X

Fact Check: प्री-बोर्ड च्या परीक्षा उत्तीर्ण न केल्यास सीबीएसई नाही थांबवणार ऍडमिट कार्ड, व्हायरल पोस्ट खोटी आहे

सीबीएसई ने असे कुठलेच नियम नाही बनवले आहे ज्यात प्री-बोर्ड च्या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच ऍडमिट कार्ड मिळतील. व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे.

  • By Vishvas News
  • Updated: January 20, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि सीबीएसई १०वि आणि १२वि च्या विद्यार्थ्यांना दोन प्री-बोर्ड उत्तीर्ण करावे लागतील, जर ते उत्तीर्ण झाले नाहीत, तर त्यांना बोर्ड परीक्षांचे ऍडमिट कार्ड दिले जाणार नाही.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, त्यात कळले कि पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा आहे. सीबीएसई ने असा कुठलाच नियम जारी केलेला नाही, ज्यात असे स्पष्ट केले असेल कि प्री-बोर्ड च्या परीक्षा उत्तीर्ण नाही केल्यास विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड थांबवले जातील.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, MasterDinesh C Joshi ने हि पोस्ट शेअर करून लिहले: सीबीएसई 10 व 12 प्री बोर्ड परीक्षा होगी दो बार, पास करने पर ही मिलेगा एडमिट कार्ड।

पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाच्या सुरुवातीला सगळ्यात आधी सीबीएसई च्या अधिकृत वेबसाईट ची तपासणी केली, पण आम्हाला असे कुठलेच नोटिफिकेशन नाही मिळाले ज्यात हे लिहले असेल कि ऍडमिट कार्ड मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्री-बोर्ड परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.

आम्ही या बद्दल इंटरनेट वर देखील शोधले, त्यात आम्हाला काही मीडिया रिपोर्ट्स मिळाल्या ज्यात या गोष्टी चा उल्लेख केला होता. मीडिया रिपोर्ट्स चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.

आम्ही, व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यास सीबीएसई च्या गवर्निंग बॉडी चे सदस्य ज्योति अरोड़ा यांना संपर्क केला, त्यांनी आम्हाला सांगितले कि असे कुठलेच नोटिफिकेशन बोर्ड नि जारी केले नाही. हि केवळ एक अफवा आहे. विद्यार्थ्यांनी अश्या अफवांपासून सावध राहावे आणि प्रामाणिक माहिती साठी सीबीएसई ची अधिकृत वेबसाईटचं बघावी.

दोन दा होतील प्री-बोर्ड परीक्षा

अधिकतर सीबीएसई अफिलिएटेड शाळांमध्ये आधीपासूनच १०वि आणि १२वि च्या विद्यार्थ्यांसाठी दोन दा प्री-बोर्ड च्या परीक्षांचे आयोजन केले जाते. अश्यात दोन प्री-बोर्ड होणे काही नवीन नाही. या वेळी कोरोनाव्हायरस पँडेमिक मुले सीबीएसई ने ४ मे रोजी बोर्ड च्या परीक्षांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सीबीएसई ने नोटिफिकेशन जारी करून हि सूचना दिली होती. दर वर्षी या परीक्षा फेब्रुवारी च्या शेवटच्या आढवड्यात किंवा मार्च मध्ये सुरु होतात. या वेळी विद्यार्थ्यांना तैयारी साठी जास्ती वेळ मिळाला आहे, ज्यामुळे काही शाळांनी दुसरी प्री-बोर्ड आयोजित करण्याचे सर्कुलर जारी केले आहे.

आता आम्ही फेसबुक वर हि पोस्ट शेअर करणारे यूजर MasterDinesh C Joshi यांच्या प्रोफाइल ला स्कॅन केले. आम्हाला त्यात असे कळले कि यूजर मुनीरका, दिल्ली चे रहिवासी आहेत आणि त्यांनी Radical Career Academy नावाच्या ग्रुप मध्ये हि पोस्ट शेअर केली आहे ज्यात १२०० सदस्य आहेत.

निष्कर्ष: सीबीएसई ने असे कुठलेच नियम नाही बनवले आहे ज्यात प्री-बोर्ड च्या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच ऍडमिट कार्ड मिळतील. व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे.

  • Claim Review : प्री-बोर्ड च्या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच ऍडमिट कार्ड मिळतील
  • Claimed By : MasterDinesh C Joshi
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later