X

Fact Check: ही व्यक्ती 800 मुलांचा वडील नाही, लोक विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाला खरे समजून शेअर करत आहेत

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात समजले कि अशी कुठलीच घटना कॅलिफोर्निया मध्ये झाली नाही. हे आर्टिकल विनोदी आणि काल्पनिक आहे. हे आर्टिकल ‘डेली न्यूज रिपोर्टेड’ नावाच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आले आहे. हि वेबसाईट देखील विनोदी गोष्टी प्रकाशित करते.

  • By Vishvas News
  • Updated: January 19, 2022

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूजला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट व्हायरल होत असताना आढळली. पोस्टमध्ये एका वृद्ध व्यक्तीचे छायाचित्र दिसत आहे आणि त्यावर एक मथळा लिहिला आहे आणि चित्राच्या तळाशी हेडलाइन नमूद केली आहे. पोस्टसोबतच्या मथळ्यानुसार, कॅलिफोर्नियातील माणसाला 800 मुले आहेत. विश्वास न्यूजच्या तपासात आढळून आले की, ही खरी घटना नसून विनोद आणि विनोदाच्या उद्देशाने लिहिलेल्या काल्पनिक लेखाचा स्क्रीनशॉट आहे. हा लेख ‘डेली न्यूज रिपोर्टेड’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. ही वेबसाइट केवळ काल्पनिक आणि व्यंगात्मक कथा प्रकाशित करते.

काय होत आहे व्हायरल?
या वृद्ध व्यक्तीच्या छायाचित्राच्या खाली असलेल्या व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये सांगितले आहे कि एफबीआय अधिकाऱ्यांनी केलेल्या अलीकडील डीएनए चाचण्यांमध्ये कॅलिफोर्नियातील एक दूध विक्रेता 800 हून अधिक मुलांचा पिता असल्याचे आढळून आले आहे.
लेखानुसार, दक्षिण कॅलिफोर्नियातील दूध विक्रेते रँडल (रँडी) जेफ्रीजचे गृहिणींसोबत अनेक अवैध संबंध होते.

हि पोस्ट फेसबुक यूजर Pramod Kumar Kushwaha ह्यांनी केली, पोस्ट बरोबर लिहले होते: दुधवाला निकला… 800 बच्चों का पिता.. DNA Test

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी ह्या चित्राचा गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोध घेतला. हे चित्र आम्हाला, sunshine-city.top ह्या फोटो एजेन्सी वर मिळाला. ह्या चित्राबरोबर व्हायरल होणार मजकूर दिलेला नव्हता. उलट ह्यासोबत इंग्रजी मध्ये लिहले होते, ‘Old Man In Hat’.

व्हायरल झालेल्या लेखात ‘डेली न्यूज रिपोर्टेड’ चा हवाला देण्यात आला आहे. कीवर्डसह शोधताना, आम्हाला हा लेख 24 डिसेंबर 2021 रोजी ‘डेली न्यूज रिपोर्टेड’ या वेबसाइटवर प्रकाशित झालेला असल्याचे समजले. या वेबसाइटवर, वेबसाइटच्या नावाखाली असे लिहिले होते, ‘DAILY NEWS REPORTED: NOT QUITE DAILY. NOT QUITE NEWS’. आम्हाला आता ह्याच्या टॅगलाईन वरून समजले कि हि विश्वासार्ह वेबसाइट नाही.

अधिक माहिती साठी आम्ही त्याचा अबाऊट अस सेक्शन शोधण्यास सुरुवात केली. त्यात लिहले होते: Daily News Reported is a fabricated satirical newspaper and comedy website. Daily News Reported uses invented names in all its stories, except in cases when public figures are being satirized. Any other use of real names is accidental and coincidental. Daily News Reported is not intended for people under 18 years of age. अर्थात हि एक विनोदी वेबसाईट आहे ज्यात विनोदासाठी खोट्या बातम्या प्रकाशित करण्यात येतात. आम्ही बनावटी नाव आणि बातम्या प्रकाशित करतो. जर का कुठली बातमी खरी आढळल्यास तो निव्वळ योग-योग्य समजावा. हि वेबसाईट 18 वर्षाखालील मुलांसाठी नाही.

आता हे स्पष्ट होते कि हे एक काल्पनिक आर्टीकफल आहे. आम्ही अधिक माहिती साठी सरळ डेली न्यूज रिपोर्टेड ला संपर्क केला आहे. अधिक माहिती मिळाल्यावर हा फॅक्ट चेक अपडेट करण्यात येईल.

ह्याविषयी अधिक माहिती साठी आम्ही कॅलिफोर्निया स्थित फ्रीलान्स जर्नलिस्ट प्रतीक गोयल ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि कॅलिफोर्निया मध्ये अशी कुठलीही घटना समोर आली नाही.

विश्वास न्यूज ने शेवटच्या टप्प्यात ज्यांनी हि पोस्ट शेअर काली त्या प्रोफाइल चा सोशल बॅकग्राऊड चेक केला. Pramod Kumar Kushwaha बेंगलोर चे रहिवासी आहेत आणि त्यांना फेसबुक वर 456 यूजर्स फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात समजले कि अशी कुठलीच घटना कॅलिफोर्निया मध्ये झाली नाही. हे आर्टिकल विनोदी आणि काल्पनिक आहे. हे आर्टिकल ‘डेली न्यूज रिपोर्टेड’ नावाच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आले आहे. हि वेबसाईट देखील विनोदी गोष्टी प्रकाशित करते.

  • Claim Review : दुधवाला निकला... 800 बच्चों का पिता.. DNA Test
  • Claimed By : Pramod Kumar Kushwaha
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later