X

Fact Check: राहुल गांधींच्या जुन्या चित्रासोबत छेडछाड करून होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात राहुल गांधी चे व्हायरल होत असलेले चित्र खोटे असल्याचे सिद्ध झाले. ओरिजिनल चित्रात मुलाच्या टीशर्ट वर कमळाचे निशाण नाही.

  • By Vishvas News
  • Updated: November 11, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक मॉर्फ केलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या छायाचित्रात राहुल गांधींसोबत एक लहान मुलगा दिसत आहे. ज्याच्या टी-शर्टवर, भाजपचे निवडणूक चिन्ह म्हणजेच कमळाचे चित्र आहे. काही यूजर्स हे चित्र खरे असल्याचे समजून विविध सोशल मीडियावर शेअर करत आहे. विश्वास न्यूजने व्हायरल चित्राचे तपास केले. आमच्या तपासात, व्हायरल चित्र मॉर्फ केलेले असल्याचे सिद्ध झाले. राहुल गांधींच्या छायाचित्राशी छेडछाड करण्यात आली असून मुलाच्या टी-शर्टवर कमळाचे चिन्ह लावून व्हायरल करण्यात येत आहे.

काय होत आहे व्हायरल?
सोनम सैनी या ट्विटर हँडलने 8 नोव्हेंबर रोजी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे मॉर्फ केलेले छायाचित्र शेअर केले आणि लिहिले: ये बटन भी bjp का ही दबाता होगा..कोई शक।

अनुवाद: नक्की… हे बटण भाजपचेच दाबत असतील यात काही शंका नाही.
ट्विटर पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूजने खरे चित्र शोधण्यासाठी गूगल रिव्हर्स इमेज सर्च टूल ची मदत घेतली. त्यात व्हायरल चित्र अपलोड करून आम्ही खऱ्या चित्राचा शोध घेतला. आम्हाला काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मूळ चित्र सापडले. 3 नोव्हेंबर 2017 रोजी राहुल गांधी गुजरातमधील धरमपूर चौकडी येथे शेतकर्‍यांची भेट घेतल्याचे ह्या ट्विटमध्ये सांगण्यात आले.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने काँग्रेसचे प्रवक्ते अखिलेश प्रताप सिंग यांच्यासोबत व्हायरल चित्र शेअर केले. काँग्रेसला घाबरणारेच अशी खोटी कामे करतात, असे त्यांनी सांगितले. हे चित्र पूर्णपणे बनावट आहे असे देखील त्यांनी म्हंटले.

तपासाअंती विश्वास न्यूजने बनावट पोस्ट करणाऱ्या युजरची चौकशी केली. सोनम सैनी या ट्विटर हँडलला नऊ हजारांहून अधिक लोक फॉलो करत असल्याचे आमच्या लक्षात आले. हे अकाउंट जून 2020 रोजी तयार केले होते.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात राहुल गांधी चे व्हायरल होत असलेले चित्र खोटे असल्याचे सिद्ध झाले. ओरिजिनल चित्रात मुलाच्या टीशर्ट वर कमळाचे निशाण नाही.

  • Claim Review : राहुल गांधी की तस्‍वीर में दिख रहे बच्‍चे की टीशर्ट पर भाजपा का निशान
  • Claimed By : @sonamsa4
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later