X

Fact Check: नाशिक च्या ‘द काश्मीर फाईल्स’ पाहायला गेलेल्या महिलांचा व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्र च्या नाशिक मधील एका थिएटर मध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ च्या स्क्रिनिंग च्या वेळी घडलेल्या घटनेचा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: April 11, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ शेअर करून दावा करण्यात येत आहे कि महाराष्ट्राच्या इसाई शाळेत एका मुसलमान टीचर ने जबरदस्ती शाळेत नमाज वाचायला लावली, त्यानंतर मनसे च्या राज ठाकरे च्या कार्यकर्त्यांनी त्याच मुसलमानांकडून भगवे स्कार्फ घालायला लावले. व्हैदेव मध्ये एक माणूस काही महिलांना भगवे स्कार्फ घालून देताना दिसतो. विश्वास न्यूज च्या तपासात हा व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्राच्या नाशिक च्या थिएटर मधील आहे, जिथे लोकं ‘द काश्मीर फाईल्स’ बघायला गेले होते.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Santosh Singh Rajput ने व्हाईटल व्हिडिओ शेअर केला आणि लिहले, “महाराष्ट्र के ईसाई स्कूल में एक मुस्लिम टीचर ने जबरन लड़कियों को स्कूल में नमाज पढ़वाई थी। फिर राज ठाकरे की मनसेना के कार्यकर्ता ने उसी मुस्लिम के पास से केसरिया खेस पहनवाया। जय श्री राम।”

तपास:
व्हायरल दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी, विश्वास न्यूजने इनव्हिड टूलचा वापर करून व्हिडिओचे अनेक फोटो काढले आणि Google रिव्हर्स इमेजद्वारे शोधले. यादरम्यान, आम्हाला 23 मार्च 2022 रोजी नवभारत टाइम्सवर प्रकाशित झालेल्या व्हायरल व्हिडिओशी संबंधित एक रिपोर्ट मिळाली. रिपोर्टनुसार, महाराष्ट्रातील नाशिकमधील काही महिला ‘द काश्मीर फाइल्स’ पाहण्यासाठी भगवा दुपट्टा परिधान करून आल्या होत्या. तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी त्यांना थिएटरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हे भगवे स्कार्फ काढण्यास सांगितले, यावरून वादावादी झाली. एबीपी न्यूजनेही हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही काही कीवर्डद्वारे गुगलवर सर्च केले. यादरम्यान, आम्हाला 23 मार्च 2022 रोजी ANI न्यूज एजन्सी वर अपलोड केलेल्या व्हायरल दाव्याशी संबंधित एक ट्विट आढळले. कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, काही महिला एका ग्रुपमध्ये सामील झाल्या होत्या, ज्या लोकांना काश्मिरी फाइल्स दाखवण्यात मदत करत होत्या. गटाची कोणतीही विशिष्ट तुकडी किंवा ओळख नव्हती, म्हणून महिलांना भगवे दुपट्टे दिले गेले जेणेकरून प्रत्येकजण गटाचा एक भाग असल्याचे दिसून येईल.

अधिक माहितीसाठी विश्वास न्यूजने मिड-डेचे वरिष्ठ रिपोर्टर समीउल्ला खान यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले, “व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ नाशिकच्या सिनेमागृहात घडलेल्या घटनेचा आहे.

तपासाअंती पोस्ट व्हायरल करणाऱ्या युजरची चौकशी करण्यात आली. युजरच्या सोशल स्कॅनिंगमध्ये तो उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील रहिवासी असल्याचे समोर आले. Santosh Singh Rajput फेब्रुवारी 2009 पासून फेसबुकवर सक्रिय आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्र च्या नाशिक मधील एका थिएटर मध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ च्या स्क्रिनिंग च्या वेळी घडलेल्या घटनेचा आहे.

  • Claim Review : महाराष्ट्र के ईसाई स्कूल में एक मुस्लिम टीचर ने जबरन लड़कियों को स्कूल में नमाज पढ़वाई थी। फिर राज ठाकरे की मनसेना के कार्यकर्ता ने उसी मुस्लिम के पास से केसरिया खेस पहनवाया। जय श्री राम
  • Claimed By : Santosh Singh Rajput
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later