X

Fact Check: सोनिया गांधी आधी पासून साजरा करत आहेत होळी, व्हायरल पोस्ट खोटी आहे

  • By Vishvas News
  • Updated: April 9, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे होळी खेळतानाचे छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र काही लोकं या दाव्यासह व्हायरल करत आहेत कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावात सोनिया गांधी ह्या होळी खेळायला लागल्या. काही लोकं हि पोस्ट हिंदू धर्माचा विजय या दाव्याने व्हायरल करत आहेत.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, त्यात आम्हाला सोनिया गांधी या आधी पासूनच होळी खेळात असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर रूप भादुड़ी ने ३० मार्च रोजी एक छायाचित्र आपल्या अकाउंट वर अपलोड केले. सोबत लिहले होते: ‘बेरहम मोदी न जाने क्या क्या करवाएगा 😂😂😂 ई देखो इटली बाली एंटोनियो चाची भी होली के रंग मे रंगने लगी आज तो 😁 यह चाय वाले की जय हो’

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात व्हायरल छायाचित्राचा ओरिजिनल सोर्स शोधण्यापासून केली. गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये आम्हाला एक व्हिडिओ मिळाला. काँग्रेस च्या युट्युब पेज वर २४ मार्च २०१६ रोजी अपलोड केलेल्या या छायाचित्रात, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य काही लोकं तेच कपडे घातलेले दिसतात, जे व्हायरल छायाचित्रात दिसतात. यांनी हे स्पष्ट होते कि हे छायाचित्र मार्च २०१६ रोजी अपलोड केलेले आहे.

आम्हाला काँग्रेस च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर देखील हेच छायाचित्र मिळाले जे व्हायरल होत आहे. २४ मार्च २०१६ च्या ह्या छायाचित्रात, सोनिया गांधी आणि राहुल गांधी होळी खेळताना दिसतात.

तपासादरम्यान ओपन सर्च चा वापर करून आम्ही सोनिया गांधी यांचे होळी खेळतानाचे जुने छायाचित्र शोधून काढण्यास सुरुवात केली. आम्हाला गेटी च्या वेबसाईट वर मार्च २००८ मधले एक छायाचित्र मिळाले, हे छायाचित्र तुम्ही इथे बघू शकता.

तसेच आम्हाला २००४ मधले पण एक छायाचित्र मिळाले, ज्यात सोनिया गांधी होळी खेळताना बघितल्या जाऊ शकतात.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने काँग्रेस चे कॉम्म्युनिकेशन प्रमुख प्रणव झा यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे बऱ्याच वर्षांपासून होळी साजरा करत आहेत.

विश्वास न्यूज ने तपासात व्हायरल पोस्ट अपलोड करणाऱ्या रूपा भादुड़ी यांचे प्रोफाइल स्कॅन केले. प्रोफाइल वर दिलेल्या माहिती प्रमाणे, यूजर कलकत्ताच्या रहिवासी असल्याचे समजले. हा अकाउंट २०१८ रोजी बनवले गेले होते.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. नरेंद्र मोदी यांच्या दबावात सोनिया गांधी यांनी होळी खेळणे सुरु केले नाही. सोनिया गांधी बऱ्याच वर्षांपासून होळी खेळात आहेत.

  • Claim Review : सोनिया गांधी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या दबावात होळी खेळात आहेत.
  • Claimed By : रूपा भादुड़ी
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later