X

Fact-check: ‘उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील’ असा दावा करणारा संदेश खोटा आहे

  • By Vishvas News
  • Updated: October 9, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला आपल्या चॅट-बोटवर (+91 95992 99372) एक मराठी मध्ये असलेला दावा फॅक्ट-चेक साठी आम्हाला आमच्या यूजर ने पाठवला. त्या संदेशात दावा केला आहे कि, “उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील”. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले.

काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला आपल्या चॅट-बोटवर (+91 95992 99372) मिळालेल्या मेसेज प्रमाणे “उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील”, असा दावा त्या संदेशात केला आहे. हा मेसेज नाशिक पोलिसांद्वारे संबोधित केला गेला आहे असा दावा त्या संदेशात करण्यात आला आहे.
व्हायरल होत असलेला संदेश खालील प्रमाणे आहे:

“मोहन गायकवाड
पोलीस मुख्यालय नाशिक मो. न. 9923050662
उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील
०१. सर्व कॉल रेकॉर्डिंग असतील.
०२. सर्व कॉल रेकॉर्डिंग जतन केले जातील.
०३. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर व सर्व सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाईल.
०४. ज्यांना माहित नाही अशा सर्वांना कळवा.
०५. आपले डिव्हाइस मंत्रालयीन सिस्टीमशी कनेक्ट होतील.
०६. कोणालाही चुकीचा संदेश पाठवू नये याची खबरदारी घ्या.
०७. आपल्या मुलांना, भाऊ, नातेवाईक, मित्र, ओळखीच्या सर्वांना माहिती द्या की आपण त्यांची काळजी
घ्यावी आणि क्वचितच सोशल साइट्स चालवा.
०८. राजकारणावर किंवा सद्यस्थितीबद्दल आपण सरकार किंवा पंतप्रधानांसमोर असलेले कोणतेही पोस्ट
किंवा व्हिडिओ.. इ. पाठवू नका. ०९. सध्या कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक विषयावर संदेश लिहिणे किंवा पाठविणे हा गुन्हा आहे … असे केल्याने वॉरंटशिवाय अटक होऊ शकते.
१०. पोलिस अधिसूचना काढतील… त्यानंतर सायबर क्राइम… त्यानंतर कारवाई केली जाईल ते खूप गंभीर आहे.
११. कृपया तुम्ही सर्व, गट सदस्य, प्रशासक, … कृपया या विषयाचा विचार करा. १२. चुकीचा संदेश पाठवू नका याची खबरदारी घ्या आणि सर्वांना माहिती द्या आणि या विषयाची काळजी
घ्या.
१३. कृपया हे सामायिक करा.”

विविध सोशल मीडिया यूजर्स ने देखील हा मेसेज फेसबुक वर या आधी देखील शेअर केला आहे.

या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाच्या पहिल्या टप्प्यात, संदेशात दिलेलता मोहन गायकवाड यांच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, जो नाशिक पोलीस क्वार्टर च्या नावे संबोधला गेला आहे. आम्हाला हा नंबर स्वीचड ऑफ म्हणजेच बंद असल्याचे समजले.

त्यानंतर आम्ही, नाशिक पोलिसांची शहर ग्रामीण पोलिसांचे संकेतस्थळ तपासले, त्यावर आम्हाला कुठली माहिती मिळते का हे आम्ही तपासले, तसेच या बाबतीत पोलिसांनी कुठली प्रेस रिलीज जाहीर केली का हे देखील आम्ही तपासले. आम्हाला यातले काहीच नाशिक पोलिसांच्या संकेत स्थळावर सापडले नाही.

विश्वास न्यूज ने त्यानंतर नाशिक सिटी पोलीस आणि नाशिक रूरल पोलीस यांचे ट्विटर हॅन्डल तपासून त्यावर काही माहिती मिळते का हे तपासले. आम्हला व्हायरल होत असलेला मेसेज कुठेच त्यांच्या ट्विटर हॅन्डल वर सापडले नाही.

विश्वास न्यूज ने नंतर, पीआय सुभाष अन्मूलवार, सायबर पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण यांच्या सोबत संपर्क साधला. ते म्हणाले कि त्यांनी असे कुठलेच नियम जाहीर केले नाहीत. तसेच त्यांनी हे देखील सांगितले कि कोणाचाही कॉल इतक्या सहजपणे रेकॉर्ड करता येणे अशक्य आहे.
नागपूर सायबर सेल चे एपीआय विशाल माने, यांनी देखील हा मेसेज खोटा असल्याचे विश्वास न्यूज ला सांगितले.

विश्वास न्यूज ने असाच एक संदेश (हिंदी आणि इंग्रजी) जो काही वर्षांआधी (२०१९) व्हायरल होत होता त्याचा देखील तपास केला होता. तेव्हा देखील अयोध्येच्या पोलिसांनी हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले होते.

या संदर्भातले संपूर्ण फॅक्ट-चेक इथे वाचा:

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात मराठी मध्ये व्हायरल होत असलेला मेसेज, ज्यात दावा केला आहे कि उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील, हा दावा खोटा असल्याचे समजले. आधी देखील हाच संदेश इंग्रजी आणि हिंदी तसेच बाकीच्या भाषांमध्ये व्हायरल होत असल्याचे विश्वास न्यूज च्या लक्षात आले.

  • Claim Review : उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील
  • Claimed By : व्हाट्सअँप यूजर
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later