X

Fact Check: ऑनलाईन अभ्यासासाठी रिलायन्स जियो नाही देत आहे ५५५ रुपये चा फ्री रिचार्ज, व्हायरल पोस्ट खोटी आहे

  • By Vishvas News
  • Updated: December 1, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे कि मुलांच्या अभ्यासासाठी मुकेश अंबानी हे १० लाख जियो यूजर्स ला ५५५ रुपये चा तीन महिन्याचा रिचार्ज फुकट देत आहेत. या सोबत पोस्ट सोबत लिंक देण्यात आली आहे आणि म्हंटले कि फ्री रिचार्ज करता मिळवण्या करीत या लिंक वर क्लिक करा.

विश्वास न्यूजच्या तपासात असे कळले कि व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे, रिलायन्स कुठलाच फ्री रिचार्ज देत नाही आहे. व्हायरल पोस्ट सोबत दिलेली लिंक हि एक मालवेयर आहे.

काय आहे व्हायरल पोस्ट मध्ये?
फेसबुक यूजर Ankush Ankush Patel ने हि पोस्ट शेअर करून लिहले कि, Coronavirus की वजह से बच्चो के Online पढ़ाई के लिए मुकेश अंबानी ने 1 Million Jio यूजर को ₹ 555 का 3 महीने वाला रिचार्ज फ्री में देने का वादा किया है तो अभी निचे नीले रंग की लिंक पर क्लिक करके अपने नंबर पर रिचार्ज करे।
मैंने फ्री रिचार्ज पाया, आप भी कर सकते हो।
नोट:- नीचे दी गई लिंक पर क्लिक करके अपना फ़्री रीचार्ज प्राप्त करें
👉🏼 https://rb.gy/rpvrmy
कृपया ध्यान दे: अगर आपके पास Jio की सिम नहीं है तो आप अपने किसी दोस्त या किसी घर के किसी भी जिओ सिम को रिचार्ज कर सकते हो। यह ऑफर केवल 30 NOVEMBER 2020 तक ही सिमित है!

अर्थात: कोरोनाव्हायरस मुळे जे मुलं ऑनलाईन अभ्यास करत आहेत, मुकेश अंबानी अश्या १ मिलियन यूजर ना ₹५५५ चा तीन महिन्यांचा रिचार्ज फुकट देण्याचे कबूल केले आहे. . आताच खाली निळ्या रंगात दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या नंबर वर रिचार्ज करून घ्या.
मी फ्री रिचार्ज केला आहे तुम्ही पण करा.
कृपया लक्ष द्या जर तुमच्याकडे जियो चा सिम नसेल ता तुम्ही कोणाच्याही जियो सिम चा रिचार्ज करू शकता. हा ऑफर फक्त ३० नोव्हेंबर पर्यंत आहे.

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
विश्वास न्यूज ला आपल्या व्हाट्सअँप चॅटबोट नंबर 9599299372 वर पण हा दावा फॅक्ट चेक करण्यास मिळाला.

तपास:
व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आलेल्या दाव्याचा तपास आम्ही सगळ्यात आधी जियो च्या अधिकृत वेबसाईट वर सुरु केला. आम्ही त्या वेबसाईट आणि अँप वर व्हायरल होत असलेल्या दाव्याचा शोध घेतला पण आम्हाला तो संकेतस्थळावर कुठेच आढळला नाही.

त्या नंतर आम्ही व्हायरल पोस्ट सोबत असलेल्या लिंक वर क्लिक केले ता तिथे आमच्या कडून काही माहिती मागण्यात आली, जेव्हाकी विचारल्या गेलेल्या सगळ्या माहितीनंतर देखील आम्हाला फ्री रिचार्ज मिळाला नाही. हि लिंक आम्ही त्या नंतर आयटी एक्स्पर्ट आयुष्य भारद्वाज पाठवली.

या लिंक ला तपासल्या नंतर त्यांनी विश्वास न्यूज ला सांगितले कि हि लिंक एक ब्लॉग आहे, ज्याला ब्लॉगस्पॉट वर कस्टम कॉड टाकून बनवण्यात आला आहे. व्हाट्सअँप वाल्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर एक एक मेसेज सेंट झाल्यावर पॉईंट वाढतो. दहा मेसेज झाल्यावर क्लिक रिचार्ज वाला ऑप्शन दिसतो. यावर क्लिक केल्यानंतर यावर म्हंटले जाते कि तुमचा फोन स्लो आणि अनप्रोटेक्टड आहे, हॅक हू शकतो. जसे यूजर फोन प्रोटेक्ट करण्यासाठी लिंक वर क्लिक करतो त्यावर मालवेअर अपलोड हुन जातो. आणि एकदा मालवेअर आला कि आप्लिकेशन्स मध्ये ऍडव्हर्टाइसमेन्ट दिसायला लागतील. वायफाई सोबत कनेक्टेड देवाईसेस मध्ये पण ऍडव्हर्टाइसमेंट्स दिसायला सुरुवात होईल. याला हटवायला फोन ला हार्ड रीसेट करावे लागते. अँड्रॉइड फोन मध्ये हा ऑप्शन असतो ज्यामुळे सगळा डेटा डिलीट होतो.

आम्ही रिलायन्स जियो च्या कस्टमर केयर अधिकारी ध्रुव सोबत बोललो त्याने सांगितले कि जियो तर्फे असा कुठलाच ऑफर नाही काढला गेला आहे. व्हायरल मेसेज खोटा आहे.
फेसबुक वर Ankush Ankush Patel या यूजर ने हि पोस्ट शेअर केली, त्याचा प्रोफाइल स्कॅन केल्यावर आम्हाला असे कळले कि यूजर छत्तरपूर, मध्य प्रदेश चा रहिवासी आहे.

निष्कर्ष: निष्कर्ष: रिलायन्स जियो ५५५ रुपयात तीन महिन्यासाठी फ्री रिचार्ज नाही देत आहे, व्हायरल पोस्ट खोटी आहे.

  • Claim Review : रिलायन्स जियो ५५५ रुपयात तीन महिन्यासाठी फ्री रिचार्ज देत आहे.
  • Claimed By : Ankush Ankush Patel
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later