Fact Check: मारहाणीच्या या व्हिडिओचा डिंपल यादववरील आक्षेपार्ह टिप्पणीशी नाही काहीही संबंध
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कन्नौजचे लोकसभा खासदार अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी आणि मैनपुरीच्या लोकसभा खासदार डिंपल यादव यांनी अलीकडेच दिल्लीतील संसदेजवळील एका मशिदीला भेट दिली होती आणि एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान मौलाना साजिद रशिदी यांनी मशिदीतील डिंपलच्या पोशाखाबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती.
- By: Umam Noor
- Published: Aug 8, 2025 at 08:09 PM
- Updated: Aug 8, 2025 at 08:12 PM
- Contributors: Abhishek Parashar
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कन्नौजचे लोकसभा खासदार अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी आणि मैनपुरीच्या लोकसभा खासदार डिंपल यादव यांनी अलीकडेच दिल्लीतील संसदेजवळील एका मशिदीला भेट दिली होती आणि एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान मौलाना साजिद रशिदी यांनी मशिदीतील डिंपलच्या पोशाखाबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर, नोएडामधील एका टीव्ही स्टुडिओमध्ये मौलाना साजिद रशिदी यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. या संदर्भात, सोशल मीडिया वापरकर्ते एक व्हिडिओ शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की, आता समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी दुसऱ्या एकामौलाना यांना मारहाण केली आहे.
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात असे आढळून आले की, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. हा व्हिडिओ, मे 2025 मध्ये बुलंदशहरमध्ये झालेल्या सपाच्या बैठकीचा आहे, जिथे सपाच्या नेत्यांमध्ये हाणामारी झाली होती. मौलाना रशिदी यांच्या मारहाणीशी त्याचा काहीही संबंध नाही. हाच व्हिडिओ आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह प्रसारित केला जात आहे.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
व्हायरल पोस्ट शेअर करताना एका फेसबुक वापरकर्त्याने लिहिले की, “डिंपल यादव यांच्या अपमानावर @#% ने मौन बाळगले आहे पण आता सपा कार्यकर्ते मौलाना लोकांनांही सोडत नाहीत. भाई सपा कार्यकर्त्यांनी काल एका दुसऱ्या मौलानाला मारहाण केली.”
पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पाहा.
तपास
आमचा तापास सुरू करून, आम्ही प्रथम व्हायरल व्हिडिओच्या की- फ्रेम्स काढल्या आणि गुगल लेन्सद्वारे त्या शोधल्या. शोध घेतल्यावर, आम्हाला हा व्हिडिओ 30 मे 2025 रोजी एका एक्स हँडलवर शेअर केलेला आढळला. येथे दिलेल्या माहितीनुसार, “बुलंदशहर स्याना येथील सपाच्या बैठकीत सपाच्या दोन गटांमध्ये शिवीगाळ आणि हाणामारी झाली.”
या आधारावर, आम्ही आमचा तपास पुढे नेला आणि आम्हाला तो 30 मे 2025 रोजी एनडीटीव्हीच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, “उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे समाजवादी पक्षाच्या बैठकीदरम्यान खूप गोंधळ झाला. बैठकीत सपाचे नेते आपापसात भिडले आणि दलित कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांचा पाठलाग करून मारहाण करण्यात आली. सपाचे विधानसभा प्रभारी प्रेमपाल यादव देखील या बैठकीत उपस्थित होते.”
बातमीचा शोधल्यानंतर आम्हाला भास्कर डॉट कॉम वर एक बातमी मिळाली. बातमीत सांगितले होते की, गुरुवारी स्याना येथील समाजवादी पक्षाच्या बूथ लेव्हल बैठकीत दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. हनीफगढी येथील सपा नेत्याच्या कॅम्प ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीत विधानसभेचे प्रभारी प्रेमपाल यादव उपस्थित होते. कार्यकर्त्यांमधील वाद इतका वाढला की, हाणामारी सुरू झाली. वरिष्ठ नेत्यांनी दोन्ही पक्षांना समजावण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून वरिष्ठ नेते बैठक अर्ध्यावरच सोडून गेले.
दरम्यान, द हिंदूमध्ये 30 जुलै रोजी आलेल्या वृत्तानुसार, “समाजवादी पक्षाचे असल्याचा दावा करणाऱ्या तरुणांनी नोएडा येथील एका वृत्तवाहिनीच्या वादविवाद कार्यक्रमानंतर पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्याविरुद्ध कथितपणे अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली मौलाना साजिद रशिदी यांना चापट मारली.” संपूर्ण बातमी येथे वाचता येईल.
व्हायरल व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी, आम्ही बुलंदशहर येथील स्वतंत्र पत्रकार वरुण शर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला पुष्टी केली की, हे प्रकरण जुने आहे आणि डिंपल यादववरील टिप्पणीशी त्याचा संबंध नाही.
आता दिशाभूल करणारी पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्याचे सोशल स्कॅनिंग करण्याची पाळी होती. आम्हाला आढळले की, ‘हिंदू हरेंद्र जादोन’ या वापरकर्त्याला सुमारे 9 हजार लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात असे आढळून आले की, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. हा व्हिडिओ मे 2025 मध्ये बुलंदशहरमध्ये झालेल्या सपाच्या बैठकीचा आहे, जिथे सपाच्या नेत्यांमध्ये हाणामारी झाली होती. मौलाना रशिदी यांच्या मारहाणीशी त्याचा काहीही संबंध नाही. हाच व्हिडिओ आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह प्रसारित केला जात आहे.
- Claim Review : आता समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी आणखी एका मौलानांना मारहाण केली आहे.
- Claimed By : फेसबुक वापरकर्ता- हिंदू हरेंद्र जादौन
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.











