X

Fact Check: बांग्लादेशी शॉर्ट फिल्म ला खरे मानून, लोकं सीन करत आहेत व्हायरल, पोस्ट खोटी आहे

  • By Vishvas News
  • Updated: November 2, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सऐप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात चार छायाचित्रांचे कोलाज दिसत आहे. या छायाचित्रात एक व्यक्ती एक शाळेतील मुली सोबत आपत्तीजनक व्यवहार करताना दिसतात. पोस्ट मध्ये म्हंटले गेले आहे कि हे छायाचित्र एका मदरस्याचे आहे. यूजर्स याला खरे मानून व्हायरल करत आहे.

विश्वास न्यूजच्या तपासात आम्हाला कळले कि हे छायाचित्र एका बांग्लादेश च्या शॉर्टफिल्म चा सीन आहे. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज Hindustanibhau🇮🇳 ने एक पोस्ट करून दावा केला, “मदरसे में मौलवी साहब सलमा को कलमा पढ़ाते हुए*बंद करो ये मदरसे जो अश्लीलता वेश्यावृत्ति के अड्डे बन गये हैं*साधु संतो पर टिप्पणी करने वाले इस विषय अपना मुंह खोलें।”

अर्थात: मदरस्यातील मौलवी साहेब कलमा शिकवताना. बंद करा हे अश्लील कृत्य, साधुसंतांवर टिप्पणी करणाऱ्यांनी या विषयावर पण बोलावे.

व्हायरल पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज मध्ये अपलोड केले आणि इंटरनेट वर सर्च केले. आम्हाला त्यादरम्यान यूट्यूब वर anna bala नावाचे एक चॅनेल मिळाले. १० मिनिटांच्या या व्हिडिओ मध्ये ७ मिनिटानंतर या व्हायरल कोलाज मधले स्क्रीनग्रैब्स पाहायला मिळतात. हा व्हिडिओ २० सप्टेंबर २०२० रोजी अपलोड केला गेला होता. व्हिडिओ च्या टायटल प्रमाणे, हि एक शॉर्टफिल्म आहे ज्याला अतौल हाक़ नावाच्या डायरेक्टर ने बनवले आहे. या यूट्यूब चैनल चे 724K सब्सक्राइबर्स आहेत.

अजून माहिती साठी, आम्ही अतौल हाक़ यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले व्हायरल पोस्ट मध्ये असलेले छायाचित्र हे त्यांच्या फिल्म चा एक सीन आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले कि हि शॉर्टफिल्म यौन शोषण आणि यौन अपराध याबद्दल अवेरनेस फैलावण्यासाठी हि फिल्म बनवण्यात आली होती.

आम्ही या व्हिडिओ बद्दल बांग्लादेश चे बघारपारा उपजिला प्रेस क्लब चे अध्यक्ष इकबार कबीर यांना आम्ही संपर्क केला. त्यांनी सांगितले कि, “हे छायाचित्र एका बांगलादेश च्या शॉर्टफिल्म चे स्क्रीनग्रैब्स आहे. बांग्लादेश मध्ये पण हे छायाचित्र चुकीच्या दाव्यांसोबत व्हायरल होत आहे.

शेवटी आम्ही फेसबुक पेज Hindustanibhau🇮🇳 यांचे अकाउंट तपासले, त्यात आम्हाला असे कळले कि या पेज चे 22.7K फ़ॉलोअर्स आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे समजले. हे कुठल्या मदरस्याचे छायाचित्र नाही आहे. एका शॉर्टफिल्म च्या स्क्रीनग्रैब्स ला लोकं खरे मानून व्हायरल करत आहे.

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later