X

Fact Check: स्वास्थ्य मंत्र्यांचे दोन वर्ष जुने छायाचित्र खोट्या दाव्यासह होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि स्वास्थ्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे जुने छायाचित्र आता खोट्या दाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे. हे छायाचित्र २०१९ मधले आहे.

  • By Vishvas News
  • Updated: May 12, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर स्वास्थ्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे एक जुने छायाचित्र आताचे सांगून व्हायरल होत आहे. यूजर्स दावा करत आहेत कि डॉ. हर्षवर्धन बिना मास्क आणि सोशल डिस्टंसिंग चे आंदोलन करत आहेत. या छायाचित्रात स्वास्थ्य मंत्री तोंडावर बोट ठेऊन आंदोलनावर बसलेले दिसतात. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले.

आमच्या तपासात कळले कि २०१९ मध्ये बंगाल मध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या भिड़ंत नंतर दिल्ली च्या जंतर मंतर वर मौन धरायचे आंदोलन आयोजित केले गेले होते. छायाचित्र तेव्हाचे आहे, जे आता खोट्या दाव्यासह, आताचे असल्याचे सांगून व्हायरल होत आहे.

काय होत आहे व्हायरल?
यूजर मोहम्मद आलम ने ७ मे रोजी फेसबुक पेज समाजवादी पार्टी ऑनलाइन सेना वर स्वास्थ्य मंत्री यांचे छायाचित्र पोस्ट करून दावा केला: ‘स्वास्थ्य मंत्री इस्तीफा दें! इस महामारी में खुद और दूसरे लोगों को बिना मास्क के काफी नज़दीक लेकर बैठे हैं। महामारी ऐक्ट के तहत इन सब पर मुकदमा होना चाहिए!
फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. या दाव्या ला खरे मानून हे छायाचित्र व्हायरल करत आहेत.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज टूल मध्ये अपलोड करून सर्च केले. सर्च च्या वेळी आम्हाला मिळते जुळते छायाचित्र टाइम्स कन्टेन्ट च्या वेबसाईट वर मिळाले. यात सांगितले गेले कि १५ मे २०१९ रोजी सायलेंट प्रोटेस्ट चे हे छायाचित्र नवी दिल्ली चे आहे. हे छायाचित्र खाली बघा.

या छायाचित्रात दिसत असलेल्या कल्युच्या आधारावर आम्ही भाजप सायलेंट प्रोटेस्ट सोबत जुडलेले व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला न्यूज १८ उर्दू च्या युट्युब चॅनेल वर एक बातमी मिळाली. १५ मे २०१९ रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओ मध्ये सांगितले गेले होते कि कलकत्ता मध्ये भाजप टीएमसी मधल्या रोष नंतर भाजप नेत्यांनी जंतर-मंतर वर सायलेंट प्रोटेस्ट चे आयोजन केले. हा पूर्ण व्हिडिओ इथे बघा.

तपास पुढे नेट भाजप नेते विश्वास न्यूज ने भाजप प्रवक्ता निघत अब्बास यांना संपर्क केला. त्यांच्यासोबत आम्ही व्हायरल छायाचित्र शेअर केले. त्यांनी सांगितले कि हे छायाचित्र २०१९ चे आहे आताचे नाही.

व्हायरल दावा शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर मोहम्‍मद आलम च्या प्रोफाइल ला विश्वास न्यूज ने स्कॅन केले. यूजर चंदौसी चे रहिवासी आहेत. हा अकाउंट जानेवारी २०१५ मध्ये बनवण्यात आला होता.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि स्वास्थ्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे जुने छायाचित्र आता खोट्या दाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे. हे छायाचित्र २०१९ मधले आहे.

  • Claim Review : स्वास्थ्य मंत्री इस्तीफा दें! इस महामारी में खुद और दूसरे लोगों को बिना मास्क के काफी नज़दीक लेकर बैठे हैं। महामारी ऐक्ट के तहत इन सब पर मुकदमा होना चाहिए!
  • Claimed By : फेसबुक यूजर मोहम्‍मद आलम
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later