X

Fact Check: आरबीआय नाही वापस घेणार आहे १०० रूपये, १० रुपये आणि ५ रुपयांच्या जुना नोटा, व्हायरल पोस्ट खोटी आहे

आरबीआय १००, १० आणि ५ रुपयांच्या जुना नोटा सर्क्युलेशन मधून बंद नाही होणार आहे, व्हायरल पोस्ट खोटी आहे.

  • By Vishvas News
  • Updated: January 30, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे , ज्यात दावा करण्यात येत आहे कि भारतीय रिजर्व बैंक मार्च नंतर १००, १० आणि ५ रुपयांच्या जुना नोटा बाजारातून वापस घेणे सुरु करणार आहे.

विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे. आरबीआय ने सध्या असा कुठलाच निर्णय नाही घेतला आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Khidmati Safar ने ५, १०० आणि १० रुपयांच्या जुन्या नोटांचे छायाचित्र शेअर केले आणि इंग्रजीत लिहले, (मराठी अनुवाद) आरबीआय ने म्हंटले कि मार्च नंतर १००, १० आणि ५ रुपयांच्या जुना नोटा सर्क्युलेशन मधून बंद होतील.

व्हायरल पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात सगळ्यात आधी इंटरनेट वर कीवर्ड सर्च करून केली. आम्हाला अश्या मीडिया रिपोर्ट्स मिळाल्या, ज्यात मेंगलुरु मध्ये नुकत्याच झालेल्या एका डिस्ट्रिक्ट लेवल कसंरी मैनेजमेंट कमेटी च्या मीटिंग मध्ये आरबीआई च्या असिस्टेंट जनरल मैनेजर बी महमेश यांनी हे म्हंटले कि आरबीआय मार्च, एप्रिल पासून १०० रुपये च्या जुन्या नोटा सर्क्युलेशन मधून बंद करायचे प्लांनिंग करत आहे.

या नंतर हि पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले.

आरबीआय ने वर्ष २०१८ मध्ये जांभळ्या रंगाचे १०० रुपयेच्या नवीन नोटा जारी केल्या, पण सोबत हे पण स्पष्ट केले कि जुन्या १०० च्या नोटा देखील लीगल राहतील. आरबीआय चे नोटिफिकेशन तुम्ही इथे बघू शकता.
अधिक माहिती साठी आम्ही आरबीआय च्या डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन चे चीफ जनरल मॅनेजर योगेश दयाल चे पिए यांच्या सोबत विश्वास न्यूज ने संवाद साधला. त्यांनी सांगितले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे. सध्या आरबीआय ने असे कुठलेच निर्देश दिले नाही आहे. आरबीआय ने नुकतेच अशे एक ट्विट करून स्पष्ट देखील केले, कि सध्या आरबीआय, १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा वापस घेणार नाही आहे. व्हायरल पोस्ट खोटी आहे.

आरबीआय चे हे ट्विट तुम्ही इथे बघू शकता.

ज्या फेसबुक यूजर ने हि पोस्ट केली, Khidmati Safar या प्रोफाइल चा आम्ही तपास केला. आम्हाला असे कळले कि या यूजर ला 46815 लोकं फोल्लो करतात.

निष्कर्ष: आरबीआय १००, १० आणि ५ रुपयांच्या जुना नोटा सर्क्युलेशन मधून बंद नाही होणार आहे, व्हायरल पोस्ट खोटी आहे.

  • Claim Review : आरबीआय वापस घेणार आहे १०० रूपये, १० रुपये आणि ५ रुपयांच्या जुना नोटा
  • Claimed By : Khidmati Safar
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later