X

Fact Check: योगी आदित्यनाथ यांच्यासोबत हा व्यक्ती विकास दुबे नाही, दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह जुने छायाचित्र व्हायरल

  • By Vishvas News
  • Updated: July 17, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): कानपूर प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छायाचित्रात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका व्यक्तीला आशीर्वाद देताना दिसतात. असा दावा केला जात आहे की ती व्यक्ती इतर कोणी नाही तर विकास दुबे आहे.
विश्वास न्यूजच्या तपासणीत हा दावा खोटा ठरला. विकास दुबे म्हणून ज्याचे छायाचित्र व्हायरल होत आहे, ते एक पोलीस ऑफिसर आहेत.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Reyan Khan’ याने व्हायरल छायाचित्र (आर्काइव लिंक) शेअर करून लिहले, “Vikas dubey with yogi.. Chor chor Mausere bhai.”
तपास करे पर्यंत या पोस्ट ला हजार पेक्षा जास्ती लोकांनी शेअर केले होते.

तपास:
चित्राकडे बारकाईने बघितले तर ज्या व्यक्तीला विकास दुबे म्हणून संबोधले जात आहे, त्याने पोलिसांचा गणवेश घातला आहे. पण हे उल्लेखनीय आहे, कि विकास दुबे हा एक हिस्ट्रीशीटर होता, ज्याच्या विरुद्ध बरेच गुन्हे नोंदवले गेले आहे.

यानंतर आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्च ची मदत घेतली. आम्हाला हे छायाचित्र ndtv.com च्या वेबसाइटवर 28 जुलै 2018 रोजी प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्ट मध्ये आढळले.

रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूरमधील एक पोलीस अधिकारी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा आशीर्वाद घेताना दिसतात. हि घटना २७ जुलै २०१८ रोजी घडली. मुख्यमंत्र्यांसोबत काढलेले सगळे छायाचित्र, प्रवीण कुमार सिंह यांनी आपल्या फेसबुक प्रोफाइलवर अपलोड केले होते.

रिपोर्टप्रमाणे प्रवीणकुमार सिंह हे गोरखनाथ परिसराचे सर्कल ऑफिसर आहेत. सिंह यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की ते गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने योगी आदित्यनाथ यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते आणि ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहे म्हणून नाही तर ते गोरखनाथ मंदिराचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी आशीर्वाद घेतला. रिपोर्ट मध्ये पुढे म्हंटले गेले आहे कि त्यांनी नंतर हि पोस्ट डिलीट केली.

म्हणजेच, ज्या व्यक्तीला विकास दुबे सांगून छायाचित्र व्हायरल केले जात आहे तो एक पोलीस अधिकार आहे.

योगी आदित्यनाथ यांचे वयक्तिक छायाचित्रकार, विनय तिवारी यांनी विश्वास न्यूज ला सांगितले, “मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी कोणीतरी हे जाणून बुजून केले आहे. विकास दुबे पोलिसांच्या गणवेशात  कसा असू शकतो?” तिवारी यांनी सांगितले कि २०१८ साली गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे छायाचित्र गोरखपूर येथे घेण्यात आले होते.

उल्लेखनीय आहे कि, कानपूरच्या बिकरु गावात आठ पोलिसांच्या मृत्यूचा विकास दुबे हा मुख्य आरोपी होता, जो उत्तर प्रदेश पोलिसांच्या हातानी ‘एन्काऊंटर’ मध्ये मारला गेला. न्यूज एजेंसी च्या बातमीनुसार १० जुलै रोजी, कानपूरच्या जवळ झालेल्या एन्काऊंटर मध्ये तो मारला गेला.

यापूर्वी, व्हायरल झालेल्या बर्‍याच छायाचित्रांनी असा दावा केला होता की विकास दुबे वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांसमवेत होते. अलीकडे असेच एक चित्र व्हायरल झाले असून, त्यात विकास दुबे हा भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांच्यासोबत असल्याचा दावा देखील केला गेला. विश्वास न्यूजच्या तपासणीत हा दावा देखील चुकीचा ठरला. संपूर्ण रिपोर्ट तुम्ही येथे वाचू शकता.


https://www.vishvasnews.com/politics/fact-check-edited-image-of-vikas-dubey-with-his-close-aide-jai-bajpayee-is-being-shared-as-dubey-dancing-with-bjp-spokesperson-sambit-patra/

निष्कर्ष: विकास दुबे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आशीर्वाद घेतला असा दावा करणारे छायाचित्र खोटे आहे. त्यांचा आशीर्वाद घेताना विकास दुबे नाहीत तर एक पोलीस अधिकारी आहे.

  • Claim Review : Vikas dubey with yogi.. Chor chor Mausere bhai.
  • Claimed By : Reyan Khan
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later