X

Fact Check: दक्षिण आफ्रिकेतील सिंहांचा व्हिडिओ गुजरातच्या नावावर होत आहे व्हायरल

  • By Vishvas News
  • Updated: May 25, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर सिंहांच्या एका कळपाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ ला गुजरात च्या नावावर व्हायरल करण्यात येत आहे. दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ नुकतेच आलेले वादळ तौक्ते चा आहे आणि गीर जंगल यात दिसते.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. त्यात कळले कि हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील माला माला गेम रिजर्व चा व्हिडिओ आहे जो आता गुजरात च्या नावाने व्हायरल होत आहे. आमच्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर हॅन्डल ‘हमसमवेत’ ने २१ मे रोजी एक व्हिडिओ अपलोड करून लिहले: ‘गुजरात स्थित गिर के जंगल में एशियाई शेरों की दिखी चहल कदमी, सुरक्षित हैं सभी 18 शेर, चक्रवाती तूफान ताऊ ते से नहीं हुआ नुकसान, शेरों के लापता होने की उड़ी थी अफवाह!’

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात सगळ्यात आधी गुजरात चे दैनिक जागरण चे वरिष्ठ संवाददाता शत्रुघ्न शर्मा यांना संपर्क करून केली. त्यांच्यासोबत आम्ही व्हायरल होत असलेला दावा शेअर केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल व्हिडिओ सोबत करण्यात आलेला दावा खोटा आहे. हा पूर्ण गोंधळ तेव्हा झाला जेव्हा गुजरात च्या वन आणि पर्यावरण विभाग च्या अतिरिक्त प्रमुख सचिव डॉक्‍टर राजीव कुमार गुप्‍ता यांनी ट्विट केला. या ट्विट मध्ये त्यांनी हा व्हिडिओ गीर चा सांगून शेअर केला.

नंतर त्यांनी हा ट्विट डिलिट केला आणि त्याचे खंडन करणारे पोस्ट शेअर केले. हि पोस्ट तुम्ही खाली बघू शकता.

तपासाच्या वेळी कळले हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील माला माला गेम रिजर्व चा आहे. याला १३ फेब्रुवारी रोजी इंस्टाग्राम वर पोस्ट करण्यात आला होता.

तपासाच्या शेवट्च्या टप्प्यात आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. सोशल स्कँनिंग मध्ये आम्हाला कळले कि हा ट्विटर हॅन्डल मार्च २०२० मध्ये बनवण्यात आला होता. याचे ५०९ फॉलोवर्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात गीर सिंव्हाच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे समजले. दक्षिण आफ्रिकेतील हा व्हिडिओ काही लोकं गीर चा सांगून व्हायरल करत आहेत.

  • Claim Review : गीर जंगलाचा व्हिडिओ
  • Claimed By : humsamvet
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later