X

Fact Check:पश्चिम बंगाल मध्ये संघ सोबत जुडलेल्या १२५ शाळा बंद होण्याची बातमी तीन वर्ष जुनी आहे

  • By Vishvas News
  • Updated: May 8, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक संपल्या पण खोट्या बातम्या व्हायरल होणे अजून काही थांबत नाही आहे. आता सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात आर भारत चॅनेल चा एक स्क्रीनशॉट बघितल्या जाऊ शकतो, या स्क्रीनशॉट द्वारे दावा करण्यात येत आहे कि बंगाल मध्ये ममता बॅनर्जी ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १२५ शाळांवर बॅन लावले आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा भ्रामक असल्याचे समजले.

फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यावेळचे राज्याचे शिक्षा मंत्री असलेले पार्थ चटर्जी ने विधानसभेत सांगितले कि सरकार ने आरएसएस पासून प्रेरित असलेल्या ४९३ शाळांची माहिती मिळाली होती, यातील १२५ शाळा बिना नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकेट च्या कार्यरत होत्या. आमच्या तपासात कळले कि हि तीन वर्ष जुनी बातमी आहे जी आता व्हायरल करण्यात येत आहे.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Hindustan Ki Sherni Triangular flag on post Kanchan Singh ने हा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहले: बंगाल में RSS के 125 स्कूलों पर ममता बनर्जी ने लगाया बैन! क्या आपको नहीं लगता जो कुछ भी बंगाल में हो रहा है वो कहीं ना कहीं ममता बानो के अंदर भविष्य को लेकर उसके डर को दिखा रहा है
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट मध्ये केलेल्या दाव्याला सगळ्यात आधी इंटरनेट वर शोधले. आम्हाला फेब्रुवारी २०१८ मध्ये प्रकाशित झालेली एक मीडिया रिपोर्ट मिळाली, ज्यात पश्चिम बंगाल मध्ये आरएसएस सोबत संलग्नित असलेल्या १२५ शाळांना बंद करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे.

या रिपोर्ट्स प्रमाणे, त्यावेळी राज्याचे शिक्षा मंत्री असलेले पार्थ चटर्जी यांनी विधानसभेत सांगितले होते कि राज्यसरकार ला आरएसएस पासून प्रेरित असलेल्या ४९३ शाळांची माहिती मिळाली होती, ज्यातून १२५ शाळा बिना सरकार च्या नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सह कार्यरत होत्या, या १२५ शाळा बंद केल्याचे सांगण्यात आले.

आम्हाला रिपब्लिक वर्ल्ड च्या अधिकृत युट्युब चॅनेल वर २२ फेब्रुवारी २०१८ मध्ये अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला, शीर्षक होते: Mamata Banerjee Bans RSS Schools In West Bengal. या व्हिडिओ मध्ये ४२ सेकंदावर व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट बघितला जाऊ शकतो.

अधिक माहिती साठी आम्ही आर भारत चे सिनियर एग्जीक्यूटिव एडिटर अभिषेक कपूर यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल स्क्रीनशॉट आताचे नाही. हि बातमी फेब्रुवारी २०१८ मध्ये चालवली गेली होती.

आम्ही दैनिक जागरण च्या कलकत्ता च्या ब्युरो चीफ जेके वाजपेयी यांच्यासोबत संप्रर्क केला. त्यांनी देखील व्हायरल पोस्ट ची पुष्टी केली आणि सांगितले कि हि घटना आताची नाही, सध्या इथे असे काहीच घडले नाही. हि बातमी २०१८ ची आहे.

आता आम्ही ट्विटर वर हि पोस्ट शेअर करणारे यूजर, Hindustan Ki Sherni Triangular flag on post Kanchan Singh च्या प्रोफाइल ला स्कॅन केले. प्रोफाइल ला स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि यूजर ने आपल्या ट्विटर बायो मध्ये स्वतः सोशल मीडिया एक्टिविस्ट व लेखिका असल्याचे सांगितले आहे. यूजर ने एप्रिल २०२० मध्ये ट्विटर जॉईन केले.

निष्कर्ष: आमच्या तपासात हे स्पष्ट झाले कि व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा भ्रामक आहे. बंगाल मध्ये १२५ शाळा फेब्रुवारी २०१८ मध्ये बंद केल्या गेल्या. हि आताची घटना नाही आहे.

  • Claim Review : पश्चिम बंगाल मध्ये संघ सोबत जुडलेल्या १२५ शाळा बंद
  • Claimed By : Hindustan Ki Sherni Triangular flag on post Kanchan Singh
  • Fact Check : Misleading
Misleading
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later