Fact Check: जन आशीर्वाद यात्रेच्या वेळी भाजप नेत्यांच्या मारहाणीचा दावा खोटा, अजमेर चा जुना व्हिडिओ आता होत आहे व्हायरल
वर्ष 2019 मध्ये राजस्थान च्या अजमेर मध्ये निवडणुकांच्या रॅली मध्ये भाजप नेत्यांच्या दोन गटात हाणामारी झाली ज्याचा व्हिडिओ आता जन आशीर्वाद यात्रेवेळी भाजप नेत्यांची जनतेने पिटाई केल्याच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
- By Vishvas News
- Updated: August 26, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्षबळकटीचं नियोजन केलं, त्यासाठी नारायण राणे ह्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली होती. सोचल मीडिया वर ह्या यात्रेसोबत जोडून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे, ज्यात बरीच गर्दी एक-मेकांतच भांडताना दिसत आहे. दावा करण्यात येत आहे कि जन आशीर्वाद यात्रेच्या वेळी जनता ने भाजप च्या नेत्यांची पिटाई केली.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आणि भाजप विरोधात दुष्प्रचार करण्याच्या हेतूने व्हायरल करण्यात येत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ वर्ष 2019 मध्ये राजस्थान च्या अजमेर मध्ये मधला भाजप च्या दोन गटांमधील मारामारीच्या व्हिडिओ आहे, ज्याला आता जन आशीर्वाद यात्रेचा सांगून व्हायरल होत आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Sunil Borad Patel’ ने व्हायरल व्हिडिओ (आर्काइव्ह लिंक) शेअर करून गुजराती भाषेत लिहले: આજ રોજ જનતા દ્વારા જન સેવકોને આશીર્વાદ યાત્રા માં આશીર્વાદ નું વિતરણ કરવામાં આવ્યું. (आज जन आशीर्वाद यात्रेत जनसेवकांना जनतेने आशीर्वाद दिला)
सोशल मीडिया वर अन्य यूजर्स ह्या व्हिडिओ ला मिळत्या जुळत्या दाव्यासह शेअर करत आहेत. व्हायरल व्हिडिओ गुजराती यूजर ने आपल्या प्रोफाईल वर 19 ऑगस्ट 2021 रोजी शेअर केला होता, ज्यात असे दिसते कि व्हिडिओ चा संबंध गुजरात सोबत असेल.
तपास:
व्हायरल व्हिडिओ मध्ये भाजप चा झेंडा स्पष्ट दिसतो. व्हिडिओ मध्ये दिसत असलेले लोकं एकमेकांना मारताना दिसतात. ह्या व्हिडिओ वर ‘NEWS4RAJSTHAN’ चा वाटरमार्क देखील आम्हाला दिसला, ज्यात असे कळते कि व्हिडिओ राजस्थान चा असू शकतो.
ह्या सगळ्या तपासानंतर आम्ही संबंधित कीवर्ड सर्च केले आणि त्या माध्यमातून आम्हाला हा व्हिडिओ दैनिक जागरण च्या आधिकारिक यू-ट्यूब चैनल वर 12 एप्रिल 2019 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ बुलेटिन मिळाला, ज्यात हा व्हिडिओ आहे.
हा व्हिडिओ २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसोबत संबंधित आहे. बुलेटिन मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे, ‘राजस्थान के अजमेर के मसूदा में गुरुवार को बीजेपी नेता आपस में भिड़ गए। दरअसल, मसूदा में बीजेपी प्रत्याशी भागीरथ चौधरी के चुनाव प्रचार के दौरान मसूदा की पूर्व विधायक सुशील कंवर पलाड़ा के पति भंवर सिंह पलाड़ा और वर्तमान में BJP में शामिल नवीन शर्मा और उनके समर्थकों में झड़प हो गई।’
सोशल मीडिया वर सर्च केल्यावर हा व्हिडिओ आम्हाला न्यूज एजेंसी एएनआई च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर देखील मिळाला. बारा एप्रिल रोजी केलेल्या ट्विट मध्ये सांगितले होते कि हि घटना अजमेर मध्ये11 एप्रिल 2019 रोजी झालेल्या मार हाणेची आहे.
म्हणजेच हा व्हिडिओ लोकसभा निवडणुकांच्या वेळ चा आहे, जो आताचा सांगून खोट्या दाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे.
ह्याला घेऊन आम्ही जयपूर स्थित प्रेस जर्नल चे पत्रकार मनीष गोधा ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले, व्हायरल होत असलेला व्हिडिओ 2019 मध्ये अजमेर मध्ये भाजप च्या नेत्यांमध्ये मारामारी झाल्याच्या एका रॅली चा व्हिडिओ आहे.
न्यूज सर्च मध्ये आम्हाला अश्या बऱ्याच रिपोर्ट मिळाल्या ज्यात जण आशीर्वाद रॅली काढल्याचे सांगितले गेले आहे. रिपोर्ट्स प्रमाणे, मोदी कॅबिनेट मधले नवे मंत्री जवळपास वीस हजार किलोमीटर च्या जन आशीर्वादाच्या यात्रेवर निघाले आणि ह्या दरम्यान ते 212 लोकसभा क्षेत्रात दौरा करून लोकांसोबत संपर्क करतील.
व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केल्यावर कळले कि यूजर गुजरात च्या वडोदरा चा रहिवासी आहे.
निष्कर्ष: वर्ष 2019 मध्ये राजस्थान च्या अजमेर मध्ये निवडणुकांच्या रॅली मध्ये भाजप नेत्यांच्या दोन गटात हाणामारी झाली ज्याचा व्हिडिओ आता जन आशीर्वाद यात्रेवेळी भाजप नेत्यांची जनतेने पिटाई केल्याच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
- Claim Review : आज आशीर्वाद यात्रा में जनसेवकों को जनता ने आशीर्वाद दिया ।
- Claimed By : FB User-Sunil Borad Patel
- Fact Check : False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
-
Whatsapp 9205270923
-
Telegram 9205270923
-
Email-Id contact@vishvasnews.com