सांगितले आहे, ते मुंबई चे रहिवासी आहेत.
निष्कर्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत लेह च्या दवाखाण्यात दिसत असणारा व्यक्ती सेने चा जवान आहे, जो गलवान च्या चकमकीत जखमी झाला. या छायाचित्रात असलेला जवान हे बीजेपी नेता तेजिंदर पाल सिंह बग्गा नाहीत.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.