X

Fact Check: गांगुली ने BCCI अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, सप्टेंबर 2022 पर्यंत आहे कार्यकाळ

सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा दावा पूर्णपणे अफवा आहे. गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. ऑक्टोबर 2019 मध्ये प्रेसिडेंट झालेल्या गांगुली यांचा कार्यकाळ या वर्षी सप्टेंबरमध्ये संपत आहे.

  • By Vishvas News
  • Updated: June 8, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा दावा करणारे असंख्य यूजर्स सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. गांगुलीने ट्विटमध्ये नवीन काहीतरी जाहीर केल्यानंतर त्याने नवीन एज्युकेशन अॅप लॉन्च केले. असे असतानाही सोशल मीडियावर त्यांच्या बीसीसीआयच्या राजीनाम्याच्या अफवा थांबताना दिसत नाहीत.

सौरव गांगुली अजूनही बीसीसीआय च्या अध्यक्षपदी आहेत आणि त्यांचा कार्यकाळ ह्या वर्षीच्या सप्टेंबर पर्यंत आहे एक अफवा आहे.

काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया यूजर ‘Chourasiya Hemant’ ने व्हायरल पोस्ट (आर्काइव लिंक) शेअर केली आणि लिहले: ”सौरभ गांगुली ने बीसीसीआई के अध्यक्ष पद से दिया इस्तीफा।”

अन्य यूजर्स देखील असाच काहीसा दावा करत आहेत.

तपास:
सौरव गांगुलीने 1 जून 2022 रोजी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून काहीतरी नवीन करण्याचे घोषित केले होते. या ट्विटनंतर त्यांनी बीसीसीआयमधून राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती.

पण नंतर गांगुली ह्यांनी एक एजुकेशन अँप लाँच करण्याची घोषणा केली आणि ह्या अफवांना पूर्णविराम लावला.

3 जून रोजी दैनिक जागरणच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, “BCCI अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी नोएडा-आधारित ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म एडटेक स्टार्टअप क्लासप्लससह एक नवीन इनिंग सुरू केली आहे.” बुधवारी सौरव गांगुलीने याबाबत एक ट्विट केले होते, मात्र हे ट्विट स्पष्ट न झाल्यामुळे लोकं त्यांच्या राजकारणात येण्याचा अंदाज बांधू लागले. इंटरनेट मीडियावर दीर्घकाळापर्यंत विविध अनुमानांनंतर सौरव गांगुलीने स्पष्ट केले की तो एका एज्युकेशन अँप सोबत संबंधित आहे.

न्यूज एजेन्सी एएनआई सोबत बोलताना बीसीसीआय सेक्रेटरी जय शाह नि देखी गांगुली ह्यांनी राजीनामा दिल्याच्या अफवांना खारीज केले.

सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. बातम्यांनुसार, गांगुली यांनी गेल्या वर्षी बीसीसीआयचे ३९ वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता आणि त्यांचा कार्यकाळ या वर्षी सप्टेंबर महिन्यात पूर्ण होत आहे.

आमचे सहकारी दैनिक जागरणचे डिजिटल स्पोर्ट्सचे प्रमुख विप्लव कुमार म्हणाले, “गांगुलीचा कार्यकाळ या वर्षी सप्टेंबरपर्यंत आहे आणि ते बीसीसीआयचे अध्यक्ष आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी मे महिन्यात गांगुलीच्या घरी जेवल्यानंतर आणि काही आठवड्यांनंतर गांगुलीने काहीतरी नवीन करण्यासाठी ट्विट केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याबद्दल सोशल मीडियावर तर्कवितर्क लावले जात होते.”

खोट्या दाव्यासह व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या युजरने त्याच्या प्रोफाईलमध्ये स्वत:चे व्हिडिओ पत्रकार म्हणून वर्णन केले आहे.

निष्कर्ष: सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा दावा पूर्णपणे अफवा आहे. गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. ऑक्टोबर 2019 मध्ये प्रेसिडेंट झालेल्या गांगुली यांचा कार्यकाळ या वर्षी सप्टेंबरमध्ये संपत आहे.

  • Claim Review : सौरव गांगुली ने BCCI के अध्यक्ष पद से दिया इस्तीफा
  • Claimed By : Chourasiya Hemant
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later