X

Fact Check : पंतप्रधान मोदी आणि सचिन तेंडुलकर यांच्या भेटीचे जुने छायाचित्र एडिट करून होत आहे व्हायरल

आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी ठरली, पीएम मोदी आणि सचिन तेंडुलकर यांच्या भेटीचे जुने छायाचित्र आता एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे.

  • By Vishvas News
  • Updated: March 10, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पूर्व क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. या छायाचित्रात मागे भिंतीवर मुकेश आणि नीता अंबानी यांचे एक छायाचित्र दिसते. यूजर्स दावा करत आहे कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑफिस मध्ये नीता नई मुकेश अंबानी यांचे छायाचित्र लागले आहे.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, त्यात आम्हाला असे कळले कि ओरिजिनल छायाचित्राला एडिट करून त्यावर अंबानी परिवाराचे छायाचित्र चिपकवले गेले आहे. आमच्या तपासात पोस्ट खोटी असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर सुमीत वाल्मिकी ने ५ मार्च रोजी एक छायाचित्र अपलोड केले आणि लिहले: “लिजिए मालिक की फोटो ऑफिस मे अब और क्या सबूत चाहिए अंधभक्तो गुलामी का।

फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने पीएम मोदी आणि सचिन यांचे व्हायरल छायाचित्र सगळ्यात आधी गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये टाकून शोधले. आम्हाला हे छायाचित्र बऱ्याच वेबसाईट वर मिळाले. आम्हाला १९ मे २०१७ रोजी प्रकाशित बिझनेस स्टॅंडर्ड च्या वेबसाईट वर एका रिपोर्ट मध्ये हे ओरिजिनल छायाचित्र मिळाले. हि रिपोर्ट  तुम्ही इथे क्लीक करून वाचू शकता. या रिपोर्ट प्रमाणे, सचिन तेंडुलकर यांनी आपले चित्रपट, ‘सचिन वन बिलियन ड्रीम्स ला घेऊन पंतप्रधान मोदींना भेट दिली होती.

तपासादरम्यान आम्हाला एक्सप्रेस स्पोर्ट्स ट्विटर हॅन्डल वर पण हे छायाचित्र मिळाले. १९ मे २०१७ रोजी पोस्ट केलेल्या या छायाचित्रात सांगितले गेले आहे कि सचिन तेंडुलकर हे आपल्या चित्रपटानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने भाजप नेते राकेश त्रिपाठी यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हे छायाचित्र एडिटेड आहे.
खोटे छायाचित्र शेअर करणाऱ्या यूजर चा आम्ही तपास केला, त्यात आम्हाला कळले कि फेसबुक यूजर सुमीत वाल्मिकी हे दिल्ली चे रहिवासी आहेत.


निष्कर्ष: आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी ठरली, पीएम मोदी आणि सचिन तेंडुलकर यांच्या भेटीचे जुने छायाचित्र आता एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे.

  • Claim Review : सचिन तेंडुलकर आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटी दरम्यान मुकेश अंबानी यांचे छायाचित्र भिंतीवर दिसले.
  • Claimed By : Sumeet Valmiki
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later