X

Fact Check: बिहार निवडणुकांच्या नावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र २०१४ चे आहे, योगींच्या रॅली सोबत याचा काही संबंध नाही

  • By Vishvas News
  • Updated: October 24, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): बिहार निवडणुकीच्या दरम्यान एक छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. या पोस्ट मध्ये दावा केला जात आहे कि हे व्हायरल छायाचित्र उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रॅली चे आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट ला निरखून बघितले आणि त्याचा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि या छायाचित्राचा बिहार मध्ये झालेल्या योगी आदित्यनाथ यांच्या रॅली सोबत काहीही संबंध नाही. २०१४ साली कलकत्त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक रॅली झाली होती. हे छायाचित्र त्या रॅली चे आहे. आता हे छायाचित्र बिहार चे सांगून व्हायरल होत आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर नीरज वर्मा ने २१ ऑक्टोबर रोजी, ‘मोदी सेना’ नावाच्या एका ग्रुप वर एक छायाचित्र अपलोड केले आणि त्यात लिहले:
‘योगी आदित्यनाथ जी को सुनने के लिए बिहार की एक रैली में उमड़ा जनसैलाब * जयश्रीराम के नारों से गूंजा मैदान.

अर्थात: योगी आदित्यनाथ यांना ऐकायला बिहारच्या एका रॅली मध्ये लोकांची अशी गर्दी झाली, जय श्रीराम च्या नाऱ्यांनी मैदान निनादले

या फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
या छायाचित्राला बाकी यूजर्स ने देखील खरे मानून शेअर केले आहे.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल होत असलेल्या छायाचित्राला निरखून बघितले. आम्हाला हे छायाचित्र जुने वाटले. या छायाचित्राची क्वालिटी चांगली नव्हती. त्यानंतर आम्ही व्हायरल छायाचित्राचा शोध गूगल रिव्हर्स इमेज द्वारे घेतला. आम्हाला सगळ्यात जुने छायाचित्र देशगुजरात नावाच्या एका वेबसाईट वर मिळाले. ५ फेब्रुवारी २०१४ रोजी अपलोड केलेल्या या बातमीत या छायाचित्राचा वापर केला गेला होता. या बातमीत दावा केला गेला आहे कि हे छायाचित्र २०१४ साली कलकत्त्यात झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या रॅली चे आहे. पूर्ण बातमी इथे वाचा.

‘नरेंद्र मोदी यांची २०१४ ची कलकत्ता रॅली’ अश्या कीवर्डस च्या मदतीने आम्ही इंटरनेट सर्च केले. या कीवर्डस च्या मदतीने आम्हाला कलकत्याच्या ५ फेब्रुवारी २०१४ ला झालेली एक बातमी मिळाली. newsx.com च्या यूट्यूब चॅनेल वर या संबंधित बातमी अपलोड केलेली सापडली.

या नंतर आम्ही फोटो एजेंसी च्या वेबसाईट ला तपासायचे ठरवले. गेटी इमेजस च्या वेबसाईट वर आम्ही वेग-वेगळे कीवर्डस टाकून छायाचित्राचा शोध घेतला. आणि ५ फेब्रुवारी २०१४ ची टाइमलाईन सेट केली. शेवटी आम्हाला मोदी यांची कोलकत्यात झालेल्या रॅली चे छायाचित्र सापडलेच. या छायाचित्राला आम्ही व्हायरल होत असलेल्या छायाचित्रासोबत मिळवून पहिले त्यात आम्हाला बरेच साम्य वाटले. दोन्ही चित्रात आम्हाला साइड स्‍टेज चे कार्पेट हिरव्या रंगाचे कार्पेट दिसले. या शिवाय या मंच च्या मागच्या जागेत निळ्या रंगाचे टेन्ट दोन्ही छायाचित्रात दिसले.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्हाला गूगल सर्च च्या वेळी आम्हाला कळले कि योगी आदित्यनाथ ला भाजप चे स्टार प्रचारक बनवले गेले आहे. २० ऑक्टोबर पासून त्यांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. त्यांनी बिहार मध्ये बरेच रॅली आतापर्यंत केले आहे, पण व्हायरल छायाचित्र हे आताच्या रॅली चे नाही आहे.

व्हायरल छायाचित्रावरून आम्ही दैनिक जागरण चे बिहार चे डिजिटल प्रभारी अमित आलोक यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि योगी आदित्यनाथ च्या रॅली बिहार मध्ये सुरु झाल्या आहेत, पण व्हायरल छायाचित्र हे त्यांच्या कुठल्याच रॅली चे नाही आहे.

शेवटी आम्ही खोटे पोस्ट करणाऱ्या यूजर च्या अकाउंट चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि यूजर एका विचारधारा सोबत प्रभावित आहे. त्यांच्या अकाउंट वरून आम्हाला कुठलीच अधिक माहिती मिळाली नाही.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी ठरली. २०१४ मध्ये कलकत्ता मध्ये झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या रॅली चे हे छायाचित्र बिहार निवडणुकांचे योगी आदित्यनाथ यांच्या रॅली चे सांगून व्हायरल होत आहे.

  • Claim Review : योगी आदित्यनाथ जी को सुनने के लिए बिहार की एक रैली में उमड़ा जनसैलाब * जयश्रीराम के नारों से गूंजा मैदाना
  • Claimed By : Neeraj Verma
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later