X

Fact Check: हा व्हिडिओ अयोध्येमधील रामभक्त हिंदू राष्ट्र घोषित करण्यास आल्याचा नाही, व्हायरल दावा खोटा आहे

विश्वास न्यूजच्या तपासात अयोध्येमध्ये रामभक्त हिंदू राष्ट्र घोषित असल्याच्या दाव्याने व्हायरल होत असलेला व्हिडिओ, मिरज, महाराष्ट्र मधील 2019 च्या नवरात्री उत्सवाचा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: October 9, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): एक व्हिडिओ विविध सोशल नेटवर्किंग वेबसाईट्स वर व्हायरल होताना दिसत आहे. ह्यात दावा करण्यात येत आहे कि रॅम भक्त हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी अयोध्येत आले आहे. रांगोळी काढलेल्या रस्त्यांवर घोषणा देत लोक चालत असल्याचे ह्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसून येते. विश्वास न्यूज च्या तपासात समोर आले कि हा व्हिडिओ मिरज, महाराष्ट्राचा 2019 सालचा आहे, अयोध्येचा नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘सनातनि धर्मं रक्षक’ ने हा व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहले, “‘हिंदू राष्ट्र घोषित करवाने के लिए सारे राम भक्त अयोध्या पहुंच चुके हैं
हिंदू राष्ट्र घोषित करवाने के लिए सारे राम भक्त अयोध्या पहुंच चुके हैं…’

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओ ला नीट निरखून बघितले, आम्ही बघत होतो कि असे काही क्लुस किंवा शब्द व्हिडिओ मध्ये ऐकू येतात का ज्याने सिद्ध होईल कि व्हिडिओ अयोध्येचा आहे. पण ऑडिओ क्लिअर नसल्या कारणाने आम्हाला काहीच ऐकू आले नाही.

नंतर, इन्व्हिड टूल मध्ये व्हिडिओ अपलोड करून स्क्रीनग्रेब्स न घेता आम्ही व्हिडिओ चे विविध स्क्रीनशॉट घेऊन त्यावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर करून व्हिडिओ शोधला. असे केल्यास आम्हाला युट्युब वर Akshay Shinde ह्यांनी 27 ऑक्टोबर 2019 रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ सापडला.

ह्या व्हिडिओ चे टायटल होते, “दुर्गामाता दौड मिरज विभाग

आता आम्ही फेसबुक ला सर्च इंजिन सारखे वापरून त्यात ह्या कीवर्डस चा शोध घेतला.

ह्याद्वारे आम्हाला एक Amit Shinde नावाच्या फेसबुक यूजर चा प्रोफाइल मिळाला ज्यांच्या दुर्गामाता दौड चे छायाचित्र आपल्या प्रोफाइल वर अपलोड केले होते. त्याने फोटोग्राफर Anup Shinde ह्याला क्रेडिट्स दिले होते.

ह्यावरून आम्हाला Anup Shinde ह्यांचा नंबर मिळाला आणि आम्ही ह्या छायाचित्रकाराला संपर्क केला. त्यांच्यासोबत आम्ही व्हायरल व्हिडिओ व्हाट्सअँप वर शेअर केला. Anup Shinde ह्यांनी विश्वास न्यूज ला सांगितले कि हा व्हिडिओ मिरज माधीवळ नवरात्री चा 2019 सालचा व्हिडिओ आहे.

त्यांनी आमच्या सोबत त्यांच्या युट्युब प्रोफाइल वरील एक व्हिडिओ देखील ह्याच उत्सवाचा शेअर केला. ‘Aai mauli – Miraj Navratri 2k19’ हा व्हिडिओ त्यांनी 15 नोव्हेंबर 2019 रोजी अपलोड केला.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने त्या फेसबुक यूजर ‘सनातनि धर्मं रक्षक’ ह्याचे सोशल बॅकग्राऊंड चेक केले. ह्या पेज ला 1132 लोक लाईक करतात आणि 1149 लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात अयोध्येमध्ये रामभक्त हिंदू राष्ट्र घोषित असल्याच्या दाव्याने व्हायरल होत असलेला व्हिडिओ, मिरज, महाराष्ट्र मधील 2019 च्या नवरात्री उत्सवाचा आहे.

  • Claim Review : अयोध्येमध्ये रामभक्त हिंदू राष्ट्र घोषित करण्यास आले
  • Claimed By : सनातनि धर्मं रक्षक
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later