X

Fact Check: उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल पत्रकार अजित अंजुच्या नावावर खोटे ट्विट व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि 2022 चे उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल अजित अंजुम ह्यांचे व्हायरल ट्विट खोटे आहे.

  • By Vishvas News
  • Updated: February 8, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर उत्तर प्रदेश च्या निवडणुकांसोबत जोडून बऱ्याच दिशाभूल करणाऱ्या बातम्या व्हायरल होत आहेत. ह्याच बाबतीत पत्रकार अजित अंजुम ह्यांचे देखील एक खोटे ट्विट व्हायरल होत आहे, ज्यात लिहले होते कि उत्तर प्रदेश मध्ये परत योगी सरकार बनली तर मी पत्रकारिता सोडेल. आमच्या तपासात हा ट्विट खोटा असल्याचे समजले. अजित अंजुम ने विश्वास न्यूज सोबत बोलताना हा ट्विट खोटा असल्याचे सांगितले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ने वायरल ट्वीट शेअर केले, ज्यात लिहले होते, “अगर 2022 के चुनाव में उत्तरप्रदेश में योगी फिर से जीत गये तो मैं पत्रकारिता छोड़कर दिल्ली की बिल्लिमरान में चिकन पकौड़े की दुकान खोल लूंगा।”

फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तसा लिहण्यात आला आहे. ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. अन्य यूजर देखील हा स्क्रीनशॉट शेअर करत आहे.
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
आपला तपास सुरु करत आम्ही नीट बघितले तेव्हा त्यात कळले कि ह्या ट्विट च्या यूजर समोर ब्लु टिक दिसला, जेव्हाकि पत्रकार अजित अंजुम च्या ऑफिशिअल हॅन्डल मध्ये ब्लु टिक नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही @ajitanjum चे ट्विटर हॅन्डल सर्च केले. त्यात आम्हाला 5 फेब्रुवारी 2022 रोजी केलेला एक ट्विट मिळाला. ज्यात व्हायरल ट्विट चा स्क्रीनशॉट शेअर करून लिहले आहे: ‘मेरे बारे में दुष्प्रचार का नया फोटोशॉप। मेरे नाम से कुछ भी लिखकर वायरल किया जा रहा है। इसी से पता चलता है कि भक्तों की जमात मुझ पर कितनी बौखलाई हुई है। मेरा ट्विटर हैंडल वेरिफाइड नहीं है, लेकिन ब्लू टिक वाला फोटोशॉप करके खेल चालू है। ये फर्जी लोग हैं।”

ह्या व्हायरल ट्विट चे खंडन त्यांनी अजित अंजुम ह्या वेरिफाइड फेसबुक हॅन्डल वर देखील शेअर केले आहे. पोस्ट खाली बघा.

विश्वास न्यूज च्या तपासात अजित अंजुम ह्यांच्यासोबत देखील संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल ट्विट खोटा आहे. मागील काही दिवसांपासून हा ट्विट व्हायरल होत आहे.

खोटी पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर चे सोशल स्कॅनिंग केले त्यात आम्हाला कळले कि यूजर एम् तिवारी, देवरिया चे रहिवासी आहे आणि यूजर ला 240 लोकं फॉलो करत आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि 2022 चे उत्तर प्रदेश निवडणुकांबद्दल अजित अंजुम ह्यांचे व्हायरल ट्विट खोटे आहे.

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later