X

Fact Check: व्हिडिओ मध्ये दिसत असलेला व्यक्ती रोहित सरदाना नाही, व्हायरल पोस्ट चा दावा खोटा आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल व्हिडिओ मध्ये करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे समजले. स्वतंत्र पत्रकार नवीन कुमार यांचा व्हिडिओ रोहित सरदाना यांचा सांगून व्हायरल केला जात आहे.

  • By Vishvas News
  • Updated: May 5, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. दावा करण्यात येत आहे कि व्हिडिओ मध्ये दिसत असलेला व्यक्ती हे नुकतेच अनंतात विलीन झालेले ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदाना आहे. व्हिडिओ मध्ये दावा करण्यात येत आहे कि हा त्यांचा शेवटचा मेसेज आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे कळले. स्वतंत्र पत्रकार नवीन कुमार यांचा असून, तो रोहित सरदाना यांचा सांगून व्हायरल करण्यात येत आहे.

काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला आपल्या फॅक्ट चेकिंग व्हाट्सअँप चॅट-बोट (+91 95992 99372) वर हा व्हिडिओ फॅक्ट चेकिंग करता आपल्या वाचकांकडून मिळाला. यूजर ने आम्हाला विचारले कि हा व्हिडिओ खरंच रोहित सरदाना यांचा आहे का. हा व्हिडिओ बाकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर देखील व्हायरल होत असलेला दिसला. फेसबुक यूजर, Rambabu Kushwah यांनी २ मे २०२१ रोजी हा व्हिडिओ शेअर करून लिहले, ‘रोहित सरदाना का संदेश।’
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
आजतक या न्यूज चॅनेल चे वरिष्ठ अँकर आणि पत्रकार रोहित सरदाना यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले. रोहित सरदाना यांना कोरोनाव्हायरस देखील होता आणि त्यांच्या उपचारांदरम्यान हार्ट अटॅक ने त्यांचे निधन झाले. रोहित सरदाना यांचे निधन झाल्यानंतर ४ मिनिट ६ सेकंड्स चा एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत असल्याचे आढळले, ज्यात दावा करण्यात येत आहे कि हा त्यांचा शेवटचा संदेश आहे.
विश्वास न्यूज ने या व्हायरल पोस्ट चा तपास InVID टूल पासून केला च्या मदतीने आम्ही किफ्रेम्स काढले, आणि मल्टिपल गूगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला हा व्हिडिओ कांग्रेस चे नेते कामेश्वर पटेल यांच्या ट्विटर हॅन्डल वर मिळाला. हा व्हिडिओ मध्य प्रदेश कांग्रेस च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर १ मे २०२१ रोजी शेअर केला गेला होता, ज्याला कामेश्वर पटेल ने रिट्विट केले होते. या ट्विट ला खाली बघा.

मध्य प्रदेश काँग्रेस ट्विट प्रमाणे, व्हिडिओ मध्ये दिसत असलेला व्यक्ती आज ताक न्यूज चॅनेल चे पत्रकार नवीन कुमार आहे. हे देखील सांगितले गेले आहे कि नवीन कुमार यांना कोरोनाव्हायरस झाला होता. या ट्विट ला तुम्ही खाली बघू शकता.

या ट्विट मध्ये मिळालेल्या माहिती च्या आधारावर आम्ही पत्रकार नवीन कुमार यांच्याबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. नवीन कुमार सध्या आज तक सोबत काम करत नाही आहेत. ते एक स्वतंत्र पत्रकार आहे आणि डिजिटल पत्रकारिता करत आहेत.  आम्हाला नवीन कुमार च्या डिजिटल प्लॅटफॉर्म आर्टिकल १९ च्या फेसबुक पेज वर हा व्हिडिओ मिळाला. २६ एप्रिल २०२१ रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओ मध्ये, FAIMA Doctors Association चे फाउंडर डॉ मनीष जांगड़ा आणि डॉक्टर सोनू भारद्वाज यांच्या सोबत वार्तालाप करण्यात आला आहे. हा लाईव्ह व्हिडिओ 4 मिनट 54 सेकंड चा आहे, यात एक मिनीटानंतर नवीन कुमार स्वतःचा परिचय देताना देखील दिसतात. व्हायरल व्हिडिओ हा याच व्हिडिओ चा भाग आहे. हा व्हिडिओ इथे क्लीक करून बघा.

या व्हिडिओ पोस्ट मध्ये, Dr.Manish Jangra RMLH च्या फेसबुक पेज ला देखील टॅग केले गेले आहे, जिथून आम्हाला डॉक्टर मनीष जांगड़ा यांचा नंबर मिळाला. डॉक्टर मनीष जांगड़ा यांच्यासोबत संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितले कि व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत असलेला व्यक्ती, नवीन कुमार आहे जे सध्या कोविड संक्रमण नि ग्रासलेले आहे आणि उपचार घेत आहेत.

विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ आजतक चे डेप्युटी एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर आणि वरिष्ठ पत्रकार विकास मिश्रा यांच्या सोबत शेअर केला. मिश्रा ह्यांनी  रोहित सरदाना सोबत काम केले आहे. त्यांनी सांगितले कि हे खूपच दुःखद आहे कि सरदाना यांच्या मृत्यू नंतर त्यांच्याबद्दल खोटे दावे व्हायरल होत आहे. त्यांनी व्हायरल व्हिडिओ मध्ये नवीन कुमार असल्याचे देखील सांगितले.

विश्वास न्यूज ने व्हायरल दावा शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर Rambabu Kushwah चे प्रोफाइल तपासले. हि प्रोफाइल मार्च २०१० मध्ये बनवली गेली होती, आणि यूजर रिवा येथील रहिवासी आहेत.


निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल व्हिडिओ मध्ये करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे समजले. स्वतंत्र पत्रकार नवीन कुमार यांचा व्हिडिओ रोहित सरदाना यांचा सांगून व्हायरल केला जात आहे.

  • Claim Review : रोहित सरदाना चा व्हायरल व्हिडिओ
  • Claimed By : Rambhau Kushwah
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later