X

Fact Check: खासदार सत्यपाल सिंह यांच्या नावावर कोविड-१९ चा उपचार मिळाल्याचे व्हायरल मेसेज खोटे

  • By Vishvas News
  • Updated: April 27, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर खासदार सत्यपाल सिंह यांच्या नावावर सध्या कोविड-१९ सोबत जुडलेला एक दावा व्हायरल होत आहे. या दाव्यात या आमदाराच्या नावावर सांगण्यात येत आहे कि पॉण्डेचेरी युनिव्हर्सिटी च्या भारतीय विद्यार्थ्यांनी कोरोनाव्हायरस संक्रमणाचा घरेलू उपचार शोधला आहे, ज्याला WHO ने मान्यता दिली आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. भारतीय छात्रांनी कोणताच उपाय शोधून खाधला नाही तसेच आमदार सत्यपाल सिंह यांनी कुठलाच दावा केला नाही.  

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर आर्य अमित कुमार यांनी २४ एप्रिल २०२१ रोजी व्हायरल दावा शेअर केला. या व्हायरल दाव्यात लोकसभा खासदार सत्यपाल सिंह यांच्या नावाने दावा करण्यात येत आहे कि पॉण्डेचेरी युनिव्हर्सिटी च्या राजू नावाच्या एका भारतीय विद्यार्थ्याने कोरोनाव्हायरस चा घरेलू उपचार शोधला आहे. दाव्याप्रमाणे, विद्यार्थ्याने सिद्ध केले आहे कि एक चमचा काली मिरची चा चूर्ण, दोन चमचेमध, थोडे आले हे नियमित पाच दिवस घेतल्यास कोरोनाव्हायरस चा प्रभाव १०० टक्के संपतो. हा दावा देखील करण्यात येत आहे कि WHO ने या उपचाराला मान्यता दिली आहे.
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
फेसबुक यूजर Shushilchandra Asthana आणि Arvind Tiwari यांनी देखील व्हायरल दावा आपल्या प्रोफाइल वर शेअर केले आहे.

तपास:
पॉण्डेचेरी युनिव्हर्सिटी च्या कथित स्टुडन्ट राजू ने कोरोनाव्हायरस चा घरेलू उपचार शोधून काढला आणि त्याला WHO ने मान्यता दिली हा दावा आधी देखील व्हायरल झाला आहे. आणि विश्वास न्यूज ने देखील याचा तपास केला आहे.
विश्वास न्यूज ने या दाव्यासंबंधी पॉण्डेचेरी युनिव्हर्सिटी च्या मॅनेजमेंट सोबत देखील संपर्क केला. युनिव्हर्सिटी प्रबंधक ने दावा खारीज करून सांगितली कि आमच्या विद्यार्थ्याने कुठलाच कोरोनाव्हायरस चा उपचार शोधून काढला नाही.

आमच्या तपासात हे देखील समोर आले कि WHO कडून अश्या कुठल्याच उपचाराला मान्यता दिली गेली नाही, हा दावा देखील खोटा आहे.  तसेच आयुष्य मंत्रालय च्या एक्सपर्ट ने आम्हाला सांगितले कि आलं, मध आणि काली मिरची ने आराम मिळू शकतो पण कोरोनाव्हायरस ठीक होत नाही, अजून पर्यंत असे प्रमाण कुठेच मिळाले नाही. विश्वास न्यूज चा तपास तुम्ही खाली बघू शकता.

विश्वास न्यूज ने जेव्हा पॉण्डेचेरी युनिव्हर्सिटी च्या दाव्याचा तपास केला तेव्हा कोरोना वॅक्सीन यायची होती आता सगळ्यांना वॅक्सीन देण्यात येत आहे. या बद्दल अधिक माहिती WHO च्या वेबसाईट वर असलेल्या रिपोर्ट वर बघू शकता.

विश्वास न्यूज ला आता व्हायरल होत असलेल्या दाव्याचा खासदार सत्यपाल सिंह यांच्यासोबत काही संबंध आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सत्यपाल सिंह युपी च्या बागपात चे खासदार आहे. आम्ही या संबंधी इंटरनेट वर सर्च केले त्यात आम्हाला त्यांच्या वेरिफाइड ट्विटर हॅन्डल वर केलेला एक ट्विट सापडला. त्यात यांनी व्हायरल दावा शेअर करून लिहले होते कि त्यांच्या नावावर खोटी पोस्ट व्हायरल होत आहे. हा ट्विट तुम्ही खाली बघू शकता.

विश्वास न्यूज ने या संबंधी खासदार सत्यपाल सिंह यांच्या कार्यालयासोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि असा कुठलाच दावा खासदार यांनी केला नाही. आणि याबद्दल त्यांनी आपल्या कुठल्या सोशल मीडिया प्रोफाइल वर माहिती देखील दिली नाही. खासदार सत्यपाल सिंह ने लोकांना अपील केली आहे कि सोशल मीडिया वर कुठल्याच अन्व्हेरीफाईड आणि खोट्या बातम्या शेअर करू नये.

विश्वास न्यूज ने व्हायरल दावा शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर आर्य अमित कुमार चे प्रोफाइल देखील स्कॅन केले. हि प्रोफाइल फेब्रुवारी २०१९ मध्ये बनवली गेली होती आणि यूजर नैनपूर चा रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात खासदार सत्यपाल सिंह यांच्या नावावर कोरोनाव्हायरस संबंधित दावा खोटा असल्याचे समजले. तसेच पॉण्डेचेरी च्या कुठल्याच विद्यार्थ्याने कोरोनाव्हायरस चा घरेलू उपाय शोधून काढला नाही, आणि खासदार सत्यपाल सिंह यांनी देखील या बद्दल कुठला दावा केला नाही.

  • Claim Review : कोविड-१९ चा उपचार मिळाला
  • Claimed By : आर्य अमित कुमार
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later