X

Fact-Check: तुमकूर च्या मेयर सोबत पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र परत चुकीच्या दाव्यांसोबत होत आहे व्हायरल

  • By Vishvas News
  • Updated: November 7, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर परत एकदा एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे कि पीएम नरेंद्र मोदी बिजनेसमैन अदानी यांच्या पत्‍नी समोर वाकून उभे असलेले दिसतात. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला आहे. त्यावेळी देखील आमच्या तपासात हा दावा खोटा ठरला. छायाचित्रात अदानी यांची पत्नी नाही आहे. छायाचित्रात दिसत असलेली महिला ह्या तुमकूर च्या पूर्व मेयर गीता रुद्रेश आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Satyasheel Chaware ने ३ नोव्हेंबर रोजी हे छायाचित्र अपलोड केले होते.
व्हायरल पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चे तपास या आधी पण केले होते. त्यावेळी आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये राहुल कौशिक नावाच्या ट्विटर हॅन्डल वर केलेला एक ट्विट मिळाला. त्यांनी २५ सप्टेंबर २०१४ रोजी केलेल्या खऱ्या ट्विट मध्ये सांगितले होते कि जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी तुमकूर च्या मेयर गीता रुद्रेश पोहोचल्या तेव्हा मोदींनी त्यांना असे अभिवादन केले.

इंटरनेट वर सर्च केल्यानंतर असे कळले कि २०१४ साली नरेंद्र मोदी हे कर्नाटक च्या तुमकूर मध्ये फूड पार्क च्या उदघाटनाकरिता पोहोचले होते, छायाचित्र पण तेव्हाचेच आहे. आता याच छायाचित्राला परत एकदा खोट्या दाव्यासह व्हायरल केले जात आहे.

अजून माहिती साठी, विश्वास न्यूज ने भाजप प्रवक्ता तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि, “हे छायाचित्र पहिले पण खूप वेळा व्हायरल झाले आहे. यात केलेला दावा हा देखील पूर्णपणे खोटा आहे. या छायाचित्रात अदानी यांची पत्नी नाही आहे.”

पूर्ण तपास इथे वाचा:

शेवटी आम्ही, फेसबुक यूजर Satyasheel Chaware यांच्या अकाउंट चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि यूजर महाराष्ट्रातील नागपूर चे रहिवासी आहे. यूजर चे फेसबुक वर ८४९ फॉलोवर्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे. छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी यांच्या पत्नी समोर झुकले नाही, या तुमकूर च्या पूर्व मेयर आहे, ज्यांच्यासमोर त्यांनी झुकून नमस्कार केला.

  • Claim Review : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी यांच्या पत्नी समोर मोदी झुकले
  • Claimed By : Satyasheel Chaware
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later