X

Fact Check: सोनिया गांधी चे हे चित्र एडिटेड आहे

आमच्या तपासात कळले कि सोनिया गांधी चे व्हायरल चित्र एडिटेड आहे. हे चित्र एका व्हिडिओ चे स्क्रीनशॉट आहे, ज्याला एडिट करून त्यात स्टॅचू आणि क्रॉस जोडण्यात आला आहे.

  • By Vishvas News
  • Updated: March 19, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला आपल्या चॅट बॉक्स टीप लाईन नंबर +91 95992 99372 वर सोनिया गांधी चे एक चित्र व्हेरिफिकेशन करता मिळाले. ह्या चित्रात सोनिया गांधी च्या मागे काही पुस्तक बघितले जाऊ शकतात, ज्यात एक पुस्तक ठळक दिसते ते म्हणजे ‘हाउ टू कन्वर्ट इंडिया इन टू ए क्रिश्चिन नेशन’. ह्या चित्रासोबत एक बायबल आणि एक जीजस क्राईस्ट चा एक स्टॅचू देखील दिसतो. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल चित्र एडिटेड असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
व्हाट्सअँप यूजर डॉ इरोधा एचसी ने हे चित्र आमच्या चॅट बोट नंबर वर मिळाले. चित्राच्या आत लिहले होते: जूम करके दाहिनी तरफ देखें । एक पुस्तक जिसका शीर्षक है ‘भारत को ईसाई राष्ट्र कैसे बनाया जाए’ किसी और प्रमाण की आवश्यकता है

पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
आम्ही व्हायरल चित्राचा तपास करण्यासाठी सगळ्यात आधी गूगल रिव्हर्स इमेज सोबत चित्र शोधले. आम्हाला काँग्रेस च्या अधिकृत व्हिडिओ चॅनेल वर अपलोड केलेल्या एका व्हिडिओ मध्ये हा थंबनेल मिळाला. व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावरही आम्हाला कुठेच त्या पुस्तकांमध्ये बायबल अनु क्रॉस नाही दिसला. तसेच व्हायरल चित्रात दिसत असलेले चित्र, ‘हाउ टू कन्वर्ट इंडिया इन टू ए क्रिश्चियन नेशन’ देखील नाही दिसत.

खरा व्हिडिओ 2020 चा आहे, जेव्हा सोनिया गांधी बिहार विधानसद्ध निवडणुकांआधी लोकांना संबोधित करत राज्यातील इकोनोमि आणि बेरोजगारी ची स्तिथी सांगत होत्या. हा व्हिडिओ सगळ्यात ऑक्टोबर 2020 मध्ये राहुल गांधी ने शेअर केला होता, त्यानंतर बऱ्याच मीडिया ऑर्गनायजेशन ने हा स्क्रीनशॉट आपल्या बातम्यांमध्ये वापरला होता.

अधिक माहिती साठी आम्ही काँग्रेस चे प्रवक्ता प्रणव झा ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले, “व्हायरल चित्र एडिटेड आहे आणि बऱ्याच वेळा पासून इंटरनेट वर हे व्हायरल होत आहे. चित्रात असे कुठलेच स्टॅचू किंवा पुस्तक नाही.”

आता आम्ही फेसबुक यूजर ज्यांनी हि पोस्ट शेअर केली, यूजर Kajal Raikwar चे प्रोफाइल स्कॅन केले. प्रोफाइल स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि यूजर चे 3000 पेक्षा जास्ती फेसबुक फ्रेंड्स आहे. त्या पुण्याच्या रहिवासी आहे.

निष्कर्ष: आमच्या तपासात कळले कि सोनिया गांधी चे व्हायरल चित्र एडिटेड आहे. हे चित्र एका व्हिडिओ चे स्क्रीनशॉट आहे, ज्याला एडिट करून त्यात स्टॅचू आणि क्रॉस जोडण्यात आला आहे.

  • Claim Review : पप्पू की मम्मी कौन सी किताब पढ़ती है भारत को ईसाई राष्ट्र कैसे बनाया जाए विश्वास ना हो तो जूम कर कर देख लो
  • Claimed By : Kajal Raikwar
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later