X

Fact Check: महाराष्ट्रातील जुने छायाचित्र आता बिहार मध्ये EVM चोरल्याच्या खोट्या दाव्यासह होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात बिहार मध्ये ईव्हीएम चोरी केल्याचा दावा खोटा ठरला. महाराष्ट्रातील रायगढ़ चे जुने छायाचित्र काही लोकं आता खोट्या दाव्यांसह बिहार चे सांगून व्हायरल करत आहे.

  • By Vishvas News
  • Updated: November 19, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): बिहार विधानसभा निवडणूक संपल्या असल्या तरी बिहार संबंधित बरेच खोटे दावे व्हायरल होत आहे. सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात एक व्यक्ती पहाडांमधून ईव्हीएम घेऊन जाताना दिसतो. या छायाचित्रावर यूजर दावा करत आहेत कि, हे छायाचित्र बिहार जे आहे ज्यात ईव्हीएम चोरी करताना लोकं दिसत आहेत. या दाव्यासह बऱ्याच यूजर ने सोसिअल मीडिया प्लॅटफॉर्म वर हे छायाचित्र व्हायरल केला आहे.

विश्वास न्यूज ने व्हायरल दाव्याचा तपास केला, आमच्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समोर आले. आम्हाला असे कळले कि व्हायरल होत असेलेले छायाचित्र हे महाराष्ट्रातील विधान सभा निवडणुकांचे आहे. रायगढ़ जिल्ह्यात पोलिंग बूथ वर ईव्हीएम नेत असतानाचे हे छायाचित्र आहे जे आता बिहार चे सांगून व्हायरल केले जात आहे.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर हॅन्डल steffi @sara75165335 ने १३ नोव्हेंबर रोजी एक ट्विट करून लिहले, “EVM की होगी जांच, नितीश जाएंगे जेल? पूछता है युवा, पूछता है बिहार EVM चोरी करके कहां ले जा रहा है। मोदी आयोग चोर है। #Recounting_Bihar_Election बिहारमांगेंरिकॉउंटिंग

अर्थात: ईव्हीएम चा तपास केला जाईल, या नंतर नितीश जातील का जेल? आजचा युवा आणि बिहार विचारात आहे कि ईव्हीएम चोरी करून कुठे घेऊन चालले. मोदी आयोग चोर आहे. बिहार मध्ये रिकाऊंटिंग करा.

या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च च्या मदतीने शोधण्यास सुरुवात केली. या सर्च च्या दरम्यान आम्हाला खरे छायाचित्र एका ट्विट मध्ये मिळाले. डिस्ट्रीट इन्फार्मेशन ऑफिस, रायगढ़ नावाच्या ट्विटर हॅन्डल वर हे छायाचित्र सगळ्यात आधी ट्विट केले गेले होते.
२० ऑक्टोबर २०१९ रोजी केलेल्या या ट्विट मध्ये, कळकराई मतदान केंद्रावर जाणाऱ्या एका कर्मचाऱ्यांची प्रशंसा करण्यात आली होती. हि महाराष्ट्रातील एक जागा आहे.

https://twitter.com/InfoRaigad/status/1185897091781914624

तपासादरम्यान आम्ही रायगढ़ कलेक्टर ऑफिस ला संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हे छायाचित्र मागच्या वर्षीचे रायगढ़ मधले विधान सभा निवडणुकांच्या वेळचे आहे.

शेवटी आम्ही ट्विटर हॅन्डल Steffi चे सोशल स्कँनिंग केले. आम्हाला असे कळले कि यूजर नवी दिल्ली चे रहिवासी आहे. हे हॅन्डल २०१९ साली बनवण्यात आले आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात बिहार मध्ये ईव्हीएम चोरी केल्याचा दावा खोटा ठरला. महाराष्ट्रातील रायगढ़ चे जुने छायाचित्र काही लोकं आता खोट्या दाव्यांसह बिहार चे सांगून व्हायरल करत आहे.

  • Claim Review : ईव्हीएम चा तपास केला जाईल, या नंतर नितीश जातील का जेल? आजचा युवा आणि बिहार विचारात आहे कि ईव्हीएम चोरी करून कुठे घेऊन चालले. मोदी आयोग चोर आहे. बिहार मध्ये रिकाऊंटिंग करा.
  • Claimed By : steffi ‏
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later